मराठी बातम्या /बातम्या /religion /

Sarva Pitru Amavasya 2022: सर्वपित्री दर्श अमावस्येला करा हे सोपे उपाय, घरात येईल सुख-शांती आणि समृद्धी

Sarva Pitru Amavasya 2022: सर्वपित्री दर्श अमावस्येला करा हे सोपे उपाय, घरात येईल सुख-शांती आणि समृद्धी

भाद्रपद महिन्यातील अमावास्येला पितृ पक्ष संपतो. या अमावस्येला सर्वपित्री दर्श अमावस्या म्हणतात. 25 सप्टेंबर रोजी सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 21 सप्टेंबर : पितृपक्षात पूर्वजांची पूजा आणि पिंडदान केले जाते. पितृ पक्षातील श्राद्ध विधीने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबाला आरोग्य, सुख आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देतात. श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, म्हणून प्रत्येकाने आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म केलेच पाहिजे, असे सांगितले जाते. भाद्रपद महिन्यातील अमावास्येला पितृ पक्ष संपतो. या अमावस्येला सर्वपित्री दर्श अमावस्या म्हणतात. 25 सप्टेंबर रोजी सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी विशेष उपाय करून पितरांना प्रसन्न करता येते. जेणेकरुन सदैव त्याचे कुटुंबावर आशीर्वाद राहतील आणि घरात सुख-शांती राहील. जाणून घेऊया सर्वपित्री अमावस्येशी संबंधित या खास उपायांबद्दल. अमावस्येला पूर्वज होतील प्रसन्न - पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या माहितीनुसार, पितृ पक्ष अमावस्येला काही विशेष उपाय करून पितरांना संतुष्ट करता येते. या दिवशी ज्ञात-अज्ञात पितरांचे श्राद्ध केले जाते. या उपायांनी प्रसन्न होऊन पूर्वज कुटुंबाला आशीर्वाद देतात. हे उपाय करा - गायीला हिरवा पालक खाऊ घाला - ज्योतिषांच्या मते, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी हिरवा पालक गायीला खायला घालावा. पितृपक्षात गायीला चारा, खाऊ घातल्याने विशेष फळ मिळते, असे म्हणतात. हे वाचा - Pitru Paksha 2022 : पितृपक्षात तुम्ही खाऊ नका आणि पितरांनाही दाखवू नका; या 5 पदार्थांमुळे लागू शकतो पितृदोष पिंपळाच्या झाडाची पूजा - सर्वपित्री अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पिंडदान/तर्पण - धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी. पितृ पक्षात पिंडदान-तर्पणला खूप महत्त्व आहे. यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. हे वाचा - Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात कावळे इतके महत्त्वाचे का? त्यांनाच का दिलं जातं अन्न?
दान-धर्म ज्योतिषांच्या मते, सर्व पितृ अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. सर्वपित्री अमावस्येला ब्राह्मणाला दान करावे. तसेच चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. यामुळे पूर्वज समाधानी राहतात, असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Pitru paksha, Religion

पुढील बातम्या