मराठी बातम्या /बातम्या /religion /अंकशास्त्र : रोमँटिक रिलेशनशीपमुळे घरामध्ये आनंदी वातावरण असेल.

अंकशास्त्र : रोमँटिक रिलेशनशीपमुळे घरामध्ये आनंदी वातावरण असेल.

अंकशास्त्रानुसार 8 जानेवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल

अंकशास्त्रानुसार 8 जानेवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल

अंकशास्त्रानुसार 8 जानेवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 10 जानेवारी: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 जानेवारी 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  हा आठवडा कर्म करण्याचा आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसे फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही मेळावे, सार्वजनिक कार्यक्रम आणि इव्हेंट्समध्ये सहभागी होऊ शकता. तिथे माईकवर बोलूदेखील शकता. पण, सार्वजनिक ठिकाणी जाताना भोगवासना टाळली पाहिजे. तुमची कार्यशैली आणि बोलणं याचा निश्चित केलेल्या टारगेट्सवर परिणाम होईल. सार्वजनिक ठिकाणी इतरांशी संबंध प्रस्थापित करण्याचं लक्षात ठेवा. जोडपी या आठवड्यात समृद्ध राहतील आणि प्रेमसंबंधांचा आनंद घेतील. कलाकार, डान्सर्स, सौर ऊर्जा विक्रेते, लेखक, सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर उद्योगातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळेल.

  शुभ रंग: Yellow

  शुभ दिवस: मंगळवार

  शुभ अंक: 1 आणि 3

  दान: गरिबांना पिवळी फळं दान करा.

  #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  तुमचा निर्णय आणि विश्लेषण परिपूर्ण आहे, म्हणून तुमच्या शहाणपणाचं पालन करा. स्वत:वर इतरांचा प्रभाव पडू देऊ नका. रोमान्स आणि कमिटमेंटच्या भावनेमुळे तुमचा आठवडा आनंदानं भरलेला असेल. रिलेशनशीपशी संबंधित भविष्यातील प्लॅन शेअर करणं बंधनकारक आहे. सोमवारी शंकराला दुधाचा अभिषेक करावा. देव तुम्हाला योग्य न्याय देईल आणि तुमची कामगिरी उंचावत जाईल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांना विनाकारण मदत करणं थांबवा. नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांसोबत खर्च करण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी, लहान सहलीचे नियोजन करण्यासाठी, स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. पार्टनरशीप गुंतवणूक आणि निर्यात व्यवसायातील डील्स करण्यासाठी चांगली वेळ आहे. तुम्ही तक्रार न केल्यास नातेसंबंधामध्ये रोमान्स टिकून राहील.

  शुभ रंग: Pink

  शुभ दिवस: सोमवार

  शुभ अंक: 2

  दान: भिक्षेकऱ्यांना दही दान करा.

  #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  करिअरमध्ये वाढ अपेक्षित आहे. कामात कामगिरी करण्याचा तसेच निर्णय घेण्याचा हा आठवडा आहे. मोठ्या संघटनांचा भाग होण्यासाठी प्रवास करण्याची वेळ आली आहे. समुपदेशक आणि शिक्षकांना परस्परांच्या भूमिका कराव्या लागतील. गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वकील यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आठवडा आहे. कपडे, दागिने, पुस्तकं, सजावटीचं साहित्य, धान्यं खरेदी किंवा प्रवास बुकिंग करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. डिझायनर्स, हॉटेलिअर्स, अँकर, लाईफ अँड स्पोर्ट्स कोचेस, फायनान्सर्स आणि संगीतकार विशेष कामगिरीचा आनंद घेतील. हळद किंवा तुळस खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा.

  शुभ रंग : Orange

  शुभ दिवस: गुरुवार

  शुभ अंक: 3 आणि 9

  दान: मंदिरात चंदन दान करा.

  #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या विरुद्ध आहे. त्यामुळे जोखीम घेण्यापेक्षा तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करा. पालकांना मुलांचा अभिमान वाटेल. बँक, विमा, आरोग्य, उपचार, कला, कपडे आणि व्यावसायिक मालमत्ता क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल आहे. मोठे आर्थिक निर्णय घेतल्यास विलंब होईल. विक्री कर्मचारी, आयटी कर्मचारी, थिएटर कलाकार किंवा अभिनेते, टीव्ही अँकर आणि डान्सर्स यांनी वाद टाळावेत. पैशाच्या बळावर निर्मात्यांचं भविष्य मार्गी लागेल. आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा.

  शुभ रंग: Purple

  शुभ दिवस: मंगळवार

  शुभ अंक: 9

  दान: मित्राला मनीप्लँट दान करा.

  #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी आहात पण या आठवड्यात तुम्ही बांधील असाल. गणपतीची पूजा करून आशीर्वाद घ्या. समविचारी लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती टाळा आणि इतरांवर विश्वास ठेवा. दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जास्त आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक मालमत्ता आणि निर्यात-आयातीत गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबानं दिलेल्या आदराची जाण ठेवून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. शेअर बाजार, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा, मुलाखती यामध्ये नशीब आजमवलं पाहिजे. तुमचा जोडीदार आज सर्वस्वी तुमचा असेल.

  शुभ रंग: Green and Orange

  शुभ दिवस: बुधवार

  शुभ अंक: 5

  दान: प्राण्यांना किंवा अनाथाश्रमात दूध दान करा.

  #नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  संघर्ष करणाऱ्या टीव्ही कलाकारांना अपेक्षित ऑफर मिळू शकतील. मिळालेल्या संधीचा वापर करा कारण ती भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्यावर कामाचा भार असेल पण कामाचा ताण सहज हाताळता येईल. बिझनेस क्लायंटशी समस्या सोडवण्याची आणि रात्रीच्या जेवणासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर जाण्याची वेळ आहे. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डर्माटॅलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांना नवीन असाइनमेंट मिळतील. त्यामुळे त्यांची प्रगती होईल. रोमँटिक रिलेशनशीपमुळे घरामध्ये आनंदी वातावरण असेल.

  शुभ रंग: Violet

  शुभ दिवस: शुक्रवार

  शुभ अंक: 6

  दान: भिक्षेकऱ्यांना मिठाई दान करा.

  #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  संशोधन, विश्लेषण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना नशीब आणि प्रगतीचा आनंद मिळेल. दिलेली संधी स्वीकारा कारण बुद्धीच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता. आई आणि इतर ज्येष्ठांच्या सूचना लक्षपूर्वक ऐका. मोठी वाटणारी समस्या लवकरच नाहीशी होईल. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. दागिने निर्मिती, वकील, कुरिअर, पायलट, राजकारणी, थिएटर आर्टिस्ट, सीए आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल.

  शुभ रंग: Beige

  शुभ दिवस: सोमवार

  शुभ अंक: 7 आणि 6

  दान: गुरांना किंवा गरिबांना केळी दान करा.

  #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.).

  सकाळच्या वेळी शनिमंत्राचा जप केला पाहिजे. मोठ्या कंपन्यांशी असलेले तुमचे संबंध भविष्यात चांगला परतावा मिळवून देतील. सध्याचा काळ संघर्षमय दिसत आहे. त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक लाभ जास्त होतील आणि मशिनरी खरेदीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. जास्त तास काम केल्यामुळे शारीरिक कष्ट जास्त होतील. निर्माण झालेले वाद लवकरच मिटतील. डॉक्टर आणि उत्पादकांना मिळालेल्या यशाबद्दल सन्मानित वाटेल. वैयक्तिकरित्या भागीदारांशी वाद होण्याची शक्यता असल्यानं आपलं डोके शांत ठेवा. धान्य दान करणं आणि आंबद पदार्थ खाणं गरजेचं आहे.

  शुभ रंग: Purple

  शुभ दिवस: शुक्रवार

  शुभ अंक: 6

  दान: गरजूंना चप्पल दान करा.

  #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  विरुद्धलिंगी व्यक्तींसोबत काम करणं हिताचं ठरेल, घरून काम करणं टाळा. संभ्रम दूर करण्यासाठी जोडप्यांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. ब्रँडची प्रशंसा होण्याची शक्यता असल्यानं तुम्ही गर्दीमध्ये सहभागी झालं पाहिजे. तडजोडीसह व्यावसायिक संबंध आणि डील्स मार्गी लागतील. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामधील व्यक्तींना प्रसिद्धीचा आनंद मिळेल. राजकारणी मोठ्या संधींची पूर्तता करतील. पब्लिक फिगर्स आणि विद्यार्थ्यांनी सहयोग आणि प्रगती साधण्यासाठी या आठवड्याचा उपयोग केला पाहिजे. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर, डॉक्टर, वकील, अभियंते आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा आनंद मिळेल.

  शुभ रंग: Brown

  शुभ दिवस: मंगळवार

  शुभ अंक: 9

  दान: आश्रमात गहू दान करा.

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion