मराठी बातम्या /बातम्या /religion /

Panchmukhi Hanuman : बजरंगबलीने भव्य पंचमुखी हनुमानाचा अवतार का घेतला? अशी आहे आख्यायिका

Panchmukhi Hanuman : बजरंगबलीने भव्य पंचमुखी हनुमानाचा अवतार का घेतला? अशी आहे आख्यायिका

भगवान रामाशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवलं की, या युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो. आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मग मायावी शक्तींचा वापर सुरू केला.

भगवान रामाशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवलं की, या युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो. आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मग मायावी शक्तींचा वापर सुरू केला.

भगवान रामाशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवलं की, या युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो. आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मग मायावी शक्तींचा वापर सुरू केला.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 19 जुलै : भगवान हनुमान हे बजरंगबली, अंजनी पुत्र, पवनपुत्र, रामभक्त आणि इतर अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत, त्यांना कलियुगातील देवता मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार, एखाद्या व्यक्तीला जीवनात अनेक संकटांनी घेरले असेल आणि त्यातून मार्ग काढता येत नसेल, तर बजरंगबलीचा अवतार असलेल्या पंचमुखी हनुमानाची पूजा केली पाहिजे. भोपाळमध्ये ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचमुखी हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होतात. आज आपण पौराणिक कथांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की बजरंगबलीने पंचमुखी हनुमान अवतार कसा (Panchmukhi Hanuman Avatar) घेतला. पंचमुखी हनुमान अवतार कथा - पौराणिक मान्यतेनुसार, पंचमुखी हनुमान हे बजरंगबलीचे सर्वात शक्तिशाली रूप मानले जाते. रावणाच्या मायावी शक्ती संपवण्यासाठी रावणाशी युद्ध करताना हनुमानजींनी पंचमुखी हनुमानाचा अवतार घेतला होता. त्याची आख्यायिका जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार, भगवान रामाशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवलं की, या युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो. आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मग मायावी शक्तींचा वापर सुरू केला. या युद्धात रावणाने आपला मायावी भाऊ अहिरावण याची मदत घेतली. अहिरावणाची आई भवानी यांना तंत्र-मंत्र माहीत होते. याच कारणामुळे अहिरावण हा तंत्रविद्येतही पारंगत होता. युद्धादरम्यान त्यांनी अशी माया केली की, भगवान रामाची सेना हळूहळू युद्धभूमीवर झोपू लागली. भगवान राम आणि लक्ष्मण देखील या मायावी चालीपासून वाचू शकले नाहीत आणि ते देखील झोपी गेले. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा भगवान राम आणि लक्ष्मण झोपी जाताच अहिरावणाने त्यांचे अपहरण करून अधोलोकात नेले. काही काळानंतर मायेचा प्रभाव ओसरला, मग सेनादल जागे झाले आणि त्यांनी पाहिले की भगवान राम आणि लक्ष्मण तिथे नाहीत. विभीषणाला ही मायावी चाल समजली आणि त्यांनी हनुमानाला राम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी अधोलोकात जाण्यास सांगितले. भक्त हनुमान अधोलोकात पोहोचताच तेथे मकरध्वजाने हनुमानाला अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान हनुमानजींचे मकरध्वजाशी युद्ध झाले आणि मकरध्वजाचा पराभव करून हनुमान आतमध्ये गेले, तेथे भगवान राम आणि लक्ष्मण यांना बंधक बनवले गेले होते. हनुमानजींनी पाहिले की पाच दिशांना पाच दिवे जळत आहेत. ही तांत्रिक विद्या त्या भवानीने केली होती. हे पाच दिवे एकत्र विझवल्यावरच अहिरावण संपुष्टात येईल हे हनुमानजींना माहीत होते. त्यासाठी बजरंगबलीने पंचमुखी हनुमानाचे रूप धारण करून अहिरावणाचा वध केला. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर पंचमुखी हनुमानाची रूप - बजरंगबलीच्या पंचमुखी रूपात उत्तरेला वराह मुख, दक्षिणेला नरसिंह मुख, पश्चिमेला गरुड मुख, पूर्वेला हनुमान मुख आणि आकाशाकडे हयग्रीव मुख आहे.
First published:

Tags: Hanuman, Religion

पुढील बातम्या