मराठी बातम्या /बातम्या /religion /

अंगणातील नारळाचं झाड घरात आणतं सुख-समृद्धी, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं

अंगणातील नारळाचं झाड घरात आणतं सुख-समृद्धी, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं

नारळाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व

नारळाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व

भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी अंगणात नारळाचं झाड असल्यास त्याचे काय फायदे होतात, याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 नोव्हेंबर : हिंदू धर्मात नारळाचं झाड शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. याशिवाय हिंदू धर्मातील बहुतांश पूजांमध्ये नारळाचं पूजन केलं जातं. सनातन धर्मात नारळाला श्रीफळ असं नाव आहे. जुन्या मान्यतेनुसार, नारळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचा वास असतो. हिंदू धर्मातील कोणत्याही पूजेत किंवा शुभ कार्यात नारळ वापरणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये नारळाचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते उपाय योग्यप्रकारे केल्यास व्यक्ती आपलं नशीब बदलू शकते. वास्तूनुसार ज्या घरात नारळाचं झाड लावलं जातं त्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी अंगणात नारळाचं झाड असल्यास त्याचे काय फायदे होतात, याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी

वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचं झाड लावावं. वास्तूनुसार अंगणात नारळाचं झाड लावल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते, तसंच घरातील आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते. याशिवाय घरात सुख-समृद्धीही येते. अंगणाच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला नारळाचं झाड लावणं नेहमीच शुभ मानलं जातं.

हे वाचा - महादेवाला का अर्पण केली जातात बेलाची पानं? असं आहे त्यामागील धार्मिक महत्त्व

समस्यांपासून मुक्त होण्यासाठी

तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर नारळाचा उपाय करणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यावा लागेल. तो नारळ आपल्या डोक्यावरून 21 वेळा फिरवून घ्या. नंतर तो देवीच्या मंदिरात जाऊन जाळा. दर मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करा. असं केल्यानंतर काही दिवसांनी ती समस्या तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. हा उपाय केल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते.

नारळात आहेत प्रोटिन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स

नारळात अनेक प्रकारचे प्रोटिन्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात, असं मेडिकल सायन्स सांगतं. नारळाचं पाणी पोटासोबतच आपला मेंदूही थंड ठेवतं. नारळात पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय फळ म्हणूनही तुम्ही नारळ खाऊ शकता. नारळाचं फळ काढून तुम्ही ते कापून शिजवू शकता आणि त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकता. या शिवाय अनेक प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी नारळाच्या फळाचा वापर केला जातो. नारळापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात. अशाप्रकारे नारळाचे वास्तूशास्त्रानुसार आणि मेडिकल सायन्सनुसार अनेक फायदे आहेत.

First published:

Tags: Religion, Vastu