मराठी बातम्या /बातम्या /religion /

तुमच्या हातावर ही भाग्य रेषा आहे का? शक्ती-बुद्धिमत्ता-संपत्ती कधी कमी नाही पडत

तुमच्या हातावर ही भाग्य रेषा आहे का? शक्ती-बुद्धिमत्ता-संपत्ती कधी कमी नाही पडत

एखाद्या पुरुषाच्या हातावर ही रेषा असेल तर तो व्यक्ती शक्ती, बुद्धिमत्ता, विद्या, धन आणि ऐश्वर्य यांचे मालक बनणार असल्याचे लक्षण आहे. परंतु, ही रेषा फार कमी लोकांच्या हातावर असते. प्रत्येक सुख आणि सौभाग्य देणारी ही रेषा 'लकी लाईन' म्हणूनही ओळखली जाते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 16 ऑगस्ट : हस्तरेषा शास्त्रानुसार व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि भविष्याचे सूचक असतात. हातावरील काही रेषा शुभ तर काही अशुभ परिणाम दर्शवतात. तर अशा काही रेषा असतात, ज्या दुर्मिळ ते अतिदुर्मिळ मानल्या जातात. अशीच एक रेषा म्हणजे सिमियन लाईन. जर एखाद्या पुरुषाच्या हातावर ही रेषा असेल तर तो व्यक्ती शक्ती, बुद्धिमत्ता, विद्या, धन आणि ऐश्वर्य यांचे मालक बनणार असल्याचे लक्षण आहे. परंतु, ही रेषा फार कमी लोकांच्या हातावर असते. प्रत्येक सुख आणि सौभाग्य देणारी ही रेषा 'लकी लाईन' म्हणूनही ओळखली जाते. सिमियन लाइन म्हणजे काय? पंडित रामोतर शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार हस्तरेषाशास्त्रानुसार मेंदू आणि हृदयाची रेषा तळहातात जिथे मिळते, तिथून सिमियन रेषा तयार होते. हातातील सिमियन रेषेमुळे काय होते? हस्तरेषा शास्त्रानुसार, हृदय आणि मेंदू रेषेशी सिमियन रेषेच्या संबंधामुळे ती हृदय, भावना आणि बुद्धिमत्ता दर्शवते. ज्या व्यक्तीच्या हातात ही रेषा असते ती संवेदनशील आणि बुद्धिमान मानली जाते, त्याच्याकडे आपल्या प्रयत्नातून पैसा कमावण्याची पूर्ण क्षमता असते. तो धैर्यवान, निर्भय आणि दूरदर्शी मानला जातो. अशा व्यक्ती शांत राहुन किंवा वेळेनुसार जोखीम पत्करण्याचे पाऊल उचलतात. सिमियन रेषा असलेल्या लोकांना आयुष्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत दोन्ही हातात दुर्लभ, वैवाहिक आयुष्यही ठरवते- सिमियन रेषा एका हातात असणे आणि दोन्ही हातात असणेही दुर्मिळ आहे. परंतु, जर एखाद्या पुरुषाच्या दोन्ही हातावर ही रेषा असेल तर तो ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याहुन पिवळे मानले जाते. अशी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होते. सिमियन रेषा असलेल्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन देखील प्रेम तत्वाच्या प्राबल्यामुळे आनंदाने भरलेले असते. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे सिमियन लाइन महिलांसाठी अशुभ आहे का? ज्या पुरुषाच्या हातात सिमियन रेषा असते ती भाग्यवान मानली जाते. याउलट जर ती स्त्रीच्या हातात असेल तर तिचे आयुष्य दु:खाने भरलेले असण्याची शक्यता असते. मात्र, स्त्री-पुरूष दोन्ही प्रकरणांमध्ये व्यक्तीच्या उर्वरित ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती देखील महत्त्वपूर्ण आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या