मराठी बातम्या /बातम्या /religion /परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे! मग तुमच्या जन्मतारखेत आहेत का हे अंक?

परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे! मग तुमच्या जन्मतारखेत आहेत का हे अंक?

परदेश प्रवासासाठी मोबाईल क्रमांकाच्या सीरिजमध्ये 9, 5 आणि 1 क्रमांक समाविष्ट करणं हा सर्वोत्तम उपाय आहे.

परदेश प्रवासासाठी मोबाईल क्रमांकाच्या सीरिजमध्ये 9, 5 आणि 1 क्रमांक समाविष्ट करणं हा सर्वोत्तम उपाय आहे.

परदेश प्रवासासाठी मोबाईल क्रमांकाच्या सीरिजमध्ये 9, 5 आणि 1 क्रमांक समाविष्ट करणं हा सर्वोत्तम उपाय आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  #तुमची परदेशात नोकरी करण्याची किंवा स्थायिक होण्याची इच्छा असल्यास

  काही कारणास्तव, जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळू शकला नाही, पण तिला परदेशात काम करण्याची, स्थायिक होण्याची इच्छ असेल किंवा प्रवास करण्याची पुरेशी संधी मिळत नसेल, तर अशा व्यक्तीनं 9, 5 आणि 1 अंकांची प्लेसमेंट शोधली पाहिजे. त्या व्यक्तीच्या जन्मतारखेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हे अंक असले पाहिजेत.

  नंबर 9: 9 हा अंक बुद्धिमत्ता दर्शवतो आणि त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे तो व्यक्तीला यशाकडे घेऊन जातो. या अंकामुळे व्यक्तीला लढाऊ वृत्ती आणि स्वप्नं सत्यात उतरवण्याची वृत्ती मिळते. अशी व्यक्ती आपल्या संस्थेत उपयुक्त आणि उत्कृष्ट बनते.

  नंबर 5: 5 हा अंक समतोल दर्शवतो. तो इतरांचा विश्वास संपादन करण्यात मदत करतो. पाच अंकामुळे स्वातंत्र्याची भावना मिळते आणि व्यक्ती इतरांच्या जीवनात एक प्रेरणादायी घटक बनते. पाच अंकामुळे टीममध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले गुण मिळतात. पाच हा प्रवाही क्रमांक आहे आणि प्रवासाची आवड दर्शवतो. पाच क्रमांकामुळे जगभरातील सर्व ठिकाणं पाहण्याची आवड निर्माण होते.

  नंबर 1: प्रभावी कम्युनिकेशनसाठी एक क्रमांक आवश्यक आहे. तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकत असाल तरच तुम्ही ते इतरांपर्यंत पोहचवू शकता. एक हा अंक जीवनात यश मिळवण्याचा निर्धार देतो.

  जगभरातील इच्छित ठिकाणी स्थायिक होण्याचं तुमचं स्वप्न हे सर्व अंक एकत्रितपणे सत्यात उतरवतात. या अंकांच्या अनुपस्थितीत, तुम्हाला तुमच्या मूळ देशातून बाहेर पडण्यासाठी आणि काम करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे अंक तुमच्या जन्मतारखेत नसतील तर हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल की, तुम्ही परदेशात फक्त भेट देऊ शकता. तिथे काम करू शकत नाहीत.

  संख्याशास्त्रानुसार, परदेश प्रवासासाठी मोबाईल क्रमांकाच्या सीरिजमध्ये 9, 5 आणि 1 क्रमांक समाविष्ट करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेल्या या अंकांची आणि ग्रहांची उर्जा मिळवण्यास मदत होईल.

  दान:

  1. गुरांना हिरव्या पालेभाज्या दान करा.

  2. भगवान बालाजीला प्रदक्षिणा घाला आणि जप करा.

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion