Pitru Paksh 2022 : कधी पासून सुरु होतोय पितृपक्ष? कोणकोणत्या तारखांना होईल पिंडदान?

Pitru Paksh 2022 : कधी पासून सुरु होतोय पितृपक्ष? कोणकोणत्या तारखांना होईल पिंडदान?

असे मानले जाते की पितृ पक्षाच्या दिवसात म्हणजे श्राद्ध, मृत्यूचा देव यमराज पितरांच्या आत्म्यांना मुक्त करतो जेणेकरून ते त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन तर्पण घेऊ शकतात.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : असे मानले जाते की आपले पूर्वज त्यांचे शरीर सोडतात. त्यानंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात तर्पण केले जाते. या विधीला श्राद्ध असेही म्हणतात. श्राद्ध म्हणजे श्रद्धा. असे मानले जाते की पितृ पक्षाच्या दिवसात म्हणजे श्राद्ध, मृत्यूचा देव यमराज पितरांच्या आत्म्यांना मुक्त करतो जेणेकरून ते त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन तर्पण घेऊ शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षात पितरांना नमस्कार केल्याने पितृदोष दूर होतो. ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत पितृ दोष असतो त्यांना जीवनात समस्यांना सामोरे जावे लागते. आदर मिळत नाही. पैसा वाचत नाही. तसेच रोग आणि अडथळे त्यांची पाठ सोडत नाहीत. त्यामुळे पितृपक्षात पितरांना नमस्कार केल्याने पितृदोष दूर होऊन संकटांपासून मुक्ती मिळते.

कधी आहे पितृपक्ष?

पितृपक्षातील पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्याच्या 15 दिवसांच्या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध विधी करतात. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

Astro Tips: नशीब कधीही दगा नाही देणार, हे 5 ज्योतिषीय उपाय नियमित करून बघा

या तारखांना श्राद्ध केले जाईल

पौर्णिमा श्राद्ध भाद्रपद, शुक्ल पौर्णिमा : 10 सप्टेंबर 2022

प्रतिपदा श्राद्ध, अश्विन, कृष्ण प्रतिपदा : 11 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण द्वितीया : 12 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण तृतीया : 13 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण चतुर्थी : 14 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण पंचमी : 15 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण षष्ठी : 16 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण सप्तमी : 17 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण अष्टमी : 18 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण नवमी : 19 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण दशमी : 20 सप्टेंबर 2022

घरातील जुना झाडू फेकताना या चुका टाळा; योग्य दिवस आणि नियम जाणून घ्या

अश्विन, कृष्ण एकादशी : 21 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण द्वादशी : 22 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण त्रयोदशी : 23 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण चतुर्दशी : 24 सप्टेंबर 2022

अश्विन, कृष्ण अमावस्या : 25 सप्टेंबर 2022

Published by: Pooja Jagtap
First published: August 20, 2022, 6:15 AM IST

ताज्या बातम्या