मराठी बातम्या /बातम्या /religion /बोलक्या आणि मनमोकळ्या स्वभावाच्या असतात E आणि F अक्षराची मुले !

बोलक्या आणि मनमोकळ्या स्वभावाच्या असतात E आणि F अक्षराची मुले !

अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते.

अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते.

अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 18 जानेवारी:  बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.

  #अक्षर E : ज्या व्यक्तींचं नाव E या अक्षरापासून सुरू होतं, त्या व्यक्ती बोलक्या आणि मनमोकळ्या स्वभावाच्या असतात. सत्य उघड करण्यासाठी त्या इतरांचा विरोध पत्करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. या व्यक्तींच्या कल्पना सर्जनशील असतात. या कल्पनांना भव्य कृतींमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते. अशा व्यक्तींमध्ये सर्जनशीलता, क्षमता, परिश्रम आणि तग धरण्याची शारीरिक क्षमता या गुणांचं उत्तम मिश्रण असतं. त्यामुळे त्यांना हमखास यश मिळतं. E या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींचे विचार प्रगत असतात आणि त्या ज्ञान मिळवून स्वत:चा विकास करण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यक्ती शेवटपर्यंत हार मानत नाहीत. इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी त्या स्वतःला प्रोत्साहन देतात. अशा व्यक्ती आपल्या अटींशी तडजोड करत नाहीत. त्यामुळे त्यांना परफेक्शनिस्ट असंदेखील म्हटलं जातं. या व्यक्ती एकदा हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत त्यामुळे त्यांना फिनिशर्स म्हणतात. E या अक्षराची वैशिष्ट्यं यश मिळवण्याची शक्यता वाढवतात. विशेषत: मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये या व्यक्तींचं क्वचितच नुकसान होतं.

  उपाय : सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याची सवय लावा.

  शुभ रंग : Green and Aqua

  #अक्षर F : F या अक्षराचा कुटुंबव्यवस्थेशी फार जवळचा संबंध आहे. ज्या व्यक्तींची नावं F अक्षरापासून सुरू होतात, त्या फार कुटुंबवत्सल असतात. या व्यक्तींची घराशी घट्ट नाळ जोडलेली असते. या व्यक्ती तात्पुरत्या कारणासाठी जरी घराबाहेर पडल्या तरी त्यांना सतत घरची आठवण येते. या व्यक्ती अगदी बालिश असतात; पण त्यांचा हा बालिशपणा करमणूक करणारा असतो. F अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती नीतीला धरून चालणाऱ्या, सत्याचा आदर करणाऱ्या असतात. त्यांना इतरांची सेवा करण्याची इच्छा असते. या व्यक्ती अतिशय उदार वृत्तीच्या असतात. या व्यक्ती अतिशय निरागस असतात. त्यामुळे इतर व्यक्ती त्यांचा गैरवापर करून घेण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी सावध राहिलं पाहिजे. नाही तर मन दुखावलं जाण्याची शक्यता असते. F अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. या व्यक्ती वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात खूप चांगल्या पार्टनर बनतात. या व्यक्ती एकनिष्ठ असतात आणि निवडलेल्या तत्त्वांचं पालन करतात. या व्यक्ती देशभक्तदेखील असतात. आपल्या देशाची सेवा करण्यासाठी त्या काहीही करू शकतात. या व्यक्ती विश्वासू आणि शांतता प्रेमी असतात.

  उपाय : घरगुती मदतनीसांना मदत करत राहा, विशेषत : त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊ करा.

  शुभ रंग : Sky Blue and Pink

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion