मराठी बातम्या /बातम्या /religion /Numerology: नंबर 4 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य !

Numerology: नंबर 4 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य !

अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 4 साठी कसं असेल, जाणून घ्या.

अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 4 साठी कसं असेल, जाणून घ्या.

अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 4 साठी कसं असेल, जाणून घ्या.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 28 डिसेंबर: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 4 साठी कसं असेल, जाणून घ्या.

  #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  #नंबर 4 हा राहूचं प्रतिनिधित्व करतो.

  #4 जन्मांक असलेल्या व्यक्ती मेहनती असतात. ध्येय आणि लक्ष्य साध्य करण्याला त्या नेहमीच प्राधान्य देतात. अशा व्यक्ती इतर लोक जो विचार करतात त्याच्या पलीकडे जाऊन विचार करतात. या व्यक्ती भविष्य-केंद्रित असल्यानं, त्या भूतकाळाचा विचार न करता नेहमी भविष्यावर लक्ष ठेवतात. ते प्रेमाबाबत प्रामाणिक असतात; पण त्या बदल्यात त्यांना प्रेम मिळणं कठीण जातं.

  4 क्रमांकासाठी 2023 हे वर्ष खडतर आव्हानं आणि यशांचं मिश्रण असेल. या क्रमांकाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती दान-धर्म तसंच व्यवसायासाठी अधिक वेळ देतील. या व्यक्ती या वर्षी अनेक नवीन गोष्टी शिकतील आणि लोकांवर चांगली छाप पाडण्यास सक्षम असतील.

  तुम्हालाही मृत व्यक्ती नेहमी स्वप्नात दिसतात का? सावधान; हे असू शकतात यामागचे संकेत

  2023करिता #नंबर 4चं विश्लेषण

  #नंबर 4 - करिअर आणि पैशांच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज 2023

  क्रमांक 4 साठी हे वर्ष समृद्धीचं आणि आर्थिक लाभाचं आहे. मोठे निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका बाकी सगळं आपोआप पार पडेल. वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या आयुष्यात नशीब विशेष भूमिका बजावेल.

  स्टील, सिमेंट, कोळसा, विटा आणि इतर हार्डवेअर निर्मिती, आयात-निर्यात व्यवसायातील व्यक्तींना विस्तृत कनेक्शन्स आणि उज्ज्वल भविष्यामुळे यश मिळेल. तुम्ही परदेशात ऑफिस सुरू करू इच्छित असाल किंवा नोकरीसाठी परदेशात जाऊ इच्छित असाल तर हे वर्ष त्यासाठी अनुकूल आहे. या वर्षात परफॉर्मन्स अप्ररायझल आणि हाय इन्सेन्टिव्ह मिळणं अपेक्षित आहे. एकूणच, 2023 हे वर्ष पैसा आणि प्रगतीच्या बाबतीत खूप चांगलं असेल. 2023 च्या अखेरीस बचत कमी होऊ शकते. पण, 2023 मध्ये तुमच्याकडे वेळ जास्त असेल.

  #नंबर 4 - प्रेम, कुटुंब आणि लग्नाच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज

  2023 हे वर्ष तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवेल. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी कमी वेळ मिळेल. परिणामी, अधिक गैरसमज आणि संवादात आव्हानं निर्माण होतील. विवाहित जोडप्यांनी एकमेकांच्या सहकार्याचा आनंद घेण्यासाठी कमी वेळ खर्च केला पाहिजे. तुम्ही दीर्घ सहलीसाठी वेळ काढण्यात यशस्वी ठराल. लांबचा प्रवास केल्यानं तुम्हाला कमालीचं उत्साही वाटेल आणि प्रेम संबंध दृढ होतील.

  तुम्ही नातेसंबंधाशी संबंधित भूतकाळातील सर्व समस्यांचं निराकरण कराल आणि नवीन नातं सुरू कराल. अविवाहितांपेक्षा विवाहित जोडप्यांसाठी हे वर्ष अधिक चांगलं असेल. एकूणच, क्रमांक 4 साठी 2023 हे असं वर्ष आहे की, त्यात कोणत्याही मोठ्या समस्या नाहीत. 2023 हे प्रेम आणि विवाहासाठी अनुकूल असेल.

  सामाजिक जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावी होईल. कारण, लोक या क्षेत्रातील तुमच्या नवीन संशोधनाची प्रशंसा करतील आणि त्यांना तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पना आवडतील. तुम्ही काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन निर्माण कराल. कौटुंबिक व्यवसायातील तुमचा सहभाग किंवा कौटुंबिक समस्या लवकर स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासमोर तुमचं मत व्यक्त करू शकणार नाही.

  तुमची निराशा कमी करण्यासाठी 2023 या वर्षात कौटुंबिक समस्यांमध्ये तुम्ही शांत आणि संयमी राहिलं पाहिजे. एकूणच, 2023 हे पैसे कमवण्याचं आणि सामाजिक स्थितीचा आनंद घेण्याचं वर्ष आहे.

  #नंबर 4 - 2023 या वर्षासाठी उपाय :

  1) शनिवारी जनावरांना चारा द्या.

  2) सकाळी भगवान शिव आणि गणेशमंत्रांचा जप करा.

  3) तुमच्या पाकिटात चौकोनी किंवा आयताकृती आकाराचं चांदीचं नाणं ठेवा.

  4) तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि हिरवा ठेवा.

  5) चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळा.

  6) मांसाहार आणि मद्य टाळा.

  दान: गुरांना हिरव्या पालेभाज्या खाऊ घाला.

  शुभ रंग: निळा आणि ग्रे

  शुभ अंक: 5 आणि 6

  शुभ दिशा: उत्तर आणि नैऋत्य

  शुभ दिवस: बुधवार आणि शुक्रवार

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion