मराठी बातम्या /बातम्या /religion /

Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात कावळे इतके महत्त्वाचे का? त्यांनाच का दिलं जातं अन्न?

Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात कावळे इतके महत्त्वाचे का? त्यांनाच का दिलं जातं अन्न?

पितृपक्षात श्राद्ध घालण्यास नेमकी सुरूवात कशी झाली याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.

पितृपक्षात श्राद्ध घालण्यास नेमकी सुरूवात कशी झाली याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.

यंदा पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरु होत असून 25 सप्टेंबर पर्यंत आहे. पितृ पक्ष पितरांना पिंड दान केले जाते आणि कावळ्यांना भोजन दिले जाते. कावळ्याने अन्नाला स्पर्श एवढे का महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 8 सप्टेंबर : हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि वंशजांचे रक्षण करतो. पितृ पक्षात या पितृदेवांचे आवाहन केले जाते. यंदा पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरु होत असून 25 सप्टेंबर पर्यंत आहे. पितृ पक्ष पितरांना पिंड दान केले जाते. तुमच्या कुंडलीत पितृ दोष असेल तर पितृ पक्षात काही उपाय केल्याने तो दूर होतो. पितृ पक्षात पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कावळ्यांना भोजन देण्याची प्रथा आहे. कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्याशिवाय ते पितरांपर्यंत पोहोचत नाही असा समज आहे.

पितरांना पिंड दान केवळ पितृ पक्षातच केले जाते असे नाही, ते कधीही करता येऊ शकते. परंतु पितृ पक्षात केलेले पिंडदान खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे पितरं संतुष्ट होतात आणि वारसांना शुभ आशिर्वाद देतात. पितृपक्षात पिंडदान केल्यानंतर कावळ्यांना नैव्यद्य दाखवला जातो. धार्मिक मान्यतांनुसार कावळ्यांना मृत्यू देव यमराज यांचे दूत मानले जाते. त्यामुळे कावळ्यांना नैवद्य दाखवल्याने आणि त्यांचा स्पर्श झाल्याने तो पितरांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे. कावळ्यांशिवाय गायीला देखील नैव्यद्य दाखणवण्यी प्रथा आहे. धार्मिक मान्यतांनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे तिला नैव्यद्य दाखवल्याने पितरं संतुष्ट होतात.

Pitra Dosh: पितृदोष असेल तर घरात अशा समस्या निर्माण होतात, वेळीच ओळखून करा उपाय

कावळ्यांना अन्न का दिले जाते?

एका पौराणिक कथेनुसार इंद्रपूत्र जयंतने एकदा कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायाला जखम केली. त्यामुळे प्रभू राम संतप्त झाले आणि त्यांनी ब्रह्मास्त्राचा वापर करून त्याचे डोळे फोडले. त्यानंतर जयंतने प्रभू रामाकडे क्षमा याचना केली. त्यानंतर प्रभू रामांनी त्याला माफ केले आणि त्याला एक वरदान दिले. श्री राम जयंतला म्हणाले की या भूतलावर कोणीही तुला अर्पण केलेलं अन्न त्यांच्या पितरांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे कावळ्यांना भोजन देणे अतिशय पुण्याचे काम मानले जाते. कावळ्यांनी केलेले भोजन पितरांपर्यंत पोहोचते आणि ते संतुष्ट होऊन आशिर्वाद देतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच पितृ पक्षात कावळ्याने नैव्यद्य ग्रहण करून गायीच्या पाठीवर चोच रगडली तर तुमचे कार्य सत्करणी लागले असे मानले जाते.

Pitru Paksh 2022 : पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

पितृ दोषही होतो दूर

पितृ पक्षात कावळ्याला भोजन दिल्याने पितरं तर प्रसन्न होतातच शिवाय यामुळे तुमच्या कुंडलीत असलेला पितृदोष देखील दूर होऊ शकतो. तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तुम्ही पितृ पक्षात पिंडदान केल्यास आणि कावळ्यांना त्याला स्पर्ष केल्यास तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. तसेच तुम्ही ठेवलेला नैवेद्य कावळ्याने स्विकार केला आणि ग्रहण केला तर मृत्यू देव यमराजही प्रसन्न होतात अशी देखील मान्यता आहे. याशिवाय कावळ्यांनी अन्न स्पर्ष केल्यास कुंडलीतील पितृदोषासोबत कालसर्प दोषही दूर होतो असे देखील मानले जाते.

First published:

Tags: Lifestyle, Pitru paksha, Religion