मराठी बातम्या /बातम्या /religion /कितीही नड असली तरी उसण्या देऊ नयेत या 5 वस्तू; नंतर आपल्या अडचणी वाढतात

कितीही नड असली तरी उसण्या देऊ नयेत या 5 वस्तू; नंतर आपल्या अडचणी वाढतात

वापरकर्त्यांना अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वापरकर्त्यांना अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वापरकर्त्यांना अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 फेब्रुवारी:  हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला जितके महत्व आहे तितकेच महत्व वास्तु शास्त्राला देखील आहे. कितीही गरज भासली तरी चुकूनही उसण्या घेऊ नका या 5 वस्तू, शास्त्रानुसार अडचणीत होईल वाढ अनेकदा आपल्याला तातडीने एखाद्या गोष्टीची गरज पडते. अशा परिस्थितीत ती वस्तू आपल्याकडे नसेल तर ती आपण साहजिकच इतरांकडून घेतो आणि वापर झाल्यावर संबंधितांना ती परतही करतो. जीवनात अशा गोष्टींची देवाणघेवाण आवश्यक असते, पण आंधळेपणाने असे करणे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजिबात उधार वा उसण्या घेऊ नयेत. यामुळे वापरकर्त्यांना अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पेन किंवा पेन्सिल

पेन ही एक महत्त्वाची वस्तू आहे. जेव्हा आपच्याकडे पेन्सिल किंवा पेन नसतो, तेव्हा आपण काहीही विचार न करता एखाद्याला मागतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणाचीही लेखणी घेणे चुकीचे आहे. यामुळे जीवनाची प्रगती मंदावते. धार्मिक श्रद्धेनुसार चित्रगुप्त जीवनातील अडचणी आणि सुखे आपल्या लेखणीने लिहितात.

अंगठी किंवा मुद्रिका

अंगठी पुरुष आणि स्त्रिया दोघेही परिधान करत असतात. काही लोक अंगठीत रत्नही घालतात. अंगठी कधीही उधार घेऊ नये. शास्त्रानुसार असे केल्याने आर्थिक संकट येऊ शकते.

कंगवा

अनेक पुरुष खिशात छोटासा कंगवा ठेवतात. तुमचा वापरलेला कंगवा कधीही कुणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचा वापर करू नका. शास्त्रानुसार असे केल्याने तुमच्या भविष्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

कपडे

केवळ ज्योतिषशास्त्रातच नाही तर वैद्यकशास्त्रातही इतरांचे कपडे वापरू नका, असे सांगितले आहे. शास्त्रानुसार, दुसऱ्याचे जुने कपडे घातले तर नशीब तुम्हाला साथ देणार नाही असे म्हणतात.

 

घड्याळ

काही लोकांना मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून घड्याळे उधार घेण्याची सवय असते. ज्योतिषशास्त्रानुसार काळाचा संबंध व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट काळाशी असतो. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे घड्याळ घेतो तेव्हा त्याचा वाईट काळही तुमच्यावर येतो. त्यामुळे दुसऱ्याचे घड्याळ वापरणे हे चुकीचेच आहे.

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

 

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion, Vastu