मुंबई, 7 जानेवारी: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
गटामध्ये फक्त सहभागी होण्यापेक्षा एखाद्या नेत्याप्रमाणं योगदान द्या. घेतलेले सर्व निर्णय सकारात्मक आणि सर्वोत्तम असतील. कोणत्याही कृतीपूर्वी ध्यानधारणा करा. अभिनेते आणि वक्त्यांच्या कामामध्ये वाढ होईल. शिक्षक, डॉक्टर, धातू उत्पादक, वित्तपुरवठादार आणि वकील यांना ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी त्या स्वीकाराव्यात. आकर्षण वाढवण्यासाठी चामड्याची उत्पादनं वापरणं टाळा.
शुभ रंग : Yellow
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 3 आणि 7
दान : मंदिरात कच्ची हळद दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
महिलांनी आपल्या सौम्य बोलण्यानं मन जिंकावं आणि पांढरा पदार्थ शिजवावा. अनावश्यक नाटक किंवा कौटुंबिक समस्यांपासून दूर राहावं. तुमची अंत:प्रेरणा तुम्हाला साथ देईल. आजचा दिवस रोमँटिक भावनांनी भरलेला असेल. जिद्द कमी करा आणि तुमची स्वप्नं शेअर करा. एखादी गोष्ट किंवा काम दुसऱ्यावर सोपवणं टाळा. राजकारणी, मीडिया क्षेत्रातल्या व्यक्ती, शेतकरी, बँकर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनी मालमत्ता खरेदीवेळी सह्या करताना काळजी घ्यावी.
शुभ रंग : Off white
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2, 6
दान : गरिबांना दहीभात दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
गुरूची शुद्ध ऊर्जा मिळविण्यासाठी तुळशीच्या रोपाला पाणी घालण्यापूर्वी त्यात थोडी हळद घाला. मास स्पीकर्स आणि मीडिया इंडस्ट्रीतल्या व्यक्तींसाठी वेळ फार चांगला नाही. तुमच्या चार्ममुळे टीमचं नेतृत्व करण्याची संधी आणि यश मिळेल. थिएटर आर्टिस्टनी नवीन कामाची सुरुवात करावी. नशीब साथ देईल; पण मित्रांशी आर्थिक बाबी शेअर करू नका. संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर, राजकीय व्यक्ती, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेलियर आणि लेखक यांच्या करिअरच्या विकासाच्या दृष्टीने विशेष घोषणा होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : Orange and Voilet
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3, 1
दान : गरजूंना ब्राउन राइस दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
राहू मंत्राचा जप करा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा, जेणेकरून राहू ग्रहाची सकारात्मक उर्जा मिळेल. सर्व प्रमुख निर्णय योग्य पद्धतीने घेतल्यास आज आर्थिक कमाई होण्याची शक्यता आहे. सध्याच्या योजनांचा आढावा घेणं आवश्यक आहे. सर्व असाइनमेंट उत्तम प्रकारे पूर्ण कराल. पण स्वतःसाठीदेखील थोडा वेळ काढला पाहिजे. धान्य दान केल्यास जादुई परिणाम मिळतील. बांधकाम, यंत्रसामग्री, धातू, सॉफ्टवेअर आणि दलाली क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज करारांवर स्वाक्षरी करणं टाळावं. खेळाडूंच्या पालकांना आज मुलांचा अभिमान वाटेल.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : गरिबांना धान्य किंवा ब्लँकेट दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या मर्यादेत राहिलात तर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील. आज सर्व उद्दिष्टं सहजपणे आणि वेगाने पूर्ण होतील. दिवसाच्या पूर्वार्धात नशिबाच्या जोरावर तुम्हाला विजय मिळेल. आज तुमच्या कामगिरीसाठी बक्षिसं आणि ओळख मिळेल. आर्थिक लाभ म्हणून मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी लवकरच मिळेल. खेळाडू, अँकर्स, ज्वेलर्स, विद्यार्थी आणि प्रवासी यांना सर्वोत्तम परिणाम मिळतील. मीटिंगमध्ये नशिबाची साथ मिळण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे घाला. आज आवडीच्या बाबी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रिय व्यक्तीला प्रपोझ करा.
शुभ रंग : Green and Peach
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : मंदिरात श्रीफळ दान करा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कृत्रिम दागिन्यांऐवजी सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने घाला. सभोवतालच्या व्यक्ती तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतील. म्हणून व्यावहारिक आणि काही वेळा मुत्सद्दीपणा दाखवा. तुम्ही सक्रिय राहाल आणि अनेक कामं पूर्ण कराल. आज रोमान्स आणि त्यागाची भावना उंचबळून येईल. फसवणूक होऊ नये, यासाठी सावध राहण्याची गरज आहे. इतरांच्या मनावर राज्य कराल आणि तुम्हाला खूप आदर मिळेल. अनेक घरगुती जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर घेऊ नका. कारण एका वेळी सर्वांना खूश करता येत नाही. हॉटेलिअर्स, ट्रॅव्हलर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्स आज आपल्या कौशल्यांचं प्रदर्शन करतील. आजचा दिवस त्यांच्यासाठी फार चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रातल्या भविष्यबाबत पालकांचं मार्गदर्शन घ्या.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : मंदिरात चांदीचं नाणं दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज गुंतून पडू नका. गडद रंगाचे कपडे घाला. आज जास्त नफा किंवा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. वडील व गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि सर्वोत्तम लाभाचा आनंद घ्या. नेतृत्व आणि विश्लेषणात्मक कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वातले दोन महत्त्वाचे पैलू आहेत. आज पैशांच्या निर्णयांशी संबंधित ज्ञान आणि शहाणपण वापरावं लागेल. तुमच्या निर्मळ मनामुळे नातेसंबंधांमधला विश्वास वाढेल. आज कागदपत्रांच्या ऑडिटची गरज नाही. कारण ते व्यवस्थित आहेत. उपचार, कोर्ट, स्टेशनरी, थिएटर, तंत्रज्ञान, सरकारी निविदा, रिअल इस्टेट, शाळा, इंटीरिअर आणि धान्य इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोपर्यंत भागीदारीत नसाल, तोपर्यंत व्यावसायिक संबंध चांगले राहतील.
शुभ रंग : Yellow and Orange
शुभ दिवस : सोमवार, गुरुवार
शुभ अंक : 7
दान : गरिबांना सूर्यफूल तेल दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.).
कर्म आणि त्यांची फळं यांचा उत्तम संयोग तुमच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मिळविण्यासाठी आज मीठ घातलेलं अन्न वितरित करा आणि 8 क्रमांकाला सिद्ध करा. विचारांतला ताठरपणा सोडा आणि चांगली संधी स्वीकारा. कर्मचार्यांशी बोलताना सौम्यपणा बाळगा. सामानाची काळजी घेण्याची आणि आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याची ही वेळ आहे. दुपारच्या जेवणानंतर बिझनेसमधले व्यवहार यशस्वी होतील. कौटुंबिक समारंभ, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार किंवा मुलाखतींना उपस्थित राहणं गरजेचं आहे. आज कुटुंबासोबत वेळ घालवणं आवश्यक आहे. आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी शंकर आणि शनिदेव यांचे आशीर्वाद मिळवणं गरजेचं आहे.
शुभ रंग : Sea Blue and Creme
शुभ दिवस : शुक्रवार, गुरुवार
शुभ अंक : 6
दान : गायींसाठी हिरवं धान्य दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
दक्षिणेकडच्या भिंतीवर लाल रंगाचा बल्ब लावा. आज सामर्थ्य, पैसा, ओळख, लक्झरी आणि लोकप्रियता मिळेल. अभिनय, मीडिया, अँकरिंग, खेळ, बांधकाम, वैद्यकीय, राजकारण आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्ती आज नवीन उंची गाठतील. शिक्षण किंवा क्रिएटिव्ह आर्ट्स क्षेत्रातल्या व्यक्तींना आज भरपूर यश मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी आज कौटुंबिक संबंधांचा वापर केला पाहिजे. कारण, चांगल्या प्रतिसादाची शक्यता आहे. सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करण्यासाठी डाळिंब खा.
शुभ रंग : Red
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9, 6
दान : गरिबांना लाल रंगाचं धान्य दान करा.
7 जानेवारी रोजी जन्मलेले सेलेब्रिटी : बिपाशा बसू, इरफान खान, शोभा डे, वरुण बडोला, सुप्रिया पाठक, रीना रॉय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion