मराठी बातम्या /बातम्या /religion /तुमच्या तोंडात दात किती आहेत? इतके दात असणाऱ्या व्यक्ती असतात लकी

तुमच्या तोंडात दात किती आहेत? इतके दात असणाऱ्या व्यक्ती असतात लकी

दातांची संख्या

दातांची संख्या

सामुद्रिकशास्त्रानुसार, दातांच्या संख्येवरूनही आपण व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावू शकतो. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी : साधारणपणे असे मानले जाते की मनुष्याच्या दातांची संख्या 32 (बत्तीशी) असते. परंतु, असे फार कमी लोक असतात, ज्यांना प्रौढ होईपर्यंत सर्व 32 दात येतात. आपल्या रोजच्या जीवनात दातांना खूप महत्त्व आहे. दातांमुळे आपण काहीही चावू शकतो, पदार्थ फोडू शकतो. लहान बाळाला जन्माच्या वेळी दात नसतात, पण हळूहळू मोठे झाल्यावर दात यायला लागतात. काही मुलांना जन्मजातच दात असण्याचीही काही उदाहरणे असतात. परंतु अशी प्रकरणे फार दुर्मिळ आहेत. सामुद्रिकशास्त्रानुसार, दातांच्या संख्येवरूनही आपण व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावू शकतो. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

सामुद्रिक शास्त्र मानते की, ज्या लोकांच्या संपूर्ण आयुष्यात 32 दात येतात, ते लोक खूप भाग्यवान असतात. असे लोक सत्य स्वीकारतात, त्याचे पालन करतात आणि वाईट गोष्टी आणि असत्य यापासून दूर राहतात. असेही मानले जाते की ज्यांच्या तोंडात 32 दात असतात, ते जे काही बोलतात ते बरेचदा खरे ठरते.

*सामुद्रिक शास्त्रामध्ये 31 दात असलेल्या लोकांविषयी सांगण्यात आलं आहे. हे लोक ऐषोआरामाने जीवन जगतात आणि त्यांना खूप हुशार मानलं जातं.

कमी दात, जास्त त्रास -

*सामुद्रिक शास्त्रानुसार पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात 32 दात असत नाहीत. कधीकधी काही कारणांमुळे 32 ऐवजी 28, 29, 30 दातही असतात.

*सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तोंडात फक्त 30 दात असतात, त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. अशा लोकांना पैशाची विशेष समस्या येत नाही.

* ज्या लोकांच्या तोंडात 29 दात असतात, ते लोक आयुष्यात नेहमी दुःखी राहतात. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली नसते.

* याशिवाय 28 दात असलेल्या लोकांबद्दल सांगण्यात आले आहे की, हे लोक नेहमी संकटांनी घेरलेले असतात, त्यांना नशीब साथ देत नाही.

दातांचा आकार महत्त्वाचा -

सामुद्रिकशास्त्रानुसार, माणसाच्या तोंडातील दातांच्या संख्येइतकाच त्याच्या दातांचा आकार महत्त्वाचा असतो. ज्या लोकांचे दात गाढव, अस्वल, माकड किंवा उंदरासारखे असतात ते लोक श्रीमंत असतात, असे मानले जाते, परंतु या लोकांच्या वागण्यामुळे हे लोक श्रीमंत असूनही गरीबांसारखे जगतात.

हे वाचा - Shiv Mantras: महादेवाची पूजा करताना या मंत्रांचा करा जप; पूर्ण होतील सर्व मनोकामना

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion