मराठी बातम्या /बातम्या /religion /

तुमच्या हाताच्या बोटांवरून समजेल तुमचं भविष्य; समजून घ्या अधिक माहिती

तुमच्या हाताच्या बोटांवरून समजेल तुमचं भविष्य; समजून घ्या अधिक माहिती

तुमच्या हाताच्या बोटांवरून समजेल तुमचं भविष्य; समजून घ्या अधिक माहिती

तुमच्या हाताच्या बोटांवरून समजेल तुमचं भविष्य; समजून घ्या अधिक माहिती

हस्तरेखाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित प्रत्येक गोष्ट तिच्या हाताच्या बोटांचा आकार, प्रकार आणि पोत याद्वारे शोधता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे व्यक्तीची बोटं खूप माहिती सांगू शकतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 नोव्हेंबर: सध्या आपण विज्ञानाच्या युगात आहोत. मानवानं विज्ञानाच्या आधारे इतकी प्रगती केली आहे की, आपण थेट अंतराळापर्यंत जाऊन पोहचलो आहोत. मात्र, तरीदेखील कधीनाकधी आपल्याला राशी भविष्य, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवावासा वाटतो. काही लोक तर आपल्या दिवसाची सुरुवातच राशीभविष्य वाचून करतात. आपला दिवस कसा जाईल? ही उत्सुकता त्यामागे असते. काहीजण हस्तरेखाशास्त्रावरही (Palmistry) विश्वास ठेवतात. हा ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे. हस्तरेखाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित प्रत्येक गोष्ट तिच्या हाताच्या बोटांचा आकार, प्रकार आणि पोत याद्वारे शोधता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे व्यक्तीची बोटं खूप माहिती सांगू शकतात. माणसाच्या करंगळी, अनामिका, मधलं बोट, तर्जनी आणि अंगठा या बोटांच्या अभ्यासातून जीवनाचं रहस्य जाणून घेता येतं.

सर्व प्राण्यांपैकी मानवी शरीराची रचना वेगळ्या प्रकारे केली गेली आहे. त्याच्या प्रत्येक अवयवाशी संबंधित काही रहस्यं दडलेली आहेत. माणसाच्या विचारात कोणत्या गुणांचा जास्त प्रभाव आहे, हे त्याच्या बोटांवरून कळू शकतं, असं हस्तरेखाशास्त्रात सांगितलं गेलं आहे.

1) करंगळी: हाताच्या सर्वांत लहान बोटाला करंगळी म्हणतात. हे बोट तुमची आर्थिक स्थिती आणि तुमच्या बुद्धिमत्तेची पातळी सांगतं. बोट जितकं लांब असेल तितकी ती व्यक्ती अधिक बुद्धिमान समजली जाते. ती व्यक्ती कार्यक्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करते. हे बोट लहान किंवा वाकडं असेल तर आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये.

उपाय: करंगळी वाकडी असेल तर गणपतीची दररोज पूजा करून दुर्वा अर्पण करा. यामुळे आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील.

हेही वाचा:  Numerology : या लोकांनी आज पिवळ्या रंगाचे पदार्थ नक्की खा; कुणी आणि का आजच्या अंकशास्त्रात पाहा

2) अनामिका: करंगळी शेजारील बोटाला अनामिका म्हणतात. या बोटामध्ये सहसा लग्नापूर्वी साखरपुड्यावेळी अंगठी घातली जाते. या बोटावरून व्यक्तीच्या भावना, आरोग्य आणि प्रसिद्धीचा अंदाज लावता येतो. ज्या व्यक्तीची अनामिका लांब असते त्या व्यक्तीला जीवनात मोठ्या प्रमाणात यश मिळतं. पण, अनामिका लांब असेल तर ती व्यक्ती रागीट आणि उद्धट बनते. त्यामुळे हे बोट मध्यम आकाराचं असणं योग्य मानलं जातं.

उपाय: जर हे बोट सामान्य नसेल तर दररोज सूर्याला अर्घ्य अर्पण करून सूर्यदेवाची प्रार्थना करावी.

3) मधलं बोट किंवा मध्यमा: हाताच्या मध्यभागी असलेल्या सर्वांत लांब बोटाला मधलं बोट किंवा मध्यमा म्हणतात. याच्या मदतीने आपण त्या व्यक्तीची काम करण्याची क्षमता, नोकरी आणि करिअरचा अंदाज लावू शकतो. हे बोट जितकं लांब असेल तितकं तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. हे बोट अनामिकेपेक्षा लहान असेल तर आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. या बोटावर तीळ असेल तर व्यक्तीला आयुष्यात अपघातांना सामोरं जावं लागतं.

उपाय: हे बोट सामान्य नसेल तर त्यात लोखंडी अंगठी घालावी.

4) तर्जनी: अंगठ्याच्या शेजारील बोटाला तर्जनी म्हणतात. हे बोट एखाद्या व्यक्तीचा आध्यात्मिक विकास आणि नेतृत्व करण्याची क्षमता दर्शवतं. जर हे बोट लांब आणि सरळ असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात विशेष प्रगती होते. जर तर्जनी आणि अनामिकेची लांबी सारखी असेल तर ती व्यक्ती धूर्त आणि हुशार असते. या बोटाबाबत लोकांचा असा समज आहे की, झाडं, फळं, वनस्पती यांच्याकडे हे बोट दाखवलं ती खराब होतात.

उपाय: तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घातल्यास अडचणींपासून सुटका होते.

5) अंगठा: ज्योतिषशास्त्रानुसार अंगठादेखील स्वभाव आणि भविष्याशी संबंधित माहिती देतो. अंगठा तीन भागांमध्ये विभागलेला आहे. वरचा भाग, मधला भाग आणि शेवटचा भाग, असे हे तीन भाग आहेत. भाग्य रेषेने अंगठ्याचे तीन भाग पडतात. जर पहिला भाग लांब असेल तर व्यक्तीची इच्छाशक्ती चांगली असते. अशा व्यक्तीला यश मिळतं. या शिवाय, अंगठ्यामध्ये तीन पेरं आहेत. पहिलं पेर हे इच्छाशक्तीचं प्रतीक आहे तर दुसरं पेर ज्ञानाचं आणि तिसरं आत्मज्ञानाचं प्रतीक आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope