- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला चुकूनही भावाला बांधू नका अशी राखी, खरेदी करताना काळजी घ्या

11 ऑगस्टला पूर्ण दिवस भद्र काल असल्याने 12 तारखेला रक्षाबंधन साजरा करण्याचं नियोजन केलं जात आहे.
- Trending Desk
- Last Updated: Aug 5, 2022 11:02 PM IST
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : श्रावण हा सणांचा महिना. या महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आदी महत्त्वाचे सण असतात. तसंच या महिन्यात शिव उपासना आणि व्रतवैकल्यं केली जातात. श्रावण (Shravan) महिन्यातल्या पौर्णिमेला रक्षाबंधन (Raksha Bandhan) अर्थात राखी पौर्णिमा साजरी केली जाते.
या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या हातात राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. ज्योतिषशास्त्रातही (Jyotish Shastra) या सणाला (Festival) विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त शुभमुहूर्तावर भावाला ओवाळणं शुभ फलदायी ठरतं, असं ज्योतिष अभ्यासक सांगतात. सध्या राखी पौर्णिमेनिमित्त बाजारात रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भावाला राखी बांधताना बहिणींनी काही गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे. भावाच्या कोणत्या हातात, कशा प्रकारची राखी बांधायची याविषयीचे नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
11 ऑगस्ट 2022 रोजी राखी पौर्णिमा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्टला सुरू होत असून, 12 ऑगस्टला सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. 11 ऑगस्टला पूर्ण दिवस भद्र काल असल्याने 12 तारखेला रक्षाबंधन साजरा करण्याचं नियोजन केलं जात आहे. राखी कशी असावी, भावाच्या हातावर कोणती राखी बांधावी, याचे नियम शास्त्रात सांगितले आहेत.
अनेकदा बाजारातून राखी खरेदी केल्यावर ती नकळत तुटते किंवा खराब होते. अशी राखी भावाला कदापि बांधू नये. हिंदू धर्मानुसार खराब राखी अशुभ समजली जाते. पूजा करतेवेळी तुटक्या वस्तू वापरू नयेत, असं शास्त्र सांगतं.
सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या, डिझाइन्सच्या (Design) राख्या उपलब्ध आहेत; मात्र राखी खरेदी करतेवेळी त्या राखीवर कोणतं अशुभ चिन्ह नाही ना याची खात्री करावी. सर्वसाधारणपणे लहान मुलांसाठी अशी राखी खरेदी केली जाते; पण अशी राखी शुभ नसते.
राखी पौर्णिमा हे पर्व बहीण (Sister) आणि भावाच्या (Brother) प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी बहिणी भावांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्यामुळे या दिवशी भावाला चुकूनही काळ्या रंगाची (Black Colour) राखी बांधू नये. काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे. शुभ कार्य किंवा गोष्टींसाठी या रंगाचा वापर केला जात नाही. त्यामुळे काळ्या रंगाची राखी बांधणं टाळावं.
अनेक जण देवाचे फोटो किंवा चित्रं असलेली राखी खरेदी करणं पसंत करतात. यामुळे देवाचा आशीर्वाद मिळतो, असा त्यांचा समज असतो. भावाच्या हातावर राखी दीर्घ काळापर्यंत बांधलेली राहते. अनेकदा त्यावर घाण लागू शकते किंवा राखी तूटून पडते. या दोन्ही गोष्टींमुळे देवाचा अपमान होतो. त्यामुळे देवाचे फोटो किंवा चित्र असलेली राखी बांधणं टाळावं, असं अभ्यासक सांगतात.