मराठी बातम्या /बातम्या /religion /

Numerology: जन्मतारखेनुसार 24 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

Numerology: जन्मतारखेनुसार 24 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

अंकशास्त्रानुसार 24 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

अंकशास्त्रानुसार 24 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

अंकशास्त्रानुसार 24 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 जानेवारी: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 24 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमच्या गुरूच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. आजचा दिवस भूतकाळातील सर्व चांगल्या कर्मांचं फळ प्राप्त करण्याचा आहे. देवाच्या आशीर्वादानं तुमचं आज कौतुक होईल आणि आणि समाजात आदर वाढेल. तुम्ही आज अशा व्यक्तीला भेटाल जी तुम्हाला तिच्या मजबूत पार्श्वभूमीद्वारे कायदेशीर किंवा ऑफिशिअल समस्या सोडवण्यात मदत करू शकेल. अभिनेत्यांना आज ऑफर मिळण्याची शक्यता आहे. ती त्यांनी स्वीकारली पाहिजे. आकर्षण वाढवण्यासाठी चामड्यापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर टाळा. आज एखादी नवीन ऑफर मिळणं अपेक्षित आहे.

शुभ रंग: Teal

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 5

दान: आश्रमात झाडांची रोपं दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस नातेसंबंध निर्माण करण्याचा आणि सोशल नेटवर्किंग वाढवण्याचा आहे. रोमँटिक नातेसंबंध आणि मुलांशी असलेलं नातं, दोन्हीही विश्वासू वाटतात आणि म्हणूनच त्यांना वेळ दिला पाहिजे. तुमच्या मनातील भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी आज रोमँटिक दिवस आहे. बिझनेसमधील कमिटमेंट्स सुरळीतपणे पूर्ण होतील. मोठ्या कंपनीसोबत भागीदारी करण्यासाठी योग्य वेळ आहे. काम इतरांवर सोपवणं टाळा. राजकारण्यांनी आज कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या सेवा क्षेत्रातील व्यक्तींची आज प्रगती होईल आणि त्यांना फायदा मिळेल. वैयक्तिक निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवा.

शुभ रंग: Aqua

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2 आणि 6

दान: गरिबांना पांढरा भात दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

धातूचा वापर टाळा. त्याऐवजी गुरू ग्रहाची कृपा राहण्यासाठी नेहमी लाकडी वस्तू वापरा. राजकारणी किंवा पब्लिक डिलर्स आजच्या दिवसाचा पुरेपूर वापर करतील. थिएटर आर्टिस्टनी कामाच्या ठिकाणी आज नवीन सुरुवात करावी. नशीब साथ देईल पण आज मित्रांशी आर्थिक बाबी शेअर करू नका. संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, न्यूज अँकर, राजकारणी, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेलिअर आणि लेखक यांच्या करिअरच्या वाढीसाठी आज विशेष घोषणा होण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: Red and violet

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 3

दान: गरजूंना कच्ची हळद दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

विवाहित किंवा अविवाहित जोडपी आज एकत्र वेळ घालवतील. त्यांना आज समृद्धी मिळेल. सहयोग किंवा भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. गुंतवणुकीतून परताव्याची वाट पाहत असताना संयम ठेवा. लवकरच त्यातून तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. आज तुम्ही सर्व असाइनमेंट वेळेवर पूर्ण कराल. कपडे किंवा चप्पल दान केल्यानं चांगला लाभ मिळेल. मॅन्युफॅक्चरिंग, मेटल, मशिनरी, कॉस्मेटिक्स, वास्तू, सॉफ्टवेअर आणि ब्रोकर या क्षेत्रातील व्यक्ती आज करारांवर सही करू शकतात. उत्कृष्ट व्यावसायिक जीवनाचा आणि अभिमानी पालक होण्याचा अनुभव मिळेल.

शुभ रंग: Blue

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: अनाथाश्रमात कपडे दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्ही जोडीदारासोबत डेटवर जाऊ शकता. फिक्या रंगाचे कपडे घाला करा जेणेकरून यश आणि प्रगतीमध्ये वाढ होईल. प्रवासाचे बेत यशस्वी होतील. मालमत्ता किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. त्यातून लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे. खेळाडू आणि प्रवाशांना आज सर्वोत्तम निकाल मिळतील. मीटिंगमध्ये नशिबाची साथ मिळावी यासाठी हिरव्या रंगाचे कपडे घाला. आज आयुष्याकडून तुम्हाला पाहिजे ती भेट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आज जोडीदारासमोर प्रेम व्यक्त केलं पाहिजे.

शुभ रंग: Sea Green

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: गरिबांना हिरवी फळं दान करा.

#नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

लग्नाच्या प्रस्तावांची वाट पाहत असल्यास आजचा दिवस अनुकूल जोडीदार मिळण्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक बांधिलकी पूर्ण करण्यासाठी आणि सामाजिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आज चांगला दिवस आहे. आज समाधान आणि आत्मसन्मान मिळेल. अनेक घडामोडींमुळे आजचा दिवस व्यस्त असेल. फंक्शन्समध्ये सहभागी होण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी, फॅमिली आउटिंगला जाण्यासाठी, पिकनिकला जाण्यासाठी, स्टेज परफॉर्मन्स करण्यासाठी आणि शॉपिंगला बाहेर जाण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांकडून तुमचे लाड होतील. ब्युटीशियन्स, कॉस्मेटिक व्यवसाय, डिझायनर, डान्सर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टरांनी त्यांच्या कौशल्यांचं प्रदर्शन केलं पाहिजे. कारण, आजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय चांगला आहे. वडिलांनी मुलांना भविष्यासाठी मार्गदर्शन केलं तर त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं.

शुभ रंग: Blue

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: 1. घरकाम करणाऱ्या मदतनीसाला सौंदर्य प्रसाधनं दान करा.

2. महिलेला बांगड्या दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज डॉक्युमेंटेशन आणि आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतणं चांगलं ठरेल. आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असू शकतो. पण, समवयस्क किंवा कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानं तुम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ शकता. आर्थिक बाबींशी संबंधित ज्ञान आणि शहाणपण लागू करण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्या पूर्वायुष्यातील कर्माच्या बदल्यात नातेसंबंधांत विश्वास आणि आदर मिळेल. आज कागदपत्रांवर विसंबून राहण्याची गरज नाही कारण आज ऑडिटची गरज आहे. सरकारी निविदा, रिअल इस्टेट, शाळा, इंटिरिअर्स आणि धान्य व्यवसायांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही भावनिक झाल्यास व्यावसायिक संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: Yellow and Blue

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7

दान: मंदिरात पिवळी मिठाई दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नेटवर्किंगमध्ये आज तुमचं नशीब मजबूत भूमिका बजावेल. कारण, आज सार्वजनिक व्यासपीठावर तुमची ओळख निर्माण होईल. भूतकाळ विसरून पुढे जा. जिद्द सोडा आणि वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याचं पालन करा. यश तुमच्यापासून फार दूर नाही आणि आता तुम्ही अनेक जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर घेऊ शकता. दुपारच्या जेवणापूर्वी बिझनेसमधील व्यवहार यशस्वी होतील. करार किंवा मुलाखतींना उपस्थित राहणं आवश्यक आहे. आज कुटुंबासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. आज प्रवास टाळा. पैशाचं संतुलन आणि प्रेमसंबंध वाढवण्यासाठी आजचं कॉम्बिनेशन फार चांगलं आहे.

शुभ रंग: Sea Blue

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: गुरांना हिरवं धान्य दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

खर्चावर नियंत्रण ठेवा. डान्सर्स, चित्रकार, कलाकार, शास्त्रज्ञ, डिझायनर आणि संगीतकार हे ब्रँड इमेज तयार करण्यासाठी आजच्या दिवसाचा वापर करू शकतात. मेडिकल सायन्स, सायंटिस्ट, ग्लॅमर इंडस्ट्री, फायनान्स, ज्योतिष, वास्तू, आर्किटेक्चर क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. क्रिएटिव्ह आर्ट्स क्षेत्रातील व्यक्तींना आज यश मिळले आणि त्यांचं मूल्यांकन होईल. व्यवसायात किंवा नोकरीत सामर्थ्यशाली पद मिळविण्यासाठी सरकारी कनेक्शन किंवा समवयस्कांशी संपर्क साधला पाहिजे. कारण, आज सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आज लाल रंगाचे कपडे घाला. स्त्रियांनी आज त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि शाकाहारी अन्न खाल्लं पाहिजे.

शुभ रंग: Red

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9 आणि 6

दान: गरिबांना लाल फळं दान करा.

24 जानेवारी रोजी जन्मलेले सेलिब्रिटी: रिया सेन, सुभाष घई, राहुल भट, डी इमाम, अनिल अग्रवाल, पीयूष गुप्ता.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion