मराठी बातम्या /बातम्या /religion /जन्मतारखेनुसार 19 फेब्रुवारीनंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार

जन्मतारखेनुसार 19 फेब्रुवारीनंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार

अंकशास्त्रानुसार 19 फेब्रुवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रानुसार 19 फेब्रुवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रानुसार 19 फेब्रुवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 21 फेब्रुवारी: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 फेब्रुवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  कलाकार किंवा संगीतकार, विद्यार्थी, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, राजकारणी आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसाठी आठवड्याचा पूर्वार्ध अनुकूल आहे. ज्या सिंगल व्यक्ती सोलमेटच्या शोधात आहेत त्यांना योग्य पर्याय मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी आणि मध्यस्थांशी संवाद साधताना अडचण येईल. तुमचा बुद्ध्यांक उच्च असेल आणि त्याचं तुमच्या यशात योगदान असेल. नफा आणि ब्रँड व्हॅल्यू मिळविण्यासाठी आयटी, ज्वेलरी, निर्यात, सौर उत्पादनांचे डीलर्स, सरकारी असाइनमेंट, वैद्यकीय शिक्षण आणि मीडिया उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केली पाहिजे.

  शुभ रंग: Yellow and Orange

  शुभ दिवस: रविवार

  शुभ अंक:1

  दान: मंदिरात केशर दान करा.

  या 5 चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी, म्हणून या वास्तू फॉलो करून मिळवा समाधान

  #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  या आठवड्यात प्रलंबित कौटुंबिक वादामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शहाणपणाने वागा. आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका. स्वत:साठी आणि इतरांसाठी वेळ देण्याचं लक्षात ठेवा. सोमवारी शंकराला दुग्धाभिषेक करावा. प्रेम संबंधांमध्ये विश्वास असेल त्यामुळे परस्पर बंध वाढतील. सामाजिक ओळख मिळवण्यासाठी कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहिलं पाहिजे. वर्क आउट करण्यात किंवा व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली आहे. या आठवड्यानंतर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वोत्कृष्ट बाजू प्रदर्शित केली पाहिजे. फूड इंडस्ट्रीचे मालक आणि कर्मचारी या आठवड्यातील प्रत्येक क्षणाची कदर करतील.

  शुभ रंग: Aqua

  शुभ दिवस: सोमवार

  शुभ अंक: 2

  दान: मंदिरात दोन श्रीफळं दान करा.

  #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  तुमच्या आहारात तुळशीच्या पानांचा समावेश करा. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची प्रगती होईल. सोशल नेटवर्किंगसाठी वैयक्तिक आयुष्यातील खर्च केलेला वेळ भविष्यातील वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतो. सरकारी प्रकल्पांशी किंवा करारांमध्ये सहभागी होण्याचं नियोजन असल्यास आठवड्याच्या सुरुवातीलाच कृती करा. सल्लागार, शिक्षक, गायक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि चित्रपट दिग्दर्शक यांच्यासाठी मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला आठवडा आहे. पुस्तकं, सजावट साहित्य, धान्य किंवा संगीत वाद्यं यांचा व्यवसाय चांगला होईल. शास्त्रज्ञ, संगीतकार, हॉटेलिअर्स, जॉकी, लाइफ कोच आणि फायनार्न्सना नफा आणि वाढ मिळेल.

  शुभ रंग: Violet

  शुभ दिवस: गुरुवार

  शुभ अंक: 3

  दान: लहान मुलांना झाडांची रोपं दान करा.

  #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  नेहमी प्राण्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी मांसाहार टाळा. उत्पादकांसाठी हा आठवडा आर्थिक व्यवहारांनी भरलेला आहे. कर्मचार्‍यांचा हा आठवडा नोकरी शोधण्यात जाईल. याशिवाय, लग्नाच्या प्रस्तावांवर विचार करण्यात, नवीन ऑर्डर करण्यात किंवा परदेशात प्रवास करण्यात हा आठवडा खर्च होईल. कृषी आणि व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी या आठवड्यातील दिवस अनुकूल आहेत. बँक कर्मचारी, आयटी कर्मचारी, कलाकार किंवा अभिनेते, न्यूज अँकर्स आणि डान्सर्सनी गुंतवणूक केली पाहिजे. कारण, त्यांना नफा मिळण्याची जास्त संधी आहे. हार्डवेअर, बांधकाम साहित्य, धातू आणि कपडे यांच्या उत्पादकांना व्यवसायात नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा.

  शुभ रंग: Blue and Grey

  शुभ दिवस: मंगळवार

  शुभ अंक: 5 आणि 6

  दान: आनाथाश्रमात धातूच्या वस्तू दान करा.

  Vastu Tips : करिअरमध्ये प्रगतीसाठी पाळा वास्तूचा हा नियम, सोप्या उपायांनी मिळेल भरघोस यश

  #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  तुमच्या व्यक्तिमत्त्वातील लढाऊ गुणामुळे तुम्ही या आठवड्यात सर्व स्पर्धा जिंकाल. गणेशपतीची पूजा करून त्याचे आशीर्वाद घ्या. मीडिया, संरक्षण, ट्रॅव्हल, थिएटर, खेळाडू आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आपल्या वरिष्ठांवर छाप पाडण्यात सक्षम होतील. या आठवड्यात जास्त आर्थिक नफा आणि मालमत्तेच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मॉडेलिंग, मेडिसीन, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, ऑडिशन आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमवलं पाहिजे.

