मराठी बातम्या /बातम्या /religion /तुम्हालाही उच्च शिक्षण घ्यायच आहे ? मग तुमच्या जन्मतारखेत आहेत का हे अंक ?

तुम्हालाही उच्च शिक्षण घ्यायच आहे ? मग तुमच्या जन्मतारखेत आहेत का हे अंक ?

अंकशास्त्रानुसार  करा व्यवसायाची निवड

अंकशास्त्रानुसार करा व्यवसायाची निवड

अंकशास्त्रानुसार करा व्यवसायाची निवड

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 10 जानेवारी :  ज्ञान मिळवण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी, तुमच्या जन्मतारखेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे 1, 4, 8 आणि 9 अंक असणं गरजेचं आहे.

    नंबर 1: एक हा सर्जनशीलता आणि अनोख्या कल्पनांचा अंक आहे. उच्च शिक्षणामध्ये बहुतेक अभ्यासक्रम प्रकल्प आणि संशोधनावर आधारित असतो. त्यामुळे तिथे एक हा अंक फार गरजेचा आहे. व्यक्त होण्याच्या दृष्टीनं संवादासाठीदेखील त्याची आवश्यकता असते. आपली शिक्षण पद्धती अशी आहे की, जे काही ज्ञान प्राप्त केले आहे त्याचं मूल्यमापन किंवा पडताळणी गुणांच्या रूपात केली जाते. म्हणून विषयाची माहिती घेणं पुरेसं आहे. यश मिळवण्यासाठी तुम्ही लिखित स्वरूपात किंवा मौखिक स्वरूपात व्यक्त झालं पाहिजे. हे एक अंकांमुळे शक्य होतं.

    नंबर 4: चार हा वैशिष्टपूर्ण अंक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या अँगलनं पाहण्याची क्षमता मिळते. हा अंक व्यक्तीला जिज्ञासू बनवतो आणि तिला सर्व प्रश्नांची आणि सर्व गरजांची उत्तरं शोधायला भाग पाडतो. या अंकामुळे व्यक्तीच्या अंगी सकारात्मकता, तार्किकपणा, वैज्ञानिक वृत्ती, पद्धतशीरपणा, मेहनती वृत्ती निर्माण होते. अशी व्यक्ती चाकोरीच्या बाहेर जाऊन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते.

    नंबर 8: आठ हा अंक ज्ञान आणि शिक्षणासाठी ओळखला जातो. हा अंक व्यक्तीला मेहनती आणि संघटित बनवतो.

    नंबर 9: नऊ हा क्रमांक बौद्धिक क्षमता, सुपर मेमरी, अष्टपैलुत्व, मानसिक सतर्कता तसेच शार्प लर्निंगशी संबंधित आहे. हा अंक तुम्हाला सीरिअस थिंकर आणि वादविवादात सर्वोत्तम व्यक्ती बनवतो. हे गुण ग्रुप डिस्कशनमध्ये फार आवश्यक असतात.

    वरील अंकाच्या उपस्थितीमुळे किंवा या अंकांच्या संयोजनामुळे, परदेशात शिक्षण घेण्याचं किंवा उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांना बसण्याचं ध्येय सोपं होतं. हे ध्येय सहजपणे साध्य करता येऊ शकतं. वरील अंक तुम्हाला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्यास जबाबदार आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण, जर तुमच्या जन्मतारखेमध्ये वरीलपैकी एकही अंक नसेल तर तुमच्या मोबाईल नंबरध्ये त्यांचा समावेश करण्याचं लक्षात ठेवा.

    तुमच्या मोबाईल नंबरमध्ये हे अंक असल्याचा फायदा होईल. कारण, संपूर्ण जगाशी संवाद साधण्यासाठी मोबाईल नंबर हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून, वरील अंकांचा समावेश असलेल्या सीरिजमधील मोबाईल नंबर त्यांच्याशी संबंधित ग्रहांची प्रचंड शक्ती आणि ऊर्जा प्रसारित करू शकतात. तुम्हाला संबंधित ग्रहांच्या कृपेची किंवा उर्जेची कमतरता जाणवल्यास तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून ती मिळवता येईल.

    दान:

    1. भिक्षेकऱ्यांना पिवळा भात दान करा.

    2. गुरुमंत्राचा जप करा आणि तुमच्या गुरूंसमोर किंवा तुळशीसमोर दिवा लावा.

    3. सूर्याचं पेंडंट घाला.

    4. झोपायच्या आधी लाल पेनानं तुमची इच्छा वहीमध्ये लिहा.

    5. प्रत्येक बुधवारी गणपतीला दुर्वा वाहा.

    6. मांसाहार, मद्य, तंबाखू आणि चामड्याचा वापर 

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion