मराठी बातम्या /बातम्या /religion /

Papankusha Ekadashi 2022: पाशांकुशा एकादशीच्या पूजेवेळी ही व्रत कथा वाचा; पापांचा होतो नाश, मिळेल मोक्ष

Papankusha Ekadashi 2022: पाशांकुशा एकादशीच्या पूजेवेळी ही व्रत कथा वाचा; पापांचा होतो नाश, मिळेल मोक्ष

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापे दूर करणारी आणि यमलोकाच्या दुःखापासून मुक्ती देणारी आहे. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून पाशांकुशा एकादशीच्या व्रताची कथा जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 06 ऑक्टोबर : पाशांकुशा एकादशीचे व्रत आज 06 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे आणि व्रत करणे शुभ मानले जाते. या एकादशीला भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना अश्विन शुक्ल एकादशीचे महत्त्व आणि व्रत पद्धतीबद्दल तपशीलवार सांगण्याची विनंती केली. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापे दूर करणारी आणि यमलोकाच्या दुःखापासून मुक्ती देणारी आहे. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून पाशांकुशा एकादशीच्या व्रताची कथा जाणून घेऊया.

पाशांकुशा एकादशी व्रताची कथा -

भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेली पाशांकुशा एकादशीच्या व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे. विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक क्रूर शिकारी राहत होता. तो एक अतिशय हिंसक, निष्ठूर, अनीतिमान, पापी कृत्ये करणारा व्यक्ती होता. काळाच्या ओघात त्याच्या आयुष्यातील शेवटचा क्षण येणार होता. त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी यमाच्या दूतांनी त्याला निरोप दिला की उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, उद्या ते तुझा प्राण घ्यायला येतील.

हे जाणून क्रोधन खूप दुःखी झाला आणि घाबरला. यावर उपाय जाणून घेण्यासाठी तो अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला. त्यांनी अंगिरा ऋषींना नमस्कार केला आणि आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली.

तो म्हणाला की, त्याने आयुष्यभर पापकर्म केले आहे. यापासून मला मुक्त व्हायचे आहे, म्हणून आपणास विनंती आहे की असा काही उपाय सुचवावा, ज्याने मला मोक्ष मिळेल आणि मी पापांपासूनही मुक्त होईन.

मग ऋषींनी पाशांकुशा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळण्यास सांगितले. मग त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे पाशांकुशा एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट झाली. जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्यांनाही श्रीहरींच्या कृपेने मोक्ष मिळाला.

भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, जो पाशांकुशा एकादशीचे व्रत करतो, त्याला योग्य जीवनसाथी मिळतो. पैशाची आणि धान्याची कमतरता राहत नागी. व्रत करणरी व्यक्ती केवळ स्वत:लाच वाचवत नाही, तर त्याच्या अनेक पिढ्याही सुखावतात. या दिवशी सोने, तीळ, अन्न, पाणी, छत्र इत्यादी दान करणे उत्तम.

हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu