मुंबई, 6 डिसेंबर : आता राहू ग्रहाला घाबरण्याची अजिबात गरज नाही .राहू ग्रहा विषयी अनेक समज गैरसमज आहेत. राहू ग्रह हा आपल्याला खूप काही देतो .उगीच लोकांनी राहू ग्रहाविषयीच्या गैर समजुती पसरवल्या आहेत. तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 4 येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 4 ,13 ,22, 31 या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.राहू ग्रहाला घाबरणे सोडून दिले पाहिजेल. तसेच राहू ग्रहाच्या अनेक गोष्टी आपल्याला यश संपादन करून देतात. राहू ग्रह पत्रिकेत उत्तम असेल तर राहू ग्रह अमाप पैसे सुद्धा देतो .
4 मूल्यांक : समजा जातकाचा जन्मदिनांक हा १3 मे 1991 आहे तर 13 या दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय.
13 = 1 +3 =4 = मूल्यांक.
4 या अंकाचा ग्रह राहू आहे.
जाऊन घेऊयात 4 मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये:
9 ग्रहांचे आशीर्वाद मिळण्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
हे जातक शिस्तप्रिय असतात.नृत्य व संगीत प्रिय असतात .4 मूल्यांकाचे लोक जीवनाप्रती सकारात्मक दृष्टी ठेवणारे असतात. हे जातक अकस्मित भीतीत असतात. खूप अति विचार करतात. सल्लागारची भूमिका उत्तम रीतीने पार पाडतात . हातात घेतलेल्या कामाला नियोजन बद्ध पद्धतीने पूर्ण करतात. ही लोक जोखीम घेणारी असतात.खूप जास्त अहंकारी असतात हे जातक .समाज हिताची काम करण्यात अग्रेसर असतात.यांच्या सर्व कामाचे नियोजन असते .कितीही अशक्य काम पूर्ण करण्याची क्षमता यांच्यात असते .कठोर स्वभावाचे असतात .खूप जास्त हट्टी असतात .खूप प्रामाणिक असतात .मूल्यांक 4 च्या व्यक्तिमध्ये अहंकार खूप असतो. स्पष्ट बोलणारे असतात त्यामुळे जवळची लोक दुखावली जातात .आकस्मित भीती सारखी यांच्या मनात असते .यांना श्वासनाचे विकार होतात . जमिनीवरून आकाशात आणि आकाशावरून जमिनीवर आणतो राहू ग्रह . एका रात्रीत श्रीमंत करणारा व एकाच रात्रीत गरीब करणारा ग्रह राहू असतो .
4 मूल्यांकाचा
शुभ अंक - 1 ,5 ,6
अशुभ अंक -2 , 8 ,9
शुभ वार - रविवार ,सोमवार
अशुभ वार - मंगळवार
शुभ रंग - लाल ,सफेद ,हिरवा ,पिवळा
अशुभ रंग - काळा
लाभदायी व्यवसाय -
बँकिंग ,संशोधन क्षेत्र , वकिली ,पोलीस
लाभकारी रत्ना - नीलम
उपासना – शनी मंत्र जाप .काळ्या कुत्र्याला पोळी देणे .
मूल्यांक 4 चे प्रसिद्ध व्यक्ति - बराक ओबामा ,सरदार वल्लभ भाई पटेल ,श्रीदेवी , प्रीती जिंठा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.