मुंबई, 07 फेब्रुवारी: भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.
अक्षर W: ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात W अक्षराने होते त्या मेहनती असतात. त्या जोखीम घेण्यास तयार असतात. त्यांची यामुळे भरभराट होते. स्कूबा डायव्हिंग, पॅरा जंपिंग, मोटर रेसिंग, लांब उडी आणि उंच उडी यासारख्या जोखमीच्या ठिकाणी या व्यक्ती सहज पोहचतात. या व्यक्ती नम्र आणि खूप सक्रिय असतात. सर्वात कठीण काम हाती घेण्यास त्या मागे-पुढे पाहत नाहीत. त्या ब्रेक न घेता अहोरात्र काम करू शकतात. आपल्या महत्त्वाकांक्षा किंवा उद्दिष्टांप्रती त्याचं समर्पण असतं. या गुणामुळे या व्यक्तींची जास्त प्रगती होते आणि शेवटी त्यांची स्वप्नं पूर्ण होतात. म्हातारपणी काळजी आणि दु:खांचा सामना करावा लागू शकतो. या व्यक्ती असाइनमेंट्स आणि आश्वासनांनी भरलेलं आयुष्य जगतात.
देवी महालक्ष्मी होईल प्रसन्न घरी आणा फक्त 100 रु.ची ही वस्तू
त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे, त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीचा सामना करावा लागतो. आपल्या जवळच्या व्यक्तींना वेळ देण्यासाठी त्यांची धडपड असते. महत्वाकांक्षा किंवा पॅशनपेक्षा आयुष्यात समृद्धी महत्त्वाची आहे, हे या व्यक्तींनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात W अक्षराने होते त्या सहसा स्वभावाने उदार आणि खरे देशभक्त असतात. त्यांना इतरांची मदत करायला आवडतं आणि त्या अध्यात्मिक असतात. या व्यक्ती आपल्या चुकांमधून धडा घेतात म्हणून त्यांना सेल्फ-लनर्स म्हटलं जातं.
मालमत्ता किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना या व्यक्तींनी अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या व्यक्ती इतरांसाठी अतिविश्वासार्ह असतात. त्यामुळे कधीकधी त्या स्वत:च संकटात पडू शकतात. ज्या पुरुषांच्या नावाची सुरुवात W अक्षराने होते त्यांनी उत्पादन, इंजिनीअरिंग, इव्हेंट्स, मार्केटिंग, दलाली आणि क्रीडा क्षेत्राची निवड केली पाहिजे. महिलांनी ग्लॅमर किंवा मीडिया क्षेत्रात आपलं नशीब आजमवलं पाहिजे.
लक्ष्मीप्राप्तीसाठी करा तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घराची होते प्रगती
शुभ रंग: Green and white
शुभ दिवस: बुधवार
शुभ अंक: 5
दान:
1. जनावरांना किंवा आश्रमात दूध दान करा.
2. प्रत्येक बुधवारी गणपतीची पूजा करा.
3. केळीच्या झाडाला साखरेचं पाणी घाला.
4. लेदर बेल्टचं घड्याळ घालणं टाळा, त्याऐवजी जेटस्लुक बेल्ट निवडा.
5. पंचमुखी रुद्राक्षांची माळ घाला.
6. मांसाहार, दारू, तंबाखूचं सेवन आणि चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळा.
W आद्याक्षर असलेले सेलिब्रिटी: वसीम अक्रम, वहिदा रहमान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion