मराठी बातम्या /बातम्या /religion /

तळहातावरील ही दोन उंच स्थाने नशीब बदलून टाकतात, राहतो लक्ष्मीचा आशीर्वाद

तळहातावरील ही दोन उंच स्थाने नशीब बदलून टाकतात, राहतो लक्ष्मीचा आशीर्वाद

एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत अनेक रहस्ये प्रकट करते. यावरून ती व्यक्ती किती भाग्यवान आणि श्रीमंत होऊ शकते, हे दिसून येते.

एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत अनेक रहस्ये प्रकट करते. यावरून ती व्यक्ती किती भाग्यवान आणि श्रीमंत होऊ शकते, हे दिसून येते.

एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत अनेक रहस्ये प्रकट करते. यावरून ती व्यक्ती किती भाग्यवान आणि श्रीमंत होऊ शकते, हे दिसून येते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : हाताच्या रेषांवरून एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेता येते. हस्तरेषा शास्त्राद्वारे, व्यक्तीचे वर्तन, कारकिर्द आणि भविष्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आपल्या हाताच्या रेषांमध्ये अनेक योग आणि चिन्हे असतात, जी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित असतात. हस्तरेषाशास्त्रात या गोष्टींचा उल्लेख आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत अनेक रहस्ये प्रकट करते. यावरून ती व्यक्ती किती भाग्यवान आणि श्रीमंत होऊ शकते, हे दिसून येते. जाणून घ्या हाताच्या रेषांवरून माणसाचा स्वभाव कसा ओळखता येतो.

हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेखात शुक्र आणि गुरु पर्वताचा उदय खूप शुभ मानला जातो. ज्यांच्या तळहातावर हे दोन्ही पर्वत असतात, ते खूप भाग्यवान असतात. त्यांचे जीवन खूप आनंदी असते. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. देवस्थान शुक्र आणि गुरु पर्वताच्या मध्ये आहे. असे म्हणतात की हे ठिकाण जितके खोलगट असेल तितके त्या व्यक्तीचे नशीब चांगले असते.

कुठे असतो शुक्र पर्वत -

शास्त्रानुसार शुक्र पर्वत मणिबंधाच्यावर आणि अंगठ्याच्या खाली असतो. शुक्र पर्वताची खोली सांगते की, ती व्यक्ती सुखांसाठी अधिक प्रयत्न करतेय. अशा लोकांच्या आयुष्यात संपत्तीची कमतरता नसते. असे लोक सौंदर्य पाहून लवकर आकर्षित होतात. शुक्र पर्वतावर त्रिकोणी चिन्ह असणे शुभ मानले जाते. अशा लोकांवर देवतांची कृपा कायम राहते. त्यांच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी नांदत असते.

हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

गुरु पर्वत कोठे असतो-

तर्जनीजवळ पसरलेल्या भागाला गुरु पर्वत म्हणतात. गुरू पर्वक जितका स्वच्छ आणि खोलगट असेल तितकेच माणसाचे जीवन भाग्यवान असते. अशा व्यक्ती आपल्या ध्येयापासून मागे हटत नाहीत. त्यांना आयुष्यात लवकर यश मिळते. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. गुरु पर्वतावर विशेष चिन्ह असणे शुभ असते. जर गुरूच्या पर्वतावर क्रॉसचे चिन्ह असेल तर त्याच्या आयुष्यात नेहमीच प्रेम राहते.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion