मुंबई, 02 फेब्रुवारी: जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 6 येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 6 ,15 ,24 या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.
मूल्यांक 6 : समजा जातकाचा जन्मदिनांक हा 15 मे 1991 आहे तर 15 या दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय.
15 = 1 +5 =6 मूल्यांक.
6 या अंकाचा ग्रह शुक्र आहे .
जाऊन घेऊयात 6 मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये:
भौतिक सुखांचे आकर्षण असणारे असतात, विरुद्ध लिंगी आकर्षण असणारे असतात, पर्यटन प्रेमी असण्याने यांना ट्रेकिंग ची आवड असते. कला प्रेमी असल्याने हे लोक अभिनय, मीडिया, जाहिरात या क्षेत्राकडे या लोकांचा कल जास्तच असतो. बहुतेकदा ही प्रेमाच्या व विवाहाच्या निर्णयात घाई करतात व नंतर दुखी होतात. भाग्यवान असतात 6 मूल्यांकाची माणसे. खूप पैसा कमावतात.
चाणक्य नीतीने करा पैशांचे नियोजन, या 6 सवयींमुळे घरात येते गरिबी
अनोळखी लोकांसोबत लवकर मैत्री करणे. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतात. तसेच यांना राग खूप येतो. रागावर नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. हे लोक लवकर दुखी होतात. खूप पैसे खर्च करतात. प्रसिद्धी संदर्भातील कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर असतात. कधी कधी खूप आळशी होतात. जास्त वाद विवाद करतात. यांनी शुक्रवारी सफेद वस्त्र धारन केल्याने विशेष लाभ मिळेल. हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करणे लाभकारी ठरेल .
6 मूल्यांक
शुभ अंक - 1 ,5 ,2
अशुभ अंक - 8
शुभ वार - बुधवार ,गुरुवार ,शुक्रवार
अशुभ वार - मंगळवार
शुभ रंग - सफेद , निळा
अशुभ रंग - पिवळा
विकार – प्रकृतीने नाजूक ,मानसिक -शारीरिक त्रास ,सूज ,कफ,सर्दी
लाभकारी रत्ना -
हिरा,ओपेल
उपासना –
देवीची उपासना ,लक्ष्मीचे स्तोत्र ,शुक्र मंत्र जप
मूल्यांक 6 चे प्रसिद्ध व्यक्ति -
भगत सिंग ,रवींद्र नाथ टागोर ,अण्णा हजारे
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichakra, Religion