म्हणून शनिवारी हे पदार्थ खायचे नसतात; शनिदेवाची वक्रदृष्टी टाळण्याचे सोपे उपाय

म्हणून शनिवारी हे पदार्थ खायचे नसतात; शनिदेवाची वक्रदृष्टी टाळण्याचे सोपे उपाय

शनिदेवाची वक्र दृष्टी अनेक कारणांमुळे व्यक्तीवर पडू शकते. त्याचे एक कारण म्हणजे शनिवारी अशा काही पदार्थांचे सेवन करणे, ज्यामुळे शनिदेवाचा कोप होऊ शकतो. त्याविषयी जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता म्हणून पूजले जाते. नवग्रहांमध्ये शनि हा सर्वात क्रूर-रागीट ग्रह मानला जातो. असे मानले जाते की, ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते, त्यांना शाही सुख मिळते. दुसरीकडे शनिदेवाने आपली वक्र नजर एखाद्या व्यक्तीवर टाकली तर त्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात. शनिदेवाची वक्र दृष्टी अनेक कारणांमुळे व्यक्तीवर पडू शकते. एक कारण म्हणजे शनिवारी अशा काही पदार्थांचे सेवन करणे, ज्यामुळे शनिदेव कोप होऊ शकतो. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल सांगत आहेत. जाणून घेऊया शनिवारी कोणत्या गोष्टींचे सेवन (Shaniwar che Upay) टाळावे.

लाल मिरची -

धार्मिक शास्त्रांमध्ये असे मानले जाते की, शनिदेव हे अग्निमय स्वभावाचे आहेत, त्यामुळे शनिदेवांना थंड पदार्थ आवडतात. यासाठी शनिवारी लाल मिरचीचे सेवन करणे आपल्याला अडचणीत आणू शकते. शनिदेवाचा कोप टाळायचा असेल तर शनिवारी लाल मिरचीचे सेवन करू नये.

दूध -

दुधाचा संबंध शुक्र ग्रहाशी असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. पंडितजींच्या मते शनि ग्रह लैंगिक इच्छांचा कारक ग्रह आहे. याशिवाय शनिदेव हा अध्यात्म आणि सत्य वाढवणारा ग्रह आहे, त्यामुळे शनिवारी दुधाचे सेवन टाळावे, असे मानले जाते.

मांस आणि मद्य -

शनिदेव सत्याच्या मार्गाने माणसाला अध्यात्माकडे घेऊन जातात, त्यामुळे शनिवारी दारू, मांस किंवा मादक पदार्थांचे सेवन केल्याने शनिदेवाची अशुभ दृष्टी पडू शकते. विशेषत: ज्या लोकांच्या राशीमध्ये शनीची साडेसाती चालू आहे, त्यांनी शनिवारी चुकूनही या गोष्टींचे सेवन करू नये.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

मसूर डाळ -

ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, मसूर डाळीच्या लाल रंगामुळे त्याचा संबंध मंगळाशी आहे. मंगळ आणि शनि या दोन्ही ग्रहांची प्रकृती क्रोधित असते, त्यामुळे शनिवारी मसूर खाल्ल्यास व्यक्तीचा क्रोध वाढू शकतो.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 20, 2022, 7:38 AM IST

ताज्या बातम्या