मुंबई, 18 मार्च : आज पापमोचनी एकादशी आहे. पापमोचनी एकादशी व्रत दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. होळीनंतरची ही पहिली एकादशी आहे. इतर एकादशींप्रमाणे पापमोचनी एकादशीच्या दिवशी लोक भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात. हे व्रत केल्यानं मनुष्याला अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. पापमोचनी एकादशीच्या आख्यायिकेत असे सांगितले जाते की, अप्सरा मंजुघोषाने पापमोचनी एकादशीचे व्रत करून पिशाच योनीपासून मुक्ती मिळवली होती. ती तिच्या पापांपासून मुक्त झाली. भगवान श्रीकृष्णाने पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगताना धर्मराज युधिष्ठिराला कथा सांगितली होती. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घ्या पापमोचनी एकादशीचे व्रत कधी आहे, पूजा मुहूर्त आणि पारणाची वेळ कोणती?
पापमोचनी एकादशी 2023
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख शुक्रवार, 17 मार्च रोजी दुपारी 02.06 पासून सुरू होत आहे आणि ही तिथी शनिवार 18 मार्च रोजी सकाळी 11.13 पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या आधारे 18 मार्च रोजी पापमोचनी एकादशीचे व्रत-उपवास पाळले जाणार आहे.
पापमोचनी एकादशीला चार शुभ योग -
पापमोचनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासह चार शुभ योग तयार झाले आहेत. या दिवशी सकाळपासून रात्री 11.54 पर्यंत शिवयोग असून त्यानंतर सिद्धयोग सुरू होईल. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 06:28 ते रात्री 12:29 पर्यंत आहे. द्विपुष्कर योग रात्री उशिरा 12.29 ते दुसऱ्या दिवशी 19 मार्च रोजी सकाळी 06.27 पर्यंत आहे.
पापमोचनी एकादशी पूजेच्या वेळा -
पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी सर्वार्थ सिद्धी योगाने भगवान विष्णूच्या उपासनेचा शुभ मुहूर्त सुरू होईल. सर्वार्थ सिद्धी योगात उपासना केल्यानं तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी तुम्ही सकाळी 06.28 पासून पापमोचनी एकादशी व्रताची पूजा करू शकता. या दिवशी पूजेच्या वेळी राहुकालाची काळजी घ्या.
पापमोचनी एकादशी 2023 पारण वेळ -
जे 18 मार्चला पापमोचनी एकादशीचे व्रत करतात ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, 19 मार्चला या व्रताचे पारण करतील. उपवासाची वेळ सकाळी 06.27 ते 08.07 अशी आहे. द्वादशी तिथी 19 मार्च रोजी सकाळी 08.07 वाजता समाप्त होईल.
हे वाचा - पापमोचनी एकादशीचे माहात्म्य काय? श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली होती ही कथा
पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व -
धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा नारदजींनी ब्रह्माजींना पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, हे व्रत भगवान विष्णूशी संबंधित आहे. हे व्रत केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. श्रीहरींच्या कृपेने अनेक जन्मांची पापे धुतली जातात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.