मराठी बातम्या /बातम्या /religion /

तुमच्या मागे लागलेल्या त्रासांचे कारण राहु दोष असू शकतो, हे सोपे उपाय करून बघा

तुमच्या मागे लागलेल्या त्रासांचे कारण राहु दोष असू शकतो, हे सोपे उपाय करून बघा

ग्रहदोषांमुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या येतात. सुरू असलेली कामेही कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडतात. व्यवसायात नुकसान होते. ग्रह दोष दूर करण्याचे उपाय जाणून घ्या.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 23 सप्टेंबर : आपल्या जीवनात नवग्रहांचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहांची हालचाल आणि स्थिती ही आपल्या जीवनात घडणाऱ्या क्रियांचा मुख्य घटक आहे. कुंडलीतील ग्रहांची प्रतिकूल स्थिती ग्रह दोषांना जन्म देते. ग्रहदोषांमुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या येतात. सुरू असलेली कामेही कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडतात. व्यवसायात नुकसान होते. अशा स्थितीत ग्रह दोष दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी शास्त्रात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. राहू-केतूचा छाया ग्रह - ज्योतिषांच्या मते राहू-केतूला कुंडलीत छाया ग्रह म्हणतात. राहू दोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडथळे येतात. माणसाला मेहनत करूनही यश मिळत नाही. घरातील सदस्यांमध्ये ताण-तणावाचे वातावरण राहते. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. शास्त्रातील उपायांनी राहू दोष दूर करता येऊ शकतो. राहू दोष दूर करण्याचे उपाय - राहू दोष दूर करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दररोज सकाळी स्नान केल्यावर राहु मंत्राचा 108 वेळा जप केल्याने राहू दोष समाप्त होतो. राहूचा मंत्र आहे - ऊँ रां राहवे नम: तसेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू दोष आहे, त्यांनी भगवान शिव आणि नारायण यांची पूजा करावी. यासाठी पाण्यामध्ये काळे तीळ टाकून शनिवारी आणि सोमवारी शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे राहू आणि केतू शांत होतात. दररोज आंघोळीच्या वेळी पाण्यात कुश टाकावा. त्यानंतर त्या पाण्याने स्नान करावे. यामुळे कुंडलीतून राहू दोष दूर होतो. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं बुधवारी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्याने राहू दोष संपतो. शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. राहू दोष दूर करण्यासाठी गोमेद रत्न धारण करणे शुभ असते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Religion, Vastu

पुढील बातम्या