मराठी बातम्या /बातम्या /religion /

Palmistry Tips: तुमच्या तळहातावरील या खुणा धनवान होण्याचे देतात संकेत; अशा प्रकारे ओळखा

Palmistry Tips: तुमच्या तळहातावरील या खुणा धनवान होण्याचे देतात संकेत; अशा प्रकारे ओळखा

एखाद्याच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असेल तर ते शुभ मानले जाते. तळहातावर कमळाचे चिन्ह असते तेव्हा त्याला विष्णुयोग म्हणतात, कारण कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते.

एखाद्याच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असेल तर ते शुभ मानले जाते. तळहातावर कमळाचे चिन्ह असते तेव्हा त्याला विष्णुयोग म्हणतात, कारण कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते.

एखाद्याच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असेल तर ते शुभ मानले जाते. तळहातावर कमळाचे चिन्ह असते तेव्हा त्याला विष्णुयोग म्हणतात, कारण कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 02 सप्टेंबर : तळहातावरील रेषा आणि खुणा जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये उघड करतात. हस्तरेषा शास्त्राद्वारे एखाद्या व्यक्तीचे भाग्य ओळखले जाऊ शकते. हातावरील रेषा आणि खुणा शुभ आणि अशुभ संकेत देतात. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, हस्तरेषा फक्त एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दलच सांगत नाहीत, तर त्याच्या भविष्यातील घटनांबद्दल देखील सूचित करतात. आज आपण अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या श्रीमंत होण्याचे रहस्य उलघडू (Palmistry Tips) शकतात.

या खुणा महत्त्वाच्या

ज्योतिषांच्या मते, जर एखाद्याच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असेल तर ते शुभ मानले जाते. तळहातावर कमळाचे चिन्ह असते तेव्हा त्याला विष्णुयोग म्हणतात, कारण कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. अशा व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते, ज्यामुळे त्याचे भाग्य अनुकूल असते. अशा व्यक्ती वक्तृत्वात पारंगत असतात. त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते.

तळहातावर त्रिशूलाचे चिन्ह देखील भाग्यवान असल्याचे सांगतात. अशा व्यक्तीवर भगवान शिवाची कृपा राहते. जेव्हा मंगळाच्या पर्वतावर त्रिशूलाचे चिन्ह असते तेव्हा त्याला शिवयोग म्हणतात. त्यामुळे जीवनात कोणताही अडथळा येत नाही आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात.

तळहातावर सूर्य पर्वत आणि गुरु पर्वत उगवणे हे शुभ लक्षण आहे. अशा व्यक्तीला कधीही पैसा आणि शक्तीची कमतरता नसते. समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. अशा व्यक्ती इतरांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात. त्यांना प्रत्येक मार्गावर यश मिळते.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

तळहातावरील मणिबंधातून जाणारी रेषा थेट आणि स्पष्टपणे शनीच्या पर्वतापर्यंत पोहोचत असेल तर अशा व्यक्तीचे भाग्य खूप साथ देणारे असते. या रेषेला भाग्यरेषा म्हणतात. अशा व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. तसेच तळहातावर दोन सूर्य रेषा असतील तर ते देखील शुभ चिन्ह आहे. अशा व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.

तसेच मणिबंधाच्या जवळ माशाचे चिन्ह असेल आणि ते जीवन रेषेशी संलग्न असेल तर ते देखील खूप शुभ मानले जाते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधीही धनलाभ होऊ शकतो. त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीतही वाढ होऊ शकते.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती हस्तशास्त्रावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion