मराठी बातम्या /बातम्या /religion /

नवऱ्यासाठी खूपच लकी असतात या मुली; बुद्धीही असते एकदम तल्लख

नवऱ्यासाठी खूपच लकी असतात या मुली; बुद्धीही असते एकदम तल्लख

विशेष म्हणजे या महिलांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो.

विशेष म्हणजे या महिलांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो.

विशेष म्हणजे या महिलांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Prachi Dhole

मुंबई, 24 नोव्हेंबर : तुम्हीही योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. या जन्म अंकाच्या मुली नवऱ्यासाठी खूपच लकी असतात. जर तुमची गर्लफ्रेंड, किंवा होणाऱ्या बायकोचा जन्म नंबर हा 3 असेल तर त्या आपल्या नवऱ्यासाठी खूप लकी असतात. जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज  3 येत असेल, म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 3,12,21,30  या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते .

मूल्यांक : 3

समजा जातकाचा जन्मदिनांक हा 12 मे 1991 आहे तर 12 या  दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय.

3 मूल्यांक

12 = 1+2  =3= मूल्यांक.

जाऊन घेऊयात 3  मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये:

जोडीदारावर भरभरून प्रेम करतात या महिला; ही जन्मतारीख असेल तर तिच्याशी बिनधास्त लग्न करा

3 या अंकाचा ग्रह गुरु आहे .

ज्या जातकाचा मूल्यांक 3 आहे. अशा जातकांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो. ही लोक खूप कुशाग्र बुद्धीचे असतात. यांच्यात खूप संवाद चातुर्य असतं. आर्थिक बाबतीत थोडेसे गहाळ असतात हे लोक. गोड बोलून यांच्याकडून कोणीही काम काढून घेऊ शकतात. आध्यात्मिक आवड असणारे असतात. सामाजिक कार्यात सहभाग घेणारे असतात.

Amavasya Vrat Katha: सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी दर्श अमावस्येला वाचावी/ऐकावी ही कथा

मूल्यांक 3  ची गुणवैशिष्ट्ये :

सारासार विचार करून निर्णय देणारे हे जातक असतात. या व्यक्ती पैशा पेक्षा ज्ञानाला जास्त महत्व देतात. ही लोक प्रकाशन व्यवसायात खूप अग्रेसर असतात. मेहनती असतात. समजवण्याच्या आणि शिकवण्याच्या क्षेत्रात सर्वात पुढे असतात. 3 मूल्यांकचे लोक थोडेफार अहंकारी असतात. हे लोक सामाजिक  दृष्ट्या सफल असतात. परंतु सांसारिक मतभेदांना बळी पडणारे असतात. पोटाचे  विकार यांना जास्त असण्याची शक्यता असते. पिवळा रंगाचा जास्तीत जास्त वापर करणे विशेष फळ देणारे असेल. महादेवाची उपासना करणे फायद्याचे ठरेल. ज्योतिषी सल्ला घेऊन पिवळा पुष्कराज किंवा पाचू धारण करू शकतात.  यांना कार्यक्षेत्रात खूप लवकर सफलता मिळते. परंतू अहंकारपासून दूर राहणे योग्य ठरेल.

3 मूल्यांकाचा   

 शुभ    अंक -  1,5,3,2

अशुभ  अंक - 8,4,9

शुभ वार - मंगळवार, गुरुवार

अशुभ वार - शनिवार.

शुभ रंग -  लाल ,सफेद ,हिरवा ,पिवळा ,क्रीम

अशुभ रंग - काळा

लाभदायी व्यवसाय -  सामाजिक कार्य ,डेअरी ,संगीत

लाभकारी रत्ना - पुष्कराज .

उपासना –  गुरुची उपासना .

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology