मुंबई, 27 मार्च: सध्या चैत्र नवरात्र सुरू असून 29 मार्च रोजी महाष्टमी आहे आणि चैत्र नवरात्रीची समाप्ती 30 तारखेला श्रीराम नवमीने होईल. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गापूजेबरोबरच लहान मुलींचीही पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबत रामायणाचे पठण करावे आणि रामनामाचा जप करावा.
ज्योतिषाचार्यांच्या मते, नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत अष्टमी आणि नवमी तिथीला लहान मुलींना जेवण दिले जाते. असे मानले जाते की लहान मुलीदेखील देवी दुर्गेचे रूप आहेत. तिची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
अशा प्रकारे करा कन्यापूजन
अष्टमी-नवमी तिथींना लहान मुलींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना जेवायला बोलावले पाहिजे. शास्त्रानुसार नऊ मुलींना बोलावावे. आपल्या घरी मुली आल्या की त्यांना आसनावर बसवा. सर्व मुलींचे पाय धुवा.
मुलींच्या कपाळावर कुमकुम लावून तिलक लावावा. फुलांचे हार घालावेत. त्यानंतर संपूर्ण श्रद्धेने जेवण वाढावे.
जेवणानंतर मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार दक्षिणाही द्यावी. भेटवस्तूदेखील देऊ शकतात.
नवीन कपडे, अभ्यासाशी संबंधित वस्तू, शूज आणि चप्पल, मेकअपच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
देवी भागवत पुराणात मुलींना देवीचे स्वरूप सांगितले आहे.
श्रीमद देवी भागवत महापुराणातील तिसऱ्या मंत्रात मुलींचा उल्लेख आहे. या पुराणात दोन वर्षांची मुलगी कुमारी, तीन वर्षांची मुलगी त्रिमूर्ती, चार वर्षांची मुलगी कल्याणी, पाच वर्षांची मुलगी रोहिणी, सहा वर्षांची मुलगी कालिका, सात वर्षांची मुलगी चंडिका, आठ वर्षांची मुलगी शांभवी असे लिहिले आहे. नऊ वर्षांची मुलगी दुर्गेचे रूप आहे आणि दहा वर्षांची मुलगी सुभद्रा देवीचे रूप आहे.
श्रीरामनवमीला कोणती शुभ कार्ये करावीत
चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्रीरामाचा प्रकट उत्सव साजरा केला जातो. त्रेतायुगातील या तिथीला राजा दशरथाच्या घरी भगवान विष्णूचा श्रीराम म्हणून जन्म झाला. चैत्र नवरात्रीची समाप्तीही नवमी तिथीला होते.
दुर्गा देवीची विधिवत पूजा करा. धूप-दीप लावून देवी मंत्र दूं दुर्गाय नमः मंत्राचा जप करा.
श्रीराम नवमीला रामजींची विशेष पूजा करा. रामायण पाठ करा. राम नामाचा जप करा. श्रीरामाचे परम भक्त हनुमानजींची आराधना करा.
हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करा. इच्छित असल्यास, हनुमान जी ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion