मराठी बातम्या /बातम्या /religion /

Numerology: या लोकांना नवी नोकरी आणि गुंतवणुकीची चांगली संधी; जन्मतारखेनुसार आजचं भविष्य

Numerology: या लोकांना नवी नोकरी आणि गुंतवणुकीची चांगली संधी; जन्मतारखेनुसार आजचं भविष्य

numerology

numerology

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रेमसंबंध अधिक सुंदर होतील. समर्पण भावाने कष्ट केल्यास सत्ता आणि पैसे मिळवण्याचे मनसबे आज पूर्ण होतील. जर तुम्हाला नव्या ठिकाणी, नव्या पदावर रुजू व्हायचं असेल, व्यवसायात नवी गुंतवणूक करायची आसेल, नवी नोकरी सुरू होणार असेल किंवा नव्या घरात रहायला जाणार असाल तर तुमचा संताप बाजूला ठेवा आणि कुटुंबीय आणि जुन्या मित्रांची मदत घ्या. मालमत्तेची प्रकरणं लांबणीवर पडतील. वादविवाद न करता पुरेसे पैसे मिळतील. डॉक्टरांना एखादी विशेष ऑफर आज येईल. शेती आणि शिक्षण व्यवसायातील व्यक्तींना नफा मिळेल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : आश्रमात कपडे दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नात्यांमध्ये प्रचंड समजुतदारपणा दाखवावा लागेल. कष्ट आणि प्रामाणिकपणा तुमच्या यशाचं गमक ठरेल. तुमच्या निरागसपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो त्यामुळे विचारपूर्वक वागा. द्रव पदार्थांचे डीलर्स, सल्लागार, शिक्षक, आयात-निर्यात, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, ब्रोकर्स, ट्रॅव्हल एजन्सीज, स्टॉक मार्केट पार्टनरशीप फर्मना संध्याकाळनंतर चांगला दिवस. जोडीदार किंवा सहकाऱ्यांमुळे मनाला थोडीशी निराशा जाणवेल पण ती पूर्णपणे तात्पुरती आहे.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना दही दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवस सुरू करण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. सर्जनशीलनेतेन प्रश्न सोडवा. तुमचं एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व, सर्जनशील विचार आणि जादुई वाणी याने ऑफिसात बॉस आणि घरची मंडळी यांना प्रभावित कराल. कुठल्याही परिस्थितीत काम करण्याच्या तुमच्या तयारीमुळे तुम्हाला कायम यश मिळतं. तुमच्या वस्तू सांभाळा. कुटुंबियांसोबत असताना तुमच्या सामाजिक प्रतिमेची काळजी घ्या. डिझायनर्स, लेखक, अभिनेते, संगीतकार, प्रेरक वक्ते, खेळाडू यांना नाव व प्रसिद्धी मिळेल. बांधकाम क्षेत्र आणि शेतीत गुंतवणुकीसाठी उत्तम काळ. सकाळी गुरूंची पूजा करा.

शुभ रंग : Orange and Violet

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 5,6

दान : देवळात हळद दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळचा काळ निसर्गात घालवा. आरोग्य किंवा कुटुंबाला देण्याच्या वेळाच्या बदल्यात तुम्हाला आज प्रचंड पैसा मिळेल. उच्चपदस्थ आणखी उच्च पदांवर जातील. मांसाहार आणि मद्यसेवन टाळा. विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज करावा मिळण्याची शक्यता आहे. कपडे दान केल्यास नशीब उजळेल. उत्पादक आणि डॉक्टर्सना मोठा नफा आणि कौतुक होईल. दान करा.

शुभ रंग : Blue and Green

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना खारे पदार्थ दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज नशीब जोरात आहे. लोकांवर प्रभाव कायम राखाल. जोडीदाराला प्रपोज करायला उत्तम दिवस. शेअर्स, जमीन, मॅच खेळण्यासाठी, मालमत्ता विक्री आणि अधिकृत कागदपत्रांवर सही करण्यासाठीही उत्तम दिवस. सॉफ्टवेअर इंजिनीअर, दिग्दर्शक, वृत्त निवेदक, अभिनेते, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, वकील आणि राजकारणी यांना सर्वत्र कौतुकाची थाप मिळेल. जपून बोला.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : अनाथाश्रमात हिरवी फळं दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज भरभराटीचा दिवस आहे करिअरच्या संधीही मिळतील. एकट्याऐवजी टीममध्ये काम केल्यास चांगलं परिणाम मिळतील. तुमची स्वप्नं सत्यात येतील. आज सगळ्या प्रकारचा आनंद मिळणार आहे. कुटुंबाकडून आदर आणि पाठिंबा मिळेल त्यातून समृद्धी येईल. गृहिणी, डिझायनर्स, वकील, तंत्रज्ञ, राजकारणी आणि कलाकार यांचं विशेष कौतुक होईल.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6,5

दान : गरिबांना दहीभात दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवस एकसूरी जाणार आहे दुपारच्या जेवणानंतर काहीतरी नवी माहिती कळेल. आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात लवकरच चांगले नातेसंबंध, कामातील यश आणि आर्थिक फायदा होणार आहे. शिळं अन्न खाऊ नका आणि रात्रीच्या पार्टीला जाऊ नका. कुटुंबियांचा व्यवसायात पाठिंबा मिळेल. खेळाडूंना यश मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्ती आणि ज्येष्ठ तुमच्या नशीबात वृद्धी करतील. शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिदेवांची आराधना करा.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 3

दान : मंदिरात तांबं आणि ब्राँझची भांडी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जादाची जबाबदारी घेऊ नये असं वाटेल. व्यवसायात मोठ्या ब्रँड्सशी संपर्क करा म्हणजे ऑफर्स येतील. सभोवतीची मंडळी तुमच्याबाबत प्रामाणिक आहेत त्यामुळे नेतृत्वाचा आनंद घ्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. गोड बोलणं आणि दान केल्याने चमत्कारिक परिणाम मिळतील. बागेत काही काळ वेळ घालवा.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना घोंगड्या आणि चपला दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

अभिनेते, हीलर्स, ट्रेनर, सोनार, काउन्सेलर, सर्जन, राजकारणी आणि खेळाडूंना बक्षीसं आणि मान्यता मिळेल. आजचा दिवस उत्साह, उर्जा, आनंद, प्रसिद्धी, संधी आणि फायद्यांनी भरलेला आहे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा. आज आर्थिक फायदा आणि मालमत्तेची नोंदणी अगदी सहज होईल. नात्यात विश्वास आणि समृद्धीची अनुभूती घ्याल.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : मंदिरात कुंकू दान करा.

26 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: ईश्वरचंद विद्यासागर, डॉ. मनमोहनसिंग, चंकी पांडे, निकी अनेजा वालिया, देव आनंद, विद्या व्हॉक्स.

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology