मराठी बातम्या /बातम्या /religion /Numerology: दोन संख्यांमधील परस्पर सुसंगत संबंध - अंक 5

Numerology: दोन संख्यांमधील परस्पर सुसंगत संबंध - अंक 5

स्वामी ग्रह: क्रमांक पाच हा बुधाचं प्रतिनिधित्व करतो.

स्वामी ग्रह: क्रमांक पाच हा बुधाचं प्रतिनिधित्व करतो.

स्वामी ग्रह: क्रमांक पाच हा बुधाचं प्रतिनिधित्व करतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च: स्वामी ग्रह: क्रमांक पाच हा बुधाचं प्रतिनिधित्व करतो.

क्रमांक 5 हा क्रमांक 6 शी किती सुसंगत आहे.

#क्रमांक 6: क्रमांक पाच आणि सहा या दोन्हींची जोडी मजबूत दीर्घकालीन मैत्री निर्माण करण्यासाठी एकत्र येते. पाच आणि सहा जन्मांक असलेल्या व्यक्ती उत्कृष्ट स्टार जोडपं, व्यावसायिक भागीदार, सहकारी, बॉस, कर्मचारी किंवा मित्र बनतात. दोघेही एकत्र मिळून समृद्ध आणि चांगलं जीवन जगतात. या व्यक्ती व्यवसायात आल्यास त्या यशाची उंची गाठतात. 6 क्रमांकाचं ऐश्वर्य वापरण्यासाठी एखाद्या व्यक्तीला नेहमी क्रमांक पाचच्या मदतीची गरज असते.

पाच आणि सहाचं संयोजन तुम्हाला समाधानी आणि कृतज्ञ जीवन देऊ शकतं. या अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्ती सामान्यतः रोमँटिक आणि मनानं चिरतरूण असतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व बोल्ड आणि अष्टपैलू असतं त्यामुळे त्या सर्वांना आवडतात. व्यवसाय असो की लग्न असो या व्यक्ती स्वतःचे निर्णय स्वत: घेण्यास प्राधान्य देतात. भारतातील अशा संयोजनाचं उत्तम उदाहरण म्हणजे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली. त्याचा जन्म 5 नोव्हेंबर रोजी झाला आहे आणि त्याचा भाग्यांक 6 आहे.

शुभ रंग: White and sky blue

शुभ दिवस: बुधवार आणि शुक्रवार

शुभ अंक: 5

दान: गुरांना पाणी दान करा.

क्रमांक 5 हा क्रमांक 7शी किती सुसंगत आहे.

क्रमांक 7: सात आणि पाच जन्मतारीख असलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात कणखरपणा स्पष्टपणे दिसतो. एखाद्या व्यक्तीकडे बुधाचा प्रभाव असलेल्या पाच आणि सातची शक्ती असेल तर ती व्यक्ती साधारणपणे चतुर कार्यकर्ता, हुशार, आत्मकेंद्रित, तर्कसंगत आणि हुशार असते. पाच आणि सातचा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी योग्य वेळी घेतलेले निर्णय अचूक ठरतात. मात्र, आयुष्याच्या आणि यशाच्या या संपूर्ण प्रवासात, आपल्या अतिशय व्यावहारिक स्वभावामुळे आणि फायदा मिळवण्याच्या विचारांमुळे ते नातेसंबंध किंवा मैत्री गमावतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी आपल्या भावनांचा समतोल राखला पाहिजे आणि कधी-कधी मनापेक्षा त्यांच्या हृदयाचं ऐकलं पाहिजे.

या व्यक्तींना त्याचं आयुष्य नेहमीच दुहेरी पर्याय देईल. त्यांनी फक्त हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, सर्वोत्तम पर्याय निवडताना त्यांनी आपल्या सिक्स्थ सेन्सची शक्ती वापरली पाहिजे. असं केल्यास या व्यक्ती यश मिळवतील आणि ते अधिकाधिक प्रगती करत राहतील. क्रीडा, राजकारण, उत्पादन, सॉफ्टवेअर, व्यापार, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, टेलिकॉम, स्पॉन्सरशिप, इव्हेंट्स आणि ग्लॅमरशी संबंधित व्यवसाय या व्यक्तींना पैसा आणि प्रसिद्धी कमावण्याच्या अफाट संधी देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाच आणि सातचा प्रभाव असलेल्या जोडप्यांनी नात्यामध्ये अधिक भावनिक असणं गरजेचं आहे. भौतिक लाभ किंवा मागण्यांपेक्षा वास्तविक आणि खऱ्या नातेसंबंधांना महत्त्व देणं गरजेचं आहे.

शुभ रंग: Green

शुभ दिवस: बुधवार आणि सोमवार

शुभ अंक: 5

दान: आश्रमात पिवळा मसूर दान करा.

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion