Vastu Tips : रजनीगंधाच्या रोपामुळे पती-पत्नीमध्ये वाढतं प्रेम, लावताना दिशा चुकवू नका

Vastu Tips : रजनीगंधाच्या रोपामुळे पती-पत्नीमध्ये वाढतं प्रेम, लावताना दिशा चुकवू नका

वास्तुशास्त्रानुसार, रजनीगंधा फूल आणि वनस्पती नीरस वैवाहिक जीवनात पुन्हा प्रेम पसरवते. मात्र, या रोपाची लागवड करताना दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : झाडे आणि वनस्पती पर्यावरण शुद्ध आणि वातावरण प्रसन्न करतात. त्यासोबतच झाडे-वनस्पतींशी मानवाचे नातेही घट्ट आहे. काही सुगंधी वनस्पती वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वास्तू दोष दूर होतात, घरात सुख-समृद्धी येते आणि नातेसंबंध मजबूत होतात. रजनीगंधा (Rajnigandha Plant) ही वनस्पती अशाच वनस्पतींपैकी एक आहे. रजनीगंधा वनस्पती वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत गुणकारी मानली जाते.

या वनस्पतीची लागवड केल्याने घरात सकारात्मकतेचा वास राहतो. जीवनात येणार्‍या अनेक समस्यांवरही रजनीगंधा रोपामुळे मात केली जाते. विशेषत: वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांसाठी रजनीगंधा वनस्पती सर्वोत्तम आहे. हे रोप घरामध्ये लावल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते आणि नातेसंबंध घट्ट होतात.

वास्तुशास्त्रानुसार, रजनीगंधा फूल आणि वनस्पती नीरस वैवाहिक जीवनात पुन्हा प्रेम पसरवते. मात्र, या रोपाची लागवड करताना दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घ्या, रजनीगंधा लागवडीची योग्य दिशा आणि त्याचे फायदे.

रजनीगंधाच्या रोपामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते -

सुखी वैवाहिक जीवन प्रत्येक व्यक्तीला हवे असते. पण कधी-कधी नात्यात कटुता येते आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही भांडणे सुरू होतात. याचे कारणही आपल्याला समजत नाही. वास्तविक, याचे एक कारण वास्तुदोष देखील असू शकते.

वास्तुशास्त्रानुसार यासाठी घरामध्ये रजनीगंधा रोप लावावे. घरामध्ये रजनीगंधाचे रोप लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो. यासोबतच पती-पत्नीच्या खोलीत रजनीगंधा फूल ठेवावे. यामुळे परस्पर प्रेम वाढते.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

या दिशेला रजनीगंधाचे रोप लावा -

रजनीगंधाची रोपे लावण्यासाठी वास्तूमध्ये योग्य दिशाही सांगितली आहे, त्यानुसार रजनीगंधाची रोपे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावी. तरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 13, 2022, 9:30 PM IST

ताज्या बातम्या