मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips: या 5 वस्तू कधीही घराबाहेर असू नयेत, दारिद्र्य यायला वेळ नाही लागत

Vastu Tips: या 5 वस्तू कधीही घराबाहेर असू नयेत, दारिद्र्य यायला वेळ नाही लागत

फक्त घराच्या आतील वास्तू दुरुस्त केल्याने वास्तू दोष नाहीसा होत नाही, तर घराबाहेरील जागाही वास्तुदोषाचे कारण बनू शकते, त्यामुळे घराबाहेर कोणत्या वस्तू जमा होऊ देऊ नयेत, या विषयावर ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा माहिती देत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 18 सप्टेंबर : आजच्या आधुनिक युगातही वास्तुशास्त्राला प्राचीन काळी जेवढे महत्त्व होते, तेवढेच महत्त्व आहे. आजही लोक घर बांधताना वास्तुशास्त्राचे नियम पाळतात. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर घरात संकटे येतात, घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात, समस्या येतात. वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला कोणत्या ना कोणत्या देवतेचे स्थान असल्याचे सांगितले आहे. फक्त घराच्या आतील वास्तू दुरुस्त केल्याने वास्तू दोष नाहीसा होत नाही, तर घराबाहेरील जागाही वास्तुदोषाचे कारण बनू शकते, त्यामुळे घराबाहेर कोणत्या वस्तू जमा होऊ देऊ नयेत, या विषयावर ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा माहिती देत आहेत. कचरा आणि निरुपयोगी वस्तू - वास्तुशास्त्रानुसार घराच्या बाहेरील गोष्टींचाही घरातील वास्तूवर तेवढाच प्रभाव पडतो जितका घराच्या आतल्या वस्तूंचा होतो. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, ज्या घरांमध्ये स्वच्छता आणि वस्तू ठेवण्याची दिशा योग्य असते, तेथे माता लक्ष्मी वास करते. अनेक लोक घरासमोर कचरा गोळा करतात. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा आणि घाण साचल्यामुळे घरात गरिबी वास करते. अशा घरांमध्ये रोग आणि धनहानी होण्याची शक्यता असते. घराची उंची - वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की घरासमोरील मुख्य रस्ता नेहमी घराच्या उंचीच्या खाली असावा. ज्या घरासमोरचा रस्ता घरापेक्षा उंच आहे अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. अशा परिस्थितीत घरातील लोकांच्या प्रगतीत अडथळे येतात. यासोबतच घरात समस्याही कायम राहतात. काटेरी झाडे - वास्तुशास्त्रात सांगितले आहे की कोणत्याही घराच्या मुख्य दरवाजासमोर काटेरी झाड किंवा झाडे कधीही लावू नये. असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झाडे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तसेच घरात सुख-समृद्धी राहत नाही. विद्युत खांब - कोणत्याही घरासमोर कधीही विजेचा खांब नसावा, असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की जर एखाद्या घरासमोर विजेचा खांब असेल तर त्या घरातील सदस्यांमध्ये नेहमीच तणावाची परिस्थिती असते आणि घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं दगड-विटा अनेक वेळा असे दिसून येते की, घर बांधल्यानंतर लोक आपल्या घरासमोरच दगड, वीट, गिट्टीचा भंगार गोळा करतात. परंतु, हे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तुशास्त्र सांगते की, ज्या लोकांच्या घरासमोर दगडांचे मोठे ढीग असतात, त्यांचे जीवन संकटांनी घेरले जाते आणि त्यांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Religion, Vastu

पुढील बातम्या