मराठी बातम्या /बातम्या /religion /

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनला भावाला अशा राख्या चुकून पण नका बांधू; या गोष्टींची काळजी घ्या

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनला भावाला अशा राख्या चुकून पण नका बांधू; या गोष्टींची काळजी घ्या

शास्त्रात राखीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखी खरेदी करताना ही गोष्टही लक्षात ठेवायला हवी. काही प्रकारच्या राखी भावांना बांधणे शुभ नसते. त्याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 10 ऑगस्ट : भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन (Rakshabandhan) हा सण यंदा 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना यथायोग्य शुभ मुहूर्तावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात. आपल्या भावाला आवर्जून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा (Rakshabandha Quotes In Marathi) देतात.  पण, भावांच्या मनगटावर कोणत्या प्रकारच्या राखी बांधू नये, हे तुम्हाला माहीत आहे का? शास्त्रात राखीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखी खरेदी करताना ही गोष्टही लक्षात ठेवायला हवी. काही प्रकारच्या राखी भावांना बांधणे शुभ नसते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया भावाला कोणत्या प्रकारच्या राख्या बांधू नयेत. देवाची प्रतिमा असलेली राखी - राखीमध्ये देवतांचे चित्र असू नये. देवाच्या प्रतिमेच्या राखी बांधणे अशुभ आहे. कारण सर्वसाधारणपणे राखी भावाच्या मनगटाभोवती बांधली जाते आणि कधीकधी ती पडते किंवा घाण होते. हा देवाचा अपमान मानला जातो. अशुभ चिन्ह असलेली राखी खरेदी करू नये - बाजारात अनेक प्रकारच्या राख्या येऊ लागल्या आहेत, त्यामुळे भावासाठी राखी खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात कोणतंही अशुभ चिन्ह असू नये. अशी राखी बांधल्याने अशुभ फळ मिळते. तुटलेली राखी बांधू नका - राखी खरेदी करताना बहिणींनी हे लक्षात ठेवावे की कधीही तुटलेली राखी खरेदी करू नका. राखीचा धागा वेगळा आणि राखी वेगळी असेल तर खरेदी करू नका. अशी राखी अशुभ मानली जाते. हे वाचा -  Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन काळी राखी कधीही बांधू नका - काळा रंग हा अशुभ रंग मानला जातो. त्यामुळे काळ्या रंगाची राखी बांधल्याने नकारात्मकता वाढते, त्यामुळे या रंगाची राखी अजिबात बांधू नये. हे वाचा -  Rakshabandhan 2022: देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधन कोणत्या नावानं ओळखलं जातं जुन्या राखीचे काय करायचे - अनेक भाऊ पुढचे रक्षाबंधन येईपर्यंत जुनी राखी हातात तशीच ठेवतात. नवीन राखी बांधण्यापूर्वी बहिण ती राखी काढून डस्टबिनमध्ये किंवा इकडे-तिकडे टाकून कचऱ्यात जातात. परंतु, असे अजिबात करू नये कारण राखी ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे ती वाहत्या पाण्यात पूजा साहित्याप्रमाणे विसर्जित करावी. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Raksha bandhan, Religion

पुढील बातम्या