मराठी बातम्या /बातम्या /religion /हवी आहे सरकारी नोकरी ? मग तुमच्या जन्मतारखेत आहेत का हे अंक ?

हवी आहे सरकारी नोकरी ? मग तुमच्या जन्मतारखेत आहेत का हे अंक ?

न्यूमरॉलॉजीच्या अनुषंगाने पेशाची निवड

न्यूमरॉलॉजीच्या अनुषंगाने पेशाची निवड

न्यूमरॉलॉजीच्या अनुषंगाने पेशाची निवड

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 9 जानेवारी: जर तुमच्या जन्मतारखेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या 4, 6 आणि 9 हे अंक असतील; तर सरकारी संस्थेत नोकरी मिळण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक असते. सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करण्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला शिस्तप्रिय, मेहनती आणि फोकस्ड असणं आवश्यक आहे. 4 अंकामध्ये हे सर्व गुण दिसून येतात. यश मिळवण्यासाठी योग्य नियोजनदेखील गरजेचं आहे. 4 हा अंक तुम्हाला चांगली नियोजन क्षमता देतो. तुमच्या कामाच्या शैलीत व्यवस्थितपणा, शिस्त आणि व्यवस्थापन कौशल्य आणण्यासाठीही 4 हा अंक मोलाची भूमिका बजावतो. जन्मतारखेत 4 क्रमांक असलेल्या व्यक्तींना इतर लोकांकडून काम करून घ्यायचं कौशल्य अवगत असतं. त्यामुळेच उच्चपदावर काम करण्यासाठी या व्यक्ती योग्य ठरतात. हे लोक महान रणनीतीकारही बनू शकतात. 4 हा अंक तुम्हाला महत्त्वाकांक्षी आणि व्यावहारिक बनवतो. तसेच, मेहनत करून आपलं ध्येय कसं गाठायचं हेदेखील या व्यक्तींना चांगलं जमतं. 6 हा अंक तुम्हाला जबाबदारीची जाणीव आणि दृढ निश्चय पुरवतो. आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. जन्मतारखेमध्ये 6 अंक असलेल्या व्यक्तींना भरपूर संधी उपलब्ध होतात, तसेच त्या मिळवणेही या व्यक्तींना शक्य होते. आपली कौशल्यं सिद्ध करण्याची संधी या व्यक्तींना वारंवार उपलब्ध होते. 9 हा अंक तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो. हा अंक तुम्हाला खूप कणखर आणि इतरांची काळजी घेणारा बनवतो. जन्मतारखेत 9 अंक असणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतर्क आणि हुशार असतात. आपल्या बुद्धीचा योग्य वापर कसा करायचा हे या व्यक्तींना चांगल्या प्रकारे जमतं. व्यावसायिक आघाडीवर यश मिळवण्यासाठी, महत्त्वाकांक्षी असण्यासाठी तसेच अधिकार पदावर बसण्यासाठी या गोष्टींची गरज भासते.

    जर तुम्ही सरकारी अधिकारी बनण्याचा विचार करत असाल, आणि तुमच्या जन्मतारखेत वरील अंक नसतील; तर तुम्ही इतर मार्गांनी या अंकांच्या सानिध्यात येण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही वर दिलेले अंक असलेला मोबाईल क्रमांक वापरणं सुरू करू शकता, जेणेकरून या अंकांची ऊर्जा तुमच्या सोबत राहील.

    लकी रंग : White and Black

    लकी वार : शनिवार आणि मंगळवार

    लकी अंक : 9

    दान : कृपया भिक्षेकऱ्यांना चपला दान करा.

    कृपया कामाच्या ठिकाणी तुमच्या टेबलवर तुरटीचा तुकडा ठेवा.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Rashichark, Religion