मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips: नववर्ष सुरू होण्याआधी घरी आणा ७ वस्तू, सुख-समृद्धी राहील कायम

Vastu Tips: नववर्ष सुरू होण्याआधी घरी आणा ७ वस्तू, सुख-समृद्धी राहील कायम

नव्या वर्षात जीवनात समाधान लाभावं यासाठी काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवू शकता. या वस्तू कोणत्या, त्यांचे फायदे काय आहेत, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या.

नव्या वर्षात जीवनात समाधान लाभावं यासाठी काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवू शकता. या वस्तू कोणत्या, त्यांचे फायदे काय आहेत, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या.

नव्या वर्षात जीवनात समाधान लाभावं यासाठी काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवू शकता. या वस्तू कोणत्या, त्यांचे फायदे काय आहेत, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 डिसेंबर : लवकरच 2022 हे वर्ष संपून 2023 सुरू होणार आहे. सध्याची एकूण स्थिती पाहता आगामी वर्ष करिअर, व्यवसाय, कुटुंब, यश, पैसा आदी दृष्टिकोनातून कसं असेल, असा विचार प्रत्येकजण करत आहे. घरात सुख-समृद्धी, समाधानाचं वातावरण राहावं, सर्व अडचणी दूर व्हाव्यात, पुरेसा पैसा आणि प्रत्येक कामात यश मिळावं, असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेक जण ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घेतात. काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवल्या तर या गोष्टी सहजसाध्य होऊ शकतात. वास्तुशास्त्रात या वस्तूंविषयीची माहिती, त्यांचे फायदे नमूद करण्यात आले आहेत. लवकरच नवं वर्ष सुरू होत आहे. नव्या वर्षात जीवनात समाधान लाभावं यासाठी काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवू शकता. या वस्तू कोणत्या, त्यांचे फायदे काय आहेत, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या.

लवकरच 2023 हे वर्ष सुरू होणार आहे. येणारं वर्ष आनंद, समाधान आणि यश देणारं असावं, असं प्रत्येकाला वाटत आहे. वास्तुशास्त्रानुसार नव्या वर्षाच्या निमित्ताने तुम्ही काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवल्या, तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसंच आर्थिक समस्यादेखील दूर होऊ शकतात.

हसरा बुद्ध : नव्या वर्षाच्या सुरुवातील लाफिंग बुद्धाची मूर्ती खरेदी करणं सर्वोत्तम मानलं जातं. ही मूर्ती नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावी. यामुळे घरात कधीच पैसा कमी पडत नाही. आर्थिक समस्या निर्माण होत नाही.

हेही वाचा : हातउसने असो कि बँकेतून, कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ; फेडताना नाकीनऊ येऊ शकतं

हत्तीची मूर्ती: वास्तुशास्त्रानुसार, धातूपासून तयार केलेली हत्तीची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहते आणि वाईट शक्ती नष्ट होतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही चांदीपासून तयार केलेली हत्तीची मूर्ती खरेदी केली आणि ती घरात ठेवली तर घरात सुख-शांती, समृद्धी कायम राहील.

तुळशीचं रोप : नवीन वर्षाच्या निमित्ताने घरात कोणत्याही प्रकारचे इनडोअर प्लांट लावणं शुभ मानलं जातं. तुम्ही या निमित्ताने तुळशीचं रोपही लावू शकता. तुळशीचं रोप घरात लावणं शुभफलदायी मानलं जातं.

मोरपीस : भगवान श्रीकृष्णाला मोरपीस प्रिय आहे. ज्या घरात मोरपीस असतं, तिथं लक्ष्मीचा वास असतो. नवीन वर्ष आनंदाचं जावं, असं वाटत असेल तर मोरपीस अवश्य खरेदी करा आणि ते घरात ठेवा; मात्र केवळ एक ते तीनच मोरपिसंच खरेदी करा.

हेही वाचा : Vastu Tips: अशुभ होतं वातावरण, घराच्या अंगणात ही झाडं-रोपं असल्यास होऊ शकतं नुकसान

कासव : नवीन वर्षाच्या सुरुवातीला धातूचं कासव खरेदी करणं शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रात कासव हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. नवीन वर्षं सुरू होण्यापूर्वी, पितळ, तांबे किंवा चांदीचे कासव तुम्ही खरेदी करू शकता.

नारळ : एक लहान नारळ कापडात गुंडाळून तिजोरी ठेवावा. यामुळे पैसा आणि समृद्धी कायम राहते. या नारळाचा वापर अन्य काही गोष्टींसाठीही केला जातो.

शंख : घरात शंख ठेवल्याने सुख-समृद्धी आणि पैसा कायम टिकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक शंख खरेदी करावा. त्याची पूजा करून तो पैसे ठेवण्याच्या जागी किंवा तिजोरीत ठेवावा. यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात. पैशांची कधीच कमतरता भासत नाही.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu