मराठी बातम्या /बातम्या /religion /

Rahu Ketu Upay: राहू-केतू मागे लागले की अडचणींचा गुंता वाढतो; या उपायांनी होईल तुमची सुटका

Rahu Ketu Upay: राहू-केतू मागे लागले की अडचणींचा गुंता वाढतो; या उपायांनी होईल तुमची सुटका

राहू-केतूची अशुभ चिन्हे ओळखून त्यासंबंधीचे उपाय करता येतात. या उपायांमुळे राहू-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि शुभ परिणाम वाढतात.

राहू-केतूची अशुभ चिन्हे ओळखून त्यासंबंधीचे उपाय करता येतात. या उपायांमुळे राहू-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि शुभ परिणाम वाढतात.

राहू-केतूची अशुभ चिन्हे ओळखून त्यासंबंधीचे उपाय करता येतात. या उपायांमुळे राहू-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि शुभ परिणाम वाढतात.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 सप्टेंबर : राहु-केतूला ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह म्हटलं गेलं आहे. पण, जेव्हा या दोन ग्रहांचा अशुभ प्रभाव एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीवर पडतो, तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या संकटांनी घेरले जाते. त्याच्या आयुष्यावर संकटाची छाया पसरू लागते. कुंडलीतील राहू-केतू दोषामुळे करिअरमधील अपयश, आजारपण, आर्थिक समस्या आणि मानसिक तणाव अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. राहू-केतूची अशुभ चिन्हे ओळखून त्यासंबंधीचे उपाय करतात येतात. या उपायांमुळे राहू-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि शुभ परिणाम वाढतात. ज्योतिष शास्त्रामध्ये हे उपाय अतिशय सोपे आणि चमत्कारी मानले गेले आहेत. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांनी सांगितलेले राहू-केतू दोष निवारणाचे उपाय जाणून घेऊया. राहू-केतू दोष असे ओळखा - राहू दोष असताना या समस्या उद्भवतात - राहू-केतूच्या अशुभ प्रभाव आणि दोषांमुळे शरीरात काही गंभीर समस्यांची लक्षणे दिसू लागतात. त्यांना ओळखून तुम्ही राहू-केतूचे उपाय करू शकता. यासोबतच या लक्षणांनंतर तुम्ही तुमची कुंडली ज्योतिषाला दाखवू शकता. यानंतर तुम्ही ज्योतिष उपाय करू शकता. ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, राहु अशुभ असल्यास व्यक्तीला मानसिक तणाव, आर्थिक नुकसान, वारंवार वस्तू गमावणे, रागावर नियंत्रण न राहणे, मेलेले साप, सरडे आणि पक्षी दिसणे, नखे कमकुवत होणे, कौटुंबिक कलह आणि समस्या उद्भवू शकतात. जसे कोर्ट-कचेऱ्या मागे लागतात. केतू दोष असताना या समस्या उद्भवतात - ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये केतू ग्रहाचा अशुभ प्रभाव असेल तर त्याला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. केस गळणे, सांधेदुखी, त्वचेचे आजार, मणक्याचे आजार, नसा कमकुवत होणे यासारख्या अनेक आजारांची शक्यता वाढते आणि त्यामुळे संबंधित समस्या वाढतात. राहू-केतू दोष दूर करण्याचे उपाय - देवी भगवतीची उपासना केल्याने राहु-केतूचे दोष दूर होतात कारण देवी दुर्गाला छाया रूपेण म्हणतात आणि राहू-केतू हा छाया ग्रहही आहे. राहु-केतू ग्रहांचे अशुभ प्रभाव देवी दुर्गेच्या उपासनेने कमी होतात. घरामध्ये शेषनागावर नाचणाऱ्या श्रीकृष्णाचे चित्र ठेवा आणि नियमित पूजा करा. पूजेदरम्यान 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे राहू-केतू दोषाचा प्रभावही कमी होतो. राहू-केतूशी संबंधित बीज मंत्रांचा जप केल्याने दोषही दूर होतात. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं राहु-केतूचा अशुभ प्रभाव गरीब मुलीचे लग्न लावून दिल्याने किंवा लग्नात सहकार्य केल्यानेही कमी होतो. रविवारी मुलींना दही आणि खीर खाऊ घातल्याने केतू दोष दूर होतो. जर तुमच्या कुंडलीत केतू दोष असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा. राहूचे रत्न गोमेद आहे. राहुदोष असल्यास हे रत्न ज्योतिषशास्त्राच्या मदतीने शनिवारी धारण करावे. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Astrology and horoscope, Religion

पुढील बातम्या