मुंबई, 30 डिसेंबर: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 6 साठी कसं असेल, जाणून घ्या.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
#नंबर 6 हा शुक्राचं प्रतिनिधित्व करतो
6 जन्मांक असलेल्या व्यक्ती करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळवतात. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यात या व्यक्ती सक्षम असतात. 6चा प्रभाव असलेल्या व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सर्व सुखसोयी देऊ शकतात. ते खूप सपोर्टिव्ह आणि सतत मदतीसाठी तत्पर असतात. या व्यक्ती बिझनेसमध्ये सर्वांत विश्वासू पार्टनर ठरतात. त्यांच्याकडे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्व असतं. त्यांच्याकडे वस्तू सुशोभित करण्याचं कौशल्य असतं. या व्यक्ती सुंदर ठिकाणं, चांगलं जेवण यांचा आनंद घेतात आणि आपल्या दिसवण्यावर त्या खूप खर्च करतात. त्यांना आलिशान जीवनशैलीची अपेक्षा असते.
सहा जन्मांकाच्या व्यक्ती खूप उदार मनाच्या असतात. खूप आकर्षक असल्यामुळे त्यांच्या आजूबाजूला सतत माणसांचा गोतावळा असतो. शिवाय कधीकधी त्या एकापेक्षा जास्त रिलेशनशीपमध्ये पडतात. 6 क्रमांकासाठी 2023 हे वर्ष फार चांगलं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, जुलै, ऑगस्ट, डिसेंबर महिन्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेता येतील.
2023करिता #नंबर 6चं विश्लेषण
#नंबर 6 - करिअर आणि पैशांच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज
2023 हे वर्ष 6 जन्मांक असलेल्या व्यक्तींच्या करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी सरासरीपेक्षा जास्त चांगलं आहे. आगाऊ नियोजन केल्यानं या वर्षी मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ होईल. तुम्ही नेहमी भागीदारीत काम करू शकता. या वर्षी इतर पक्षाकडून अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही प्लॅन स्थगित केले पाहिजेत. तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेतले पाहिजेत.
जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामगिरीचं मूल्यांकन केले जाईल आणि पदोन्नती मिळले. सहा जन्मांकाच्या व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी मिळाल्या तर परदेशाच्या तुलनेत देशातील नोकरीमध्ये जास्त प्रगती आणि समाधान मिळेल. 2023 मध्ये, नियोजनबद्ध निर्णय घेतले पाहिजेत. इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं कमी केलं पाहिजे. या दोन गोष्टी तुमच्यासाठी यशाची दारे उघडू शकतील.
#नंबर 6 - प्रेम, रिलेशनशीप आणि लग्नाच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज
6 जन्मांकाच्या व्यक्तींनी 2023 या वर्षात सर्व प्रकारच्या रिलेशनशीपमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. स्पष्ट आणि दीर्घ संवाद हा गैरसमज टाळण्याचा आणि प्रेमसंबंध मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग असेल.
6 जन्मांकाच्या व्यक्ती मोठ्या आणि उदार मनाच्या असल्यानं त्यांच्या सर्व समस्या लवकरातलवकर सोडवल्या जातील. विवाहित जोडप्यांनी कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी वेळ काढायला शिकलं पाहिजे. वैवाहिक जीवनातील समृद्धी टिकवण्यासाठी एकमेकांसोबत जास्तीतजास्त वेळ घालवा. 2023 मध्ये सहा अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी पैशांपेक्षा नातेसंबंधांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. सिंगल असलेल्या व्यक्तींना सोलमेट मिळण्याची फारशी शक्यता नाही. म्हणून संयम आणि शहाणपणाचं अनुसरण केलं पाहिजे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात खरं प्रेम मिळण्याची शक्यता जास्त आहे.
2023 मध्ये तुमचं कुटुंब तुम्हाला खूप पाठिंबा देईल. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याप्रमाणे काम करतील. सामाजिकदृष्ट्या, काही लोक तुमचा हेवा करतील आणि काही लोक तटस्थ राहतील. त्यामुळे निराशा टाळा आणि तुमच्या प्लॅनप्रमाणे पुढे जा. या प्रक्रियेदरम्यान, तुमच्या अटींचा त्याग करण्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक पत वाढवणाऱ्या सर्व संधींचा फायदा घेतला पाहिजे. तुमचं मोठं सोशल नेटवर्क, बिझनेस कनेक्शन्स आणि सामाजिक सुरक्षितता मिळवून देईल. त्यामुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सदिच्छा आणि ब्रँड इमेज पुन्हा चांगली होईल.
#नंबर 6 - 2023 या वर्षासाठी उपाय :
1. भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा यांना नारळ आणि खडिसाखर अर्पण करा.
2. चामड्याऐवजी चांदी, रोझ गोल्ड आणि डायमंड घाला.
3. नेहमी पांढरा रुमाल सोबत ठेवा.
4. कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचं एक पॅकेट बनवा आणि तुमच्या घरात काम करणाऱ्या मदतनीसला भेट द्या.
5. प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करा.
6. कृपया मांसाहार, मद्य, तंबाखू आणि चामडे टाळा.
शुभ रंग - निळा आणि पिंक
शुभ अंक - 6 आणि 5
शुभ दिशा - पूर्व आणि उत्तर
शुभ दिवस - शुक्रवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion