मुंबई, 03 फेब्रुवारी: 5 जन्म तारखेच्या जातकांचे कोणीच दुश्मन नसतात . या मुली सर्वांच्याच खूप लाडक्या असतात , सर्वांच्याच प्रिय असतात . जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 5 येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 5 ,14 ,23 या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभ दायक सिद्ध होऊ शकते.
मूल्यांक 5 : समजा जातकाचा जन्मदिनांक हा 14 मे 1991 आहे तर 14 या दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय.
5 हा मूल्यांक
14 = 1 +4
5 = मूल्यांक.
आठवड्याच्या कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत ?
5 या अंकाचा ग्रह बुध आहे .
जाऊन घेऊयात 5 मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये:
5 मूल्यांका चे लोक लकी मानले जातात . आनंदी व तरुण व्यक्तिमत्व असणारे असतात . न्यायप्रिय असतात . खूप बुद्धिवान असतात . व्यवसायात जोखीम उचलण्याची यांची तयारी असते त्यामुळे व्यवसायात सफलता ही यांना मिळते . कोणत्या विषयाला घेऊन खूप जास्त विचार हे लोक करत नाही .समोरच्याला स्वतच्या बोलण्यात गुंतून ठेवण्याची कला यांच्यात असते . उच्य शिक्षित असतात ,चतुर बुद्धिवान असतात ,भांडण त्यांना आवडत नाही. कोणतही नवीन काम घेताना खूप विचारपूर्वक घेतात . यांची आर्थिक बाजू छान असते,याच्याकडे चुंबकीय आकर्षण असते, एकाच वेळी अनेक काम करण्याची कला यांच्यात असते . या व्यक्तींच्या नात्यात अस्थिरता खूप असते . यांच्या स्वभावात लवचिकता जास्त असते . यांच्या स्वभावात सातत्याने बदल होत असतो . ही लोक सर्वाना बरोबर घेऊन चालणारे असतात .यांच्या कडे सुख आपोआप चालून येतात . यांची भाग्य दिशा उत्तर असते .
काय तो अनोखा गुण? या मुलींकडे असते जणू चुंबकासारखी आकर्षण शक्ती ..
5 मूल्यांकाचा
शुभ अंक - 1 ,2 ,6 .
अशुभ अंक - कोणताही नाही
शुभ वार - बुधवार ,गुरुवार ,शुक्रवार
अशुभ वार - मंगळवार
शुभ रंग - सफेद , हिरवा ,पिवळा
अशुभ रंग -
विकार – मानसिक रोग , त्वचा रोग ,मुत्राशयाचे विकार
लाभदायी व्यवसाय - ,मनोरंजन ,बँकिंग ,प्रकाशन ,वाचनालये ,गुढविद्या ,दलाली
लाभकारी रत्ना - पाचू
उपासना – गणपतीची उपासना करणे,बुध मंत्र जप करणे .
मूल्यांक 5 चे प्रसिद्ध व्यक्ति - विराट कोहली ,जवाहरलाल नेहरू ,सुभाष चंद्र भोस ,आमीर खान ,दीपिका पादूकोण
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichakra, Religion