मराठी बातम्या /बातम्या /religion /नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच आहे पुत्रदा एकादशी; उपवासाचे महत्त्व, शुभ वेळा जाणून घ्या

नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच आहे पुत्रदा एकादशी; उपवासाचे महत्त्व, शुभ वेळा जाणून घ्या

पुत्रदा एकादशी पूजा वेळ

पुत्रदा एकादशी पूजा वेळ

Pausha Putrada Ekadashi 2023: पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत पाळल्याने आणि परंपरेनुसार विष्णूची पूजा केल्यानं पुत्रप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 डिसेंबर : संततीप्राप्तीसाठी लोक अनेक व्रत-उपवास करतात, पण यासाठी पौष पुत्रदा एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत पाळल्याने आणि परंपरेनुसार विष्णूची पूजा केल्यानं पुत्रप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. निपुत्रिक जोडप्यांनी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करावे. धर्मराज युधिष्ठिराला पौष पुत्रदा एकादशी व्रताचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की, या दिवशी भगवान नारायणाची पूजा केली जाते. हे व्रत पाळल्याने राजा सुकेतुमानला पुत्रप्राप्ती झाली. तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगतात की, यावर्षी पौष पुत्रदा एकादशीला साध्य, शुभ आणि रवि योग हे तीन शुभ योग तयार होत आहेत.

पौष पुत्रदा एकादशी 2022

पौष शुक्ल एकादशीची सुरुवात: 01 जानेवारी, रविवार, संध्याकाळी 7.11 पासून

पौष शुक्ल एकादशी तिथी समाप्त: 02 जानेवारी, सोमवार, रात्री 8:23 वाजता

पौष पुत्रदा एकादशी पारण वेळ: 03 जानेवारी, मंगळवार, सकाळी 07:14 ते 9:19 दरम्यान

रवी, शुभ आणि साध्य योगात पौष पुत्रदा एकादशी

02 जानेवारीला पौष पुत्रदा एकादशीला रवि, शुभ आणि साध्य नावाचे तीन योग तयार होत आहेत. सर्वप्रथम रवि योगाबद्दल बोलूया. हा योग सकाळी 07:14 पासून सुरू होईल आणि दुपारी 02:24 पर्यंत राहील. रवि योगात सूर्याचा प्रभाव अधिक असतो. हा योग अशुभ प्रभाव दूर करतो. या योगात तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता.

उपवासाच्या दिवशी सकाळपासूनच साध्ययोग सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:53 पर्यंत वैध असेल. जर तुम्हाला या योगामध्ये कोणती विद्या शिकायची असेल तर त्यासाठी चांगली वेळ आहे, कारण तुम्हाला त्यात यश मिळेल.

पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी 6.53 वाजता शुभ योग सुरू होईल. या योगाच्या नावावरून कळू शकते की या योगात तुम्ही शुभ कार्य करू शकता. या योगात केलेल्या कार्यामुळे कीर्ती आणि यश मिळते.

भद्रकाळामध्ये पूजा करता येते -

पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी भद्रकाळ सकाळी 07.43 ते रात्री 08.23 पर्यंत असते. भद्रकाळ अशुभ मानला जातो, त्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तथापि, भद्रकाळात तुम्ही पूजा, मंत्र जप, ध्यान इत्यादी करू शकता. या क्रिया प्रतिबंधित नाहीत.

हे वाचा - पूजा-विधी करताना या वस्तू थेट जमिनीवर नसतात ठेवायच्या; मानला जातो देवांचा अपमान

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Ashadhi Ekadashi, Lifestyle, Religion