  शुभ रंग: Sea Green

  शुभ दिवस: बुधवार

  शुभ अंक: 5

  दान: प्राण्यांना पाणी दान करा.

  #नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  शुक्र ग्रहाची शुद्ध उर्जा मिळवण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा केली पाहिजे. या आठवड्याचा उपयोग घरगुती कामं करण्यात, खरेदीसाठी आणि जोडीदार, मित्र, पालक, मुलं किंवा नातेवाईक यांच्यासोबत प्रवास करण्यासाठी करा. जर तुम्ही आयटी किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला नशिबाची साथ आणि स्थिरता मिळेल. तुम्ही मजबूत ब्रँड इमेज विकसित केल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना ओळख मिळेल. तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी मास कम्युनिकेशन हा सर्वोत्तम पर्याय आहे. संधी मिळण्यासाठी वेळ लागेल. लग्नाचे प्रस्ताव गांभीर्याने घेतले पाहिजेत कारण ते खूप अनुकूल आहेत. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डर्माटॅलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

  शुभ रंग: Pink and Aqua

  शुभ दिवस: शुक्रवार

  शुभ अंक: 6

  दान: गरिबांना दूध दान करा.

  योगिराज श्री शंकर महाराज : ``मै कैलास का रहनेवाला । मेरा नाम है शंकर"॥

  #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  सॉफ्टवेअर कंपन्यांतील टीम लीडर्सना या आठवड्यात सांघिक प्रयत्नांचे परिणाम अनुभवता येतील. त्यांच्यातील नेतृत्व कौशल्यांचं यश साजरं करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात सतत बदल होतील पण, सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधांबाबत मौन सोडलं पाहिजे. मोठे वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही शंकराचा आणि केतूचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. एखादी संधी स्वीकारण्यापूर्वी कायदेशीर बाबींचं विश्लेषण करा. अनुभवी लोकांच्या सूचना काळजीपूर्वक ऐका आणि त्यांचं पालन करा. भोग टाळा. डिफेन्स, कायदा, वैद्यकीय क्षेत्रांतील व्यक्ती, शास्त्रज्ञ, राजकारणी, नाट्य कलाकार, सीए आणि अभिनेते यांना नशिबाची विशेष साथ मिळेल.

  शुभ रंग: Peach

  शुभ दिवस: सोमवार

  शुभ अंक: 7

  दान: गरिबांना स्टीलची भांडी दान करा.

  #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  भेटवस्तू किंवा रोमँटिक भावनांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. इतरांची मदत आणि सेवा करून आठवड्याची सुरुवात करा. सरकारी कंपन्यांशी असलेल्या तुमच्या संबंधांमुळे चांगले रिटर्न्स मिळतील. या आठवड्यात आर्थिक लाभ जास्त होतील. शेतजमीन आणि यंत्रसामग्री खरेदीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक जबाबदाऱ्या आणि कायदेशीर विवाद टाळणं गरजेचं आहे. डॉक्टर आणि उत्पादकांना मिळालेल्या यशाबद्दल अभिमान वाटेल. वैयक्तिकरित्या भागीदारांशी वाद होण्याची शक्यता असल्याने आपलं डोकं शांत ठेवा. धान्य दान आणि व्यायामाचा अवलंब केला पाहिजे.

  शुभ रंग: Violet

  शुभ दिवस: शुक्रवार

  शुभ अंक: 6

  दान: गरजूंना कपडे दान करा.

  Maha Shivratri: महादेवाच्या गळ्यात का आहे नर ​​मुंडमाला? जाणून घ्या पौराणिक कथा

  #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  मंगळाच्या सामर्थ्याचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी या आठवड्यात तुम्ही शक्य तितकी डिजिटल पद्धतीने स्वतःची जाहिरात करा. विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या जोडीदाराजवळ मनातील भावना व्यक्त करा. शेअर बाजार आणि प्रशिक्षण व्यवसायात झपाट्यानं वाढ होईल. संपूर्ण आठवड्यात जोडपी आनंदी आणि रोमँटिक मूडमध्ये राहतील. तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही अल्कोहोलपासून दूर राहावं. प्रेमात असलेल्यांसाठी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी विलक्षण दिवस आहेत. व्यावसायिक संबंध आणि डील्स लवकरच प्रत्यक्षात येतील. डिझाईन, आयात-निर्यात, लेखन, ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडिया या क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकारणी आज मोठ्या संधींची पूर्तता करतील. पब्लिक फिगर्स आणि विद्यार्थ्यांनी या वेळेचा उपयोग सहयोग आणि प्रगती साधण्यासाठी केला पाहिजे. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर, डॉक्टर, वकील, अभियंते आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा मिळेल.

  शुभ रंग: Pink

  शुभ दिवस: मंगळवार

  शुभ अंक: 9

  दान: महिलांना बांगड्या दान करा.

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion