भावाच्या सुखसमृद्धीसाठी राशीनुसार निवडा 'या' रंगाच्या राखी

भावाच्या सुखसमृद्धीसाठी राशीनुसार निवडा 'या' रंगाच्या राखी

भावासाठी राखीची निवड नेमकी कशी करावी, असा विचार करणाऱ्या बहिणींसाठी ही बातमी आहे. प्रत्येक राशीच्या लोकांवर एका विशिष्ट रंगाचा (Colour) प्रभाव असतो. भावाच्या राशीनुसार राखीचा रंग निवडल्यास ती त्याच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकते, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे.

  • Share this:

श्रावण महिना (Shravan) हा व्रत-वैकल्यांचा महिना असतो. तसंच या महिन्यात नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि जन्माष्टमीसारखे अनेक महत्त्वाचे सणदेखील असतात. हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक सणाचं एक खास असं वैशिष्ट सांगितलं आहे. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा राखी पौर्णिमा हा सण असतो. दरवर्षी श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. यंदा 11 आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत रक्षाबंधन (Raksha Bandhan) अर्थात राखी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. भावासाठी राखीची निवड नेमकी कशी करावी, असा विचार करणाऱ्या बहिणींसाठी ही बातमी आहे. प्रत्येक राशीच्या लोकांवर एका विशिष्ट रंगाचा (Colour) प्रभाव असतो. भावाच्या राशीनुसार राखीचा रंग निवडल्यास ती त्याच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकते, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. राशीनुसार राखीची निवड करताना काही गोष्टी ध्यानात घेणंही गरजेचं आहे. `दैनिक जागरण`ने या विषयीची माहिती दिली आहे. ज्योतिष पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी याबाबत राशीनिहाय मार्गदर्शन करताना काही टिप्स दिल्या आहेत. तसेच राखी बांधताना खालील मंत्राचा जप करावा, असंदेखील त्यांनी सांगितलं आहे.

राखी बांधताना हा मंत्र म्हणावा...

ॐ येन बद्धो बळीराजा दानवेन्द्रो महाबलः

तेन त्वामपि बघ्नामि रक्षे मा चल मा चल

मेष (Aries) : जर तुमच्या भावाची रास मेष असेल तर त्याच्यासाठी लाल रंगाची राखी खरेदी करावी. मेष राशीवर मंगळाचा प्रभाव असतो. त्यामुळे लाल रंग त्यांच्या जीवनात ऊर्जा निर्माण करतो.

वृषभ (Taurus) : जर तुमचा भाऊ वृषभ राशीचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी निळ्या रंगाची राखी खरेदी करू शकता. निळ्या रंगाची राखी त्याच्या जीवनात यश घेऊन येईल. तसंच त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होईल.

मिथुन (Gemini) : मिथुन रास असलेल्या भावासाठी हिरव्या रंगाची राखी शुभ ठरेल. मिथुन राशीवर बुधाचा प्रभाव असतो. त्यामुळे हिरवा रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. राखी पौर्णिमेला भावाच्या हातावर हिरव्या रंगाची राखी बांधली तर त्याच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ शकते. तसंच त्याची बौद्धिक क्षमताही वाढेल.

कर्क (Cancer) : कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ही रास उत्तम आरोग्य दर्शवते. जर तुमच्या भावाची रास कर्क असेल तर त्याच्या हातात पांढऱ्या रंगाची राखी बांधावी. या राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग विशेष शुभ असतो.

(दैनंदिन राशीभविष्य: अनपेक्षित अडचणी आणि नोकरीत त्रास होण्याची शक्यता; या राशींनी आज जरा जपून)

सिंह (Leo) : सिंह राशीवर सूर्य अर्थात रवीचा प्रभाव असतो. जर तुमचा भाऊ सिंह राशीचा असेल तर त्याला लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधा. अशी राखी त्याच्यासाठी शुभ फलदायी ठरेल.

कन्या (Virgo) : कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे तुमचा भाऊ कन्या राशीचा असेल तर त्याच्यासाठी गडद हिरव्या रंगाची राखी खरेदी करावी. गडद हिरव्या रंगाची राखी तुमच्या भावासाठी शुभ ठरेल. यामुळे भावाची रखडलेली सर्व कामं पूर्ण होण्यास मदत होईल.

तूळ (Libra) : तूळ राशीवर शुक्राचा प्रभाव असतो. जर तुमच्या भावाची रास तूळ असेल तर त्याच्या हातात गुलाबी रंगाची राखी बांधा. यामुळे तुमच्या भावाच्या जीवनात सुख समृद्धी येईल. हा रंग तुमच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी देखील गरजेचा आहे.

वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावाच्या हातात मरुन कलरची राखी बांधावी. यामुळे त्याच्यावरील संकटं दूर होतील आणि त्याच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. तसंच त्याला सकारात्मक ऊर्जाही मिळेल.

धनु (Sagittarius) : जर तुमचा भाऊ धनु राशीचा असेल तर त्याच्यावर गुरुचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही भावासाठी पिवळ्या रंगाची राखी खरेदी करावी. पिवळ्या रंगाची राखी बांधल्याने तुमचा भाऊ यशाच्या दिशेनं वाटचाल करेल. तसंच त्याला व्यावसायिक यश मिळेल.

मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. जर तुमचा भाऊ मकर राशीचा असेल तर त्याला निळ्या रंगाची राखी बांधावी. यामुळे त्याला जीवनात यश मिळेल.

कुंभ (Aquarius) : जर तुमचा भाऊ कुंभ राशीचा असेल तर त्याला गडद हिरव्या रंगाची राखी बांधावी. हा रंग त्याच्यासाठी शुभ आहे. गडद हिरव्या रंगाची राखी तुमच्या भावाच्या जीवाचं रक्षण करेल. तसंच तुमच्या भावासोबत चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत.

मीन (Pisces) : मीन राशीच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव असतो. त्यामुळे तुमच्या भावाची रास मीन असेल तर त्याच्यासाठी पिवळ्या रंगाची राखी खरेदी करावी. पिवळ्या रंगाच्या राखी तुमच्या भावाला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल.

First published: August 11, 2022, 6:00 AM IST

ताज्या बातम्या