पुणे, 4 जुलै : माणसाचे भविष्य जाणून घेण्याची पद्धत म्हणजे ज्योतिष. ज्योतिषशास्त्रामध्ये सुरुवातीला पुरुषांचं वर्चस्व होत, परंतु आज 21 व्या शतकामध्ये अनेक स्त्रिया पुढे येऊन ज्योतिष विद्येचा अभ्यास करत असल्याचं पाहायला मिळतंय. आज आपण एका अशा महिला ज्योतिषाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी देशातीलच नव्हे तर परदेशातील स्त्रियांना देखील ज्योतिष विद्देचे धडे दिलेले आहेत. कशी झाली सुरुवात? पुण्यातील चिंचवडमध्ये राहणाऱ्या अर्चना डोबा या पिंपरी चिंचवड शहरातील महिला ज्योतिषी आहेत. ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ, एनएलपी जीवन प्रशिक्षक वास्तु, अंकशास्त्र आणि ग्राफोलॉजीमध्ये त्या तज्ञ आहेत. त्यांचा आध्यात्मिक प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. अर्चना यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि विज्ञानातील देवत्वाबद्दल सखोल ज्ञान मिळविण्यासाठी विषयांवर सखोल संशोधन केले.
परदेशामध्ये जाऊन ज्योतिषविद्येचं शिक्षणनंतर त्यांनी या ठिकाणी येऊन अनेक महिलांना ज्योतिष विद्येचं प्रशिक्षण दिलं. आतापर्यंत त्यांनी 1000 हुन महिलांना ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ, एनएलपी जीवन प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यामधील बहुतांश महिला या परदेशातील आहेत. एनएलपी जीवन प्रशिक्षण काळाची गरज असून प्रत्येक महिलेने प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, असं अर्चना डोबा म्हणतात. एनएलपी म्हणजे नेमकं काय ? अध्यात्म आणि मानसिकता माणसाला वेगवेगळ्या समस्यांपासून दूर नेऊ शकतात. एनएलपी हा एक असा अभ्यास आहे जो संपूर्णपणे विज्ञान नसूनही जवळपास परफेक्ट रिझल्ट देतो, असा दावा त्या करतात. मानवी वर्तन आणि मेंदू यांचा परस्पर संबंध जाणून माणसाचं जगणं यशस्वी करण्यासाठी त्याच्या सर्व क्षमता जागृत करुन कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट व्हायला शिकवणारा हा अभ्यास आहे. एनएलपी म्हणजे न्युरो लिग्विंस्टिक प्रोग्रॅमिंग मेंदूची भाषा आणि तिचे प्रोग्रॅमिंग मेंदूला कॉम्प्युटरप्रमाणे समजावण्याचा प्रयत्न आहे.
कुंभ राशीच्या लोकांचे कसे आहे भविष्य? आगामी काळात बदलणार का नशीब? Video
सूचनांनी मेंदू प्रोग्रॅम होतो आणि आऊटपुट देत रहातो. आपला कॉम्प्युटर काळ बदलला दशके बदलली तरी जोवर आपण प्रोग्रॅमिंग बदलत नाही तोवर जुनेच आऊटपुट देत रहातो आणि आपलं आयुष्य तसंच गोल गोल फिरत रहातं. पंचेंद्रियांमार्फत आजूबाजूची माहीती आत जाते तिथे प्रोसेसिंग होतं आणि त्यानंतर घटना प्रसंगांना आपण प्रतिसाद देतो. आत तयार झालेला नकाशा (समजुती बिलिफ्स) माणसाचं वर्तन कंट्रोल करतो आणि बाहेरचं जग प्रत्यक्षात वेगळं असू शकतं इथेच या अभ्यासाची आणि माणसाच्या परस्परसंबंधांची, सुखदुःखाची मेख आहे. मेंदूची ही काम करण्याची पध्दत आपण मेंदूला सूचना देण्याचे तंत्र तसंच स्वसंवाद करण्याचे कौशल्य अशा सर्व बाजूंनी स्वतःमधे सकारात्मक आणि उपयुक्त बदल करणारा हा एक अभ्यास आहे, असं अर्चना डोबा सांगतात. ज्योतिष क्षेत्रात महिलांना संधी आजच्या 21 व्या शतकात अशा काही स्त्रिया आहेत, ज्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात, त्याबद्दल सल्ले देतात. कोणतीही विद्या, शास्त्र हे माणसाने, माणसाच्या प्रगतीसाठी निर्मिलेलं आहे ते कधीच स्त्री-पुरुष किंवा अन्य कोणतेही भेद करत नाही. उलट ही शास्त्रे, वेद, विद्या ही माणसाच्या उन्नतीसाठी निर्मिली आहेत. माणसाचं अधःपतन होऊ नये म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे यात स्त्री पुरुष अशा कुठलाही भेद नसतो. या क्षेत्रात स्त्रियांना मोठी संधी असून घरबसल्या गृहिणी देखील यामध्ये काम करू शकतात, असं अर्चना डोबा यांनी सांगितलं.

)







