मराठी बातम्या /बातम्या /religion /

सूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ! घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात

सूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ! घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात

सूर्यास्तानंतर काय करू नये

सूर्यास्तानंतर काय करू नये

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर अशा निषिद्ध गोष्टी केल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा आपल्याला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 09 डिसेंबर : हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशी अनेक कामे सांगितली आहेत, जी सूर्यास्तानंतर करू नये असे मानले जाते. सूर्यास्तानंतर काही कामे केल्याने नकारात्मकता येते, असे मानले जाते. पौराणिक कथा आणि ज्योतिष