मुंबई, 1 फेब्रुवारी: बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.
#अक्षर T: ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात T या अक्षराने होते त्या व्यक्ती त्यांच्या कृती आणि रिझल्टसने पूर्ण समाधानी असतात. त्यांना बुद्धीच्या मार्गाने यश हवं असतं. त्यांच्या क्षमतेबद्दल त्यांना खूप आत्मविश्वास असतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आणि निर्णायक असतं. ते कमीत कमी गोंधळलेले असतात आणि त्यांना त्यांच्या उद्दिष्टाबद्दल स्पष्टता असते. ते त्यांच्या तत्त्वांना आणि महत्त्वाकांक्षेला चिकटून राहतात. कोणत्याही परिस्थितीत ते त्यांचया विचारधारेशी तडजोड करत नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक असतं आणि ते गर्दीत सूर्यासारखे झळाळून उठलेले दिसतात. त्यांच्याबद्दल अनेकांना प्रेम वाटतं. त्यामुळे ते खूप यशस्वी नेते बनू शकतात. ते पूर्णतः धार्मिक असतात; मात्र त्यांचं अध्यात्म वेगळ्या प्रकारचं असू शकतं. ते विधींच्या पारंपरिक प्रकाराला चिकटून राहत नाहीत.
या व्यक्ती त्यांचा देश, मानवता आणि देवाप्रति निष्ठावान असतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व समूहात सहज उठून दिसण्यासारखं असतं. कारण ते दयाळू आणि उदार असतात. ते हसतमुखाने कायम दुसऱ्यांना मदत करतात. हेच त्यांचं वेगळेपण असतं. T या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या महिला अत्यंत हुशार, सर्जनशील असतात. त्या चांगल्या शिक्षिका, लेखिका, दिग्दर्शिका, चित्रकार, नर्तिका आणि शेफ बनू शकतात. T या अक्षराने नाव सुरू होणारे पुरुष कौन्सेलिंग, फायनान्स, शिक्षण, प्रशिक्षण, राजकारण आणि अॅनिमेशन या क्षेत्रांत उत्तम कामगिरी करतात. या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या कंपन्या उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रात अधिक असतात. या अक्षराचा कल खेळांपेक्षा अॅनिमेशन इंडस्ट्रीसारख्या क्रिएटिव्ह आर्टकडे झुकलेला असतो. या अक्षराने तीर्थंकरांसारखे महान आध्यात्मिक गुरूही निर्माण केले आहेत.
शुभ रंग : Blue & White
शुभ दिवस : सोमवार
उपाय :
1. आश्रमात किंवा गरिबांना दूध किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई दान करा.
2. विंड चाइम किंवा कारंज्यासारख्या हलत्या वस्तू कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या पूर्वेकडच्या भिंतीकडे ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.