मराठी बातम्या /बातम्या /religion /

Numerology: अंकशास्त्रानुसार #नंबर 7 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य

Numerology: अंकशास्त्रानुसार #नंबर 7 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रानुसार भविष्य

अंकशास्त्रानुसार भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 7 साठी कसं असेल, जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 7: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

#नंबर 7 हा केतूचं प्रतिनिधित्व करतो.

7 जन्मांक असलेल्या व्यक्ती भूतकाळाकडे फिरून बघणाऱ्या आणि संशोधक असतात. त्या कुशाग्र आणि जाणकार असतात. त्यांना अंतिम परिणाम मिळेपर्यंत बहुतेक गोष्टी गुप्त ठेवायला आवडतात. बहुतेक शास्त्रज्ञ, क्रीडापटू, तंत्रज्ञ, अभिनेते आणि संशोधन विश्लेषक यांचा जन्मांक 7 आहे. या व्यक्ती शांत राहून इतरांवर बारीक लक्ष ठेवून असतात कारण त्या फार चांगले निरीक्षक असतात. सामान्यतः त्या इंट्रोव्हर्ट असतात आणि त्यांना कमी लोकांच्या सानिध्यात रहायला आवडतं. त्या सार्वजनिक कार्यक्रम किंवा मोठ्या पार्ट्या टाळतात. अशा व्यक्तींना प्रचंड आकर्षण असून त्या विरुद्ध लिंगाकडे अधिक आकर्षित होतात कारण समोरचा जोडीदार त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो.

2023 या वर्षात 7 जन्मांकाच्या व्यक्तींना, विशेषत: विज्ञान, अभिनय, किरकोळ विक्री, वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात यश मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्यांना त्याच्या नशीबाची साथ मिळेल. 7 क्रमांकाच्या व्यक्तींसाठी 2023 हे वर्ष भाग्यशाली असेल.

2023 वर्षाची एकूण बेरीज 7 आहे. त्यामुळे या अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना कुटुंब आणि जोडीदारासोबत बराच वेळ मिळेल. लाल पेनानं कागदाच्या तुकड्यावर तुमचं ध्येय लिहिल्यास ते या वर्षात साध्य होऊ शकतं.

2023करिता #नंबर 7चं विश्लेषण

#नंबर 7 - करिअर आणि पैशांच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज

7 जन्मांकाच्या व्यक्तींसाठी 2023 हे वर्ष आर्थिक संधी आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीनं परिपूर्ण असेल. मेडिसीन, मेडिकल सायन्स किंवा सर्जरी, संशोधन क्षेत्र, आयटी, संरक्षण, राजकारण, क्रीडा, ग्रोसरी आणि रिअल इस्टेटची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा नफा आणि बचत मोठ्या प्रमाणात वाढेल.

परदेशात व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या किंवा महत्त्वाचा निर्यातीचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे वर्ष खूप यशस्वी ठरेल. शिवाय, विश्लेषकांसाठीदेखील हे वर्ष खूप यशस्वी ठरेल. विशेषत: ज्यांना आध्यात्मिक आणि उपचार क्षेत्रांची सखोल माहिती मिळवायची आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष फार चांगलं आहे. एकूणच हे वर्ष तुमच्यासाठी खूप ओळख आणि प्रसिद्धी घेऊन येईल.

नोकरी करणाऱ्या व्यक्ती या वर्षी एखाद्या लहान किंवा वैद्यकीय कंपनीशी संलग्न होऊ शकतात. बॉस किंवा समकक्षांसोबत आपल्या भावना आणि आर्थिक गोष्टी शेअर करणं टाळलं पाहिजे. तुम्ही नोकरी करणाऱ्यांनी शांत राहिलं पाहिजे आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच बोललं पाहिजे. तुमचं कौतुक होण्याची आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.

#नंबर 7 - प्रेम, रिलेशनशीप आणि लग्नाच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज

विश्वास निर्माण करणं आणि विश्वास संपादन करण्यासाठी हे वर्ष आव्हानात्मक असेल. विशेषतः प्रेमाच्या बाबतीत जास्त आव्हानं येतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर राखून त्याच्यासोबत दर्जेदार वेळ घालवला पाहिजे. तुम्ही काम आणि वैयक्तीक आयुष्य यांच्यात योग्य संतुलन राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील असंतुलनामुळे तुमच्या घरगुती जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. शांत बसणं टाळा आणि संवाद सुरू ठेवा नाहीतर नातं तुटू शकतं.

तुम्ही तुमच्या जोडीदाराला परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे. असं केल्यानं त्यांना फायदा होईल. जर तुम्ही विवाहित असाल, तर तुमचा जोडीदार तुम्हाला समर्पित होईल पण, त्या बदल्यात त्याला सन्मानाची अपेक्षा असेल. ही बाब सतत लक्षात ठेवा. एकमेकांचं शक्य तितकं कौतुक करा. तुमच्या जोडीदाराचं प्रेम आणि काळजी ओळखा. निराशा टाळण्यासाठी आणि गोष्टी योग्य रितीनं पार पडण्यासाठी 2023 मध्ये काळजीपूर्वक आणि परिपक्व संवाद आवश्यक आहे.

जास्त प्रवास, कामातील व्यस्तता आणि कुटुंबासोबत मिळणारा कमी वेळ यामुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामातील व्यस्ततेबाबत तुमच्या जोडीदाराला कल्पना दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यात अयशस्वी झालात तर समस्या निर्माण होतील.

2023 मध्ये तुमचं सामाजिक जीवन नक्कीच चांगलं असेल. धर्मादाय कामासाठी भरपूर पैसे द्या. तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. भविष्यात सर्व काही फायद्याचं असेल. एकंदरीत 2023 हे वर्ष समृद्धी मिळवण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी चांगलं आहे.

हे वाचा - बोलक्या आणि मनमोकळ्या स्वभावाच्या असतात E आणि F अक्षराची मुले !

#नंबर 7 - 2023 या वर्षासाठी उपाय :

1. प्रत्येक सोमवारी शंकराला दूध आणि दह्याचा अभिषेक करा.

2. केळी किंवा पिंपळाच्या झाडाला दूध वाहा.

3. नेहमी तुमच्याजवळच्या पिशवीत रुद्राक्ष ठेवा.

4. तांबं किंवा कांस्यापासून तयार केलेला '7' हा अंक नेहमी तुमच्यासोबत ठेवा.

5. सकाळी किमान 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

6. कृपया मांसाहार, दारू, तंबाखू, बेटिंग आणि चामड्याची उत्पादनं टाळा.

शुभ रंग - पिवळा आणि ब्राऊन

शुभ अंक - 7

शुभ दिशा - दक्षिण आणि नैऋत्य

शुभ दिवस - सोमवार आणि मंगळवार

First published:

Tags: Numerology, Religion