मराठी बातम्या /बातम्या /religion /जन्मतारखेनुसार 27 मार्चनंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल?

जन्मतारखेनुसार 27 मार्चनंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल?

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 मार्च 2023नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात स्वतंत्रपणे काम करा आणि पाठिंबा शोधणं थांबवा. एकाच दिशेवर लक्ष केंद्रित करा. जोडप्यांनी त्यांच्या प्रोफेशनसाठी अधिक वेळ देणं गरजेचं आहे. सरकारी कर्मचारी आणि मध्यस्थांशी संवादात अडचण येईल. तुमचा बुद्ध्यांक उच्च राहीलं आणि तुमच्या यशात योगदान देईल. नफा आणि ब्रँड व्हॅल्यु मिळवण्यासाठी सौर ऊर्जा, सोन्याचे दागिने, निर्यात व्यवसाय, सौर उत्पादनांची डिलरशीप, सरकारी असाइनमेंट, वैद्यकीय शिक्षण आणि मीडिया इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

शुभ रंग: Yellow and Orange

शुभ दिवस: रविवार

शुभ अंक: 1

दान: आश्रमात पिवळे मूग दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

फ्लॅशबॅकमध्ये हरवलेल्या भावना पुन्हा उचंबळून येतील आणि तुम्हाला त्रास देतील. म्हणून, फक्त गोड आठवणी ठेवा आणि वाईट आठवणींकडे दुर्लक्ष करा. तणावातून बाहेर येण्यासाठी कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा घ्या. या आठवड्यात विश्रांती मिळेल. सोमवारी शंकराला दूध आणि पांढर्‍या तिळाचा अभिषेक करा. उत्तम आशीर्वाद मिळण्यासाठी नीटनेटकं राहा. प्रेम संबंधांमध्ये विश्वास राहील आणि त्यामुळे परस्पर बंध मजबूत होतील. या आठवड्यात कुटुंब आणि नातेवाईकांसोबत पैसे आणि वेळ खर्च करा, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावा, छोट्या ट्रिपची योजना करा, स्टॉकमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट द्या.

शुभ रंग: White

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2

दान: मंदिरात पांढरे तीळ दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

हा आठवडा कौतुक आणि पुरस्कारांनी भरलेला आहे. हा काळ सहयोगासाठी अतिशय योग्य आहे. अविवाहितांचे विवाह होऊ शकतील. हा आठवडा पैशांची आवक होण्याचा तसेच सार्वजनिक संवादाचा आहे. मोठ्या ब्रँड्सशी संलग्न होण्याची योजना असल्यास, 28 मार्च आणि 1 एप्रिलपर्यंत त्याची अंमलबजावणी करू शकता. सल्लागार, शिक्षक, गायक आणि वकील यांच्यासाठी हा आठवडा प्रभावी आहे. वाद मिटवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. पुस्तकं, सजावट साहित्य, धान्य किंवा संगीत वाद्ये यांचा चांगला व्यवसाय होईल. संगीतकार, हॉटेलिअर्स, जॉकी, लाइफ कोच, फायनान्सर्स आणि संगीतकारांना नफा मिळेल आणि त्यांची प्रगती होईल.

शुभ रंग: Violet

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 3

दान: गुरांना कच्ची केळी दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्ही आधीच शिस्तप्रेमी आहात पण, या आठवड्यात तुम्हाला लवचिकता आणि सहकार्य दाखवावं लागेल. व्यवहार, ऑडिशन, ऑडिटिंग, नोकरी शोधणं, कमिशनिंग किंवा लग्नाचे प्रस्ताव असोत, सर्व ठिकाणी तुम्ही अंत:करणापासून प्रयत्न केल्यास ते सत्यात उतरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. कृषी आणि व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अनुकूल दिवस आहेत. बँक कर्मचारी, आयटी कर्मचारी, कलाकार किंवा अभिनेते, न्यूज अँकर आणि डान्सर्स या आठवड्यात गुंतवणूक करू शकतात. कारण, त्यांना लाभ मिळण्याची जास्त शक्यता आहे. हार्डवेअर, बांधकाम साहित्य, धातू आणि कपड्यांच्या उत्पादकांना व्यवसायात नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. घरात तुळशीचं रोप आणा आणि त्याला रोज पाणी घाला.

शुभ रंग: Blue

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 5 आणि 6

दान: मित्राला तुळस दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

समस्येची तीव्रता कमी होईल आणि नशिबाची साथ मिळेल. गणपतीची पूजा करा आणि आशीर्वाद घ्या. खेळाडू आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींची लोकप्रियता वाढेल. या आठवड्यात जास्त आर्थिक नफा आणि निर्यात-आयातीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आज मॉडेलिंग, मेडिकल, स्पोर्ट्स, इव्हेंट्स क्षेत्रातील व्यक्तींनी ऑडिशन आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमवलं पाहिजे.

शुभ रंग: Green

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: प्राण्यांना दूध दान करा.

#नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कुटुंब, मित्र, कम्युनिटी, बॉस किंवा व्यावसायिक भागीदार यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा आठवडा उपयोगी पडेल. जर तुम्ही सेवा क्षेत्रात असाल तर तुम्हाला कायदेशीर कागदपत्रांशी संबंधित अडचणींना सामोरं जावं लागेल. महिलांच्या प्रयत्नांना ओळख मिळेल कारण त्यांनी कुटुंबात आणि सामाजिक वर्तुळात सन्मान मिळविण्यासाठी खूप मेहनत केली आहे. तुमची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी मास कम्युनिकेशन हा सर्वोत्तम पर्याय आहे. संधी मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. या आठवड्यात कुटुंबात पैशांची आवक होईल पण समाधान मिळणार नाही. लग्नाचे प्रस्ताव गांभीर्याने घेतले पाहिजेत कारण ते आता खूप अनुकूल आहेत. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डर्माटॅलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवतील.

शुभ रंग: Pink and Beige

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 5

दान: गरिबांना साखर दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दीर्घ संशोधन आणि कठोर परिश्रमानंतर नफा मिळणवण्याचं आणि तो टिकवून ठेवण्याचं काम मिळेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि नातेवाईकदेखील आनंदानं तुम्हाला मदत करतील. नेहमी फॅब्रिक किंवा लेदरऐवजी धातूच्या वस्तूंचा वापर करा. मोठे वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही शंकर आणि केतूचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. तुमचं मॅग्नेटिक व्यक्तिमत्व सर्वत्र प्रभाव पाडू शकतं त्यामुळे मिळालेली संधी स्वीकारा. बॉसच्या सूचना काळजीपूर्वक ऐका आणि त्यांचं पालन करा. सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा आणि व्यायाम करा. आयटी क्षेत्रातील व्यक्ती, वकील, शास्त्रज्ञ, पायलट, राजकारणी, थिएटर आर्टिस्ट, सीए आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना नशिबाची विशेष साथ मिळेल.

शुभ रंग: Orange

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7 आणि 9

दान: अनाथाश्रमात बडिशोप दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या मनातील कठोर विचार मोडून काढण्याचं लक्षात ठेवा आणि सध्याच्या परिस्थितीनुसार काम करा. मिठाच्या पाण्यानं आंघोळ करून आठवड्याची सुरुवात करा. काही निर्णयांबाबत झालेल्या वादामुळे कदाचित तुमच्या बॉसशी असलेल्या नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो; पण भविष्यात तुम्ही ऑफिसातील वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. मध्यम स्वरूपात आर्थिक लाभ होतील. अनेक जबाबदाऱ्यांमुळे जास्त ताण राहील. कायदेशीर विवाद लवकरच मिटतील. डॉक्टर आणि उत्पादकांना मिळालेल्या यशाबद्दल धन्य वाटेल. वैयक्तिकरित्या भागीदारांशी वाद होण्याची शक्यता असल्याने डोकं शांत ठेवा. धान्य दान करणं आणि लिंबूवर्गीय फळं खाणं गरजेचं आहे.

शुभ रंग: Purple

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: गरजूंना छत्री दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवस सुरू करण्यापूर्वी कुंकू लावा. या आठवड्यात तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी अधिक खर्च कराल. परदेशातील आणि प्रशिक्षण व्यवसायात चढ-उतार जाणवतील. जोडपी आज आनंदी आणि रोमँटिक मूडमध्ये असतील. दुखापत होण्याची आणि बदनामी होण्याची शक्यता असल्यानं आज तुम्ही गर्दीपासून दूर राहावं. प्रेमात असलेल्यांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विलक्षण आठवडा आहे. व्यावसायिक संबंध आणि सौदे प्रत्यक्षात येण्यासाठी अधिक वेळ लागेल. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामधील व्यक्तींना प्रसिद्धीचा आनंद घेता येईल. राजकारणी आज मोठ्या संधींची पूर्तता करतील. सार्वजनिक व्यक्ती आणि विद्यार्थ्यांनी सहयोग आणि प्रगती साधण्यासाठी या आठवड्याचा उपयोग केला पाहिजे. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर, डॉक्टर, वकील, अभियंते आणि अभिनेत्यांना लोकप्रियता मिळेल.

शुभ रंग: Red

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: गरीब मुलांना सफरचंद किंवा डाळिंब दान करा.

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichakra, Religion