मराठी बातम्या /बातम्या /religion /

देवाला फुले अर्पण करताना या गोष्टीत चुकू नका; पूजेचा लाभ नाही मिळणार

देवाला फुले अर्पण करताना या गोष्टीत चुकू नका; पूजेचा लाभ नाही मिळणार

देवाला फुले अर्पण करण्याचे नियम

देवाला फुले अर्पण करण्याचे नियम

कोणत्याही देवतेला फुले अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रात सांगितलेले आहेत. इच्छित परिणाम मिळविण्यासाठी शास्त्र-नियमानुसार फुले अर्पण करावीत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 08 डिसेंबर : हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेत फुले अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. कोणत्याही शुभ कार्यात आणि पूजेमध्ये देवतांना फुले अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे. वेगवेगळी फुलं सर्व देवतांना प्रिय असल्याचे मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की देवतांना त्यांची आवडती फुले अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. परंतु, कोणत्याही देवतेला फुले अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रात सांगितलेले आहेत. इच्छित परिणाम मिळविण्यासाठी शास्त्र-नियमानुसार फुले अर्पण करावीत.

फुले अर्पण करण्याचे फायदे

पंडितजी सांगतात की, हिंदू धर्मात फुलांना श्रद्धा आणि भावनेचे प्रतीक मानले जाते. फुलाच्या सुगंधाने देवता प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा मनुष्य जीवनात राहते. फुलांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. कमळाचे फूल देवी-देवतांना सर्वात प्रिय मानले जाते, या फुलाच्या पूजेतील वापराने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

या गोष्टी लक्षात ठेवा -

ज्योतिष शास्त्रानुसार मंदिरात आणि कोणत्याही धार्मिक स्थळी देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावीत. यामुळे देव प्रसन्न होतो आणि आशीर्वादाचा आपल्यावर वर्षाव होतो आणि पूजेचा दुहेरी फायदा होतो. सुकलेली, शिळी किंवा कृमीग्रस्त फुले देवाला अर्पण करू नयेत, फुले नेहमी मूर्तीला उलटी अर्पण करावीत.

हे बोट वापरू नका -

देवाला फुले अर्पण करताना नेहमी अंगठा, मधले आणि अनामिका यांचा वापर करावा. फुल अर्पण करताना करंगळीचा वापर करू नये हे लक्षात ठेवा. चंपा फुलाशिवाय इतर कोणत्याही फुलाची कळी देवाला अर्पण करू नये, यामुळे दोष येतो आणि सुख-समृद्धी नष्ट होते. कुमुदिनी आणि कमळाची फुले 11 दिवस ताजी मानली जातात, त्यामुळे ही फुले 11 दिवसांनी देवतांना अर्पण करू नयेत.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion