स्वप्नातील घर साकारण्यासाठी कुंडलीत असे योग पण जुळावे लागतात, जाणून घ्या त्याविषयी

स्वप्नातील घर साकारण्यासाठी कुंडलीत असे योग पण जुळावे लागतात, जाणून घ्या त्याविषयी

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या गणनेद्वारे व्यक्तीचे स्वतःचे घर बनण्याचे कुंडलीत कोणते योग आहेत हे कळू शकते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल सांगत आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : स्वतःचं एक घर असावं, ज्यामध्ये आपल्या कुटुंबासह आनंदाने राहावे, असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. पण, प्रत्येकाला स्वप्नातील घर साकारणे शक्य होत नसते. काहींना कष्ट करून स्वतःचे घर मिळते. तर काही लोकांना खूप प्रयत्न करूनही स्वतःचे घर बांधता येत नाही. याउलट काही लोक असे असतात की ज्यांना अगदी सहज घर मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या गणनेद्वारे व्यक्तीचे स्वतःचे घर बनण्याचे कुंडलीत कोणते योग आहेत हे कळू शकते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल सांगत आहेत.

कसं ओळखाल -

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत स्वत:चे घर बांधण्याची माहिती त्याच्या चौथ्या घराचा अभ्यास करून कळू शकते. चौथे घर हे स्थावर आणि जंगम मालमत्तांचे मुख्य घर मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चौथ्या घराचा लग्न स्वामी राशीच्या स्वामीसोबत असेल आणि त्याचे उत्पन्नही समान असेल तर त्या व्यक्तीची एकापेक्षा जास्त घरे असू शकतात.

जर कुंडलीत पराक्रमी भावात बुध स्थित असेल आणि चौथ्या घराचा स्वामीही स्थिर असेल तर ती व्यक्ती स्वतःसाठी खूप सुंदर घर बांधण्यात यशस्वी ठरते.

जर चौथ्या घराचा स्वामी कुंडलीत स्व-नवांश किंवा उच्च राशीत असेल तर व्यक्तीला जमीन, घर आणि वाहनाचे सुख प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रह चौथ्या भावात स्थित असतात त्यांच्यामध्ये धनप्राप्ती करण्याची शक्ती असते.

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील चौथ्या घराचा स्वामी मंगळ जर शनि किंवा शुक्राबरोबर असेल तर त्या व्यक्तीला त्याचे घर मिळते.

त्याचप्रमाणे मंगळ, शुक्र आणि गुरूचा दशाकाळ स्वतःचे घर घेण्यास अनुकूल असतो. हे ग्रह जमीन, घर आणि संपत्तीसाठी मानले जातात.

मंगळ - ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा स्थावर संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. या ग्रहाचा शुभ प्रभाव चौथ्या भावात चतुर्थेश भाव असल्यास चांगले घर होणार असल्याचे सूचित होते.

हे वाचा - सकाळी पडणारी अशी स्वप्ने कोणाला सांगायची नसतात; होऊ शकतं आर्थिक नुकसान

शनि - ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा ग्रह जुने घर, जमीन इत्यादी देणारा ग्रह मानला जातो. जेव्हा शनि चतुर्थ भावात प्रवेश करतो तेव्हा घर बांधण्याचे काम पूर्ण होते.

शुक्र ग्रह - बलवान अवस्थेत चौथ्या किंवा चतुर्थेश घरावर प्रभाव टाकणारा शुक्र हा भव्य घर तयार होण्याचे लक्षण मानले जाते.

हे वाचा -  Dakshinavarti Shankh : दक्षिणमुखी शंख घरात ठेवण्याचे आहेत अनेक फायदे; मिळतो पैसा, सुख-शांती

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 14, 2022, 10:55 AM IST

ताज्या बातम्या