पिंपळाशी संबंधित हे 5 उपाय माणसाचं नशीब बदलवून टाकतात; सुटतात अनंत अडचणी

पिंपळाशी संबंधित हे 5 उपाय माणसाचं नशीब बदलवून टाकतात; सुटतात अनंत अडचणी

पिंपळ वृक्षाविषयी धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की, पिंपळ वृक्ष हा देवांचाही देव आहे. जो व्यक्ती या झाडाची पूर्ण भक्तीभावाने सेवा करतो, त्याला निश्चितच लाभ होतो, असे मानले जाते. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : सनातन धर्मात निसर्गाशी संबंधित अनेक गोष्टींचे महत्त्व सांगितले आहे. ज्यामध्ये झाडे-वनस्पती, नद्या, फळे आणि फुलांचाही समावेश आहे. या सर्वांच्या पूजेची किंवा उपासनेत त्यांचा उपयोग याबद्दल धार्मिक ग्रंथांत माहिती मिळते. त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षाविषयी धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की, पिंपळ वृक्ष हा देवांचाही देव आहे. जो व्यक्ती या झाडाची पूर्ण भक्तीभावाने सेवा करतो, त्याला निश्चितच लाभ होतो, असे मानले जाते. ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी पिंपळाच्या झाडाचे उपाय आणि फायदे सांगितले आहेत, ज्यामुळे आपले नशीब (Astrological Remedies of Pimpal) उजळेल.

नशीब चमकण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे उपाय -

1. जो कोणी व्यक्ती पिंपळाचे झाड लावतो आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतो, त्याच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. जसजसे हे पिंपळाचे झाड मोठे होत जाते तसतसे आपल्या कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल.

2. जर तुमचे कोणाशी शत्रुत्व असेल आणि तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसा पाठ करा. या उपायामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूंशी संबंधित सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल, तसेच तुमच्या शत्रूंचा नाश होईल.

3. जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाखाली शिवलिंग स्थापित केले आणि त्या शिवलिंगाची नियमित पूजा केली तर सर्व समस्या दूर होतात. या उपायाने वाईट काळ दूर होतो.

4. शनिदोष, शनीची साडेसाती आणि शनीचा वाईट प्रभाव नाहीसा करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून मोहरीच्या तेलाचे पीठाचे दिवे लावून सात वेळा प्रदक्षिणा घालावी.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

5. जर कोणी हात-पाय दुखणे आणि पाठदुखीने त्रस्त असाल. तुमच्या शरीरात वेदना होत असतील आणि तुम्हाला थकवा जाणवतो, तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाची मुळे किंवा त्याचे छोटे लाकूड एका काळ्या कपड्यात बांधून ते तुमच्या पलंगाच्या उशाखाली ठेवावे. परंतु, हे उपाय करताना वरील गोष्टीही करायला हव्या. या एकेरी उपायाचा परिणाम वरील काही गोष्टी केल्यासच दिसू शकतो. काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरातील वेदना दूर होत आहेत आणि तुम्ही वेदनामुक्त होत आहात.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 3, 2022, 7:00 PM IST

ताज्या बातम्या