मराठी बातम्या /बातम्या /religion /

23 जानेवारीपासून लागणार राजपंचक; अशुभ नव्हे या प्रकारच्या कामांसाठी सुवर्णकाळ

23 जानेवारीपासून लागणार राजपंचक; अशुभ नव्हे या प्रकारच्या कामांसाठी सुवर्णकाळ

पंचक

पंचक

23 जानेवारीपासून पंचक सुरू होत आहे. जे पंचक सोमवारी येते त्याला राज पंचक म्हणतात. 23 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान राज पंचक असेल. राजपंचकातील कार्यांमुळे राज्य-सुख प्राप्त होते, असे मानले जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 22 जानेवारी : जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात पंचक होत आहे. सोमवार, 23 जानेवारीपासून पंचक सुरू होत आहे. जे पंचक सोमवारी येते त्याला राज पंचक म्हणतात. 23 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान राज पंचक असेल. राजपंचकातील कार्यांमुळे राज्य-सुख प्राप्त होते, असे मानले जाते. या योगात राज्याभिषेक होतो. यावर्षीची वसंत पंचमी याच योगात आहे. पंचकामध्ये काही शुभ कार्ये करणे वर्ज्य असल्याचे मानले जाते. पंचक कोणत्या नक्षत्रात येते, त्याचे परिणामही सांगितले आहेत. धनिष्ठा नक्षत्रात अग्नी, शतभिषा नक्षत्रात कलह, पूर्वाभाद्रपदात रोग, उत्तराभाद्रपदात आर्थिक शिक्षा आणि रेवती नक्षत्रात धनहानी होण्याची शक्यता असते.

काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचक 23 जानेवारी रोजी दुपारी 01.51 वाजता सुरू होत असून 27 जानेवारी रोजी सायंकाळी 06.37 वाजता समाप्त होत आहे. 25 जानेवारीला पंचक सोबतच भद्रकाळ ही पाळण्यात येत आहे. भद्रकाळात शुभ कार्ये वर्ज्य असतात. भद्रकाळ जर पाताळाचा किंवा स्वर्गाचा असेल तर त्याचा दुष्परिणाम पृथ्वीवर होत नाही.

जानेवारी 2023 मध्ये पंचक कधी आहे?

23 जानेवारी, सोमवार: धनिष्ठ नक्षत्रात दुपारी 01:51 पासून पंचक सुरू होईल. कुंभ राशीतील चंद्र.

24 जानेवारी, मंगळवार : संपूर्ण दिवस पंचक आहे.

25 जानेवारी, दिवस बुधवार: दिवसभर पंचक. भद्रा सकाळी 01:53 ते 07:13 पर्यंत.

26 जानेवारी, दिवस गुरुवार: दिवसभर पंचक.

27 जानेवारी, शुक्रवार: पंचक संध्याकाळी 06:37 वाजता संपेल.

पंचक कधी सुरू होते?

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ किंवा मीन राशीत असतो आणि त्या वेळी तो धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद किंवा रेवती नक्षत्र यांपैकी कोणत्याही एका नक्षत्रात असतो तेव्हा पंचक तयार होते. 23 जानेवारी रोजी दुपारी 01:51 वाजता चंद्र कुंभ राशीत असेल आणि त्या वेळी धनिष्ठा नक्षत्र असेल आणि दिवस सोमवार आहे. अशा स्थितीत 23 जानेवारीला राजपंचक होणार आहे.

राज पंचकमध्ये अशी कामे शुभ असतात

धार्मिक मान्यतेनुसार राज पंचकमध्ये धन आणि संपत्तीशी संबंधित कामे करण्यात यश मिळते. राज पंचकमध्ये सरकारी काम करणे यशस्वी आणि शुभ आहे. राज पंचक हा अशुभ मानला जात नाही. राज पंचक हा राजसुखाचा प्रदाता मानला जातो.

पंचकमध्ये काय करू नये -

1. शास्त्रानुसार धनिष्ठ नक्षत्रात पंचक असल्यास अग्नीपासून धोका संभवतो.

2. पंचकमध्ये दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे.

3. खाट किंवा पलंगाशी संबंधित कोणतीच कामे करू नये.

4. शक्य असल्यास पंचकमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत. करायचीच वेळ असेल तर त्याची पद्धत शास्त्रात सांगितली आहे.

5. पंचक काळात घराचे छप्पर घालू नये. (स्लॅब, माळा)

हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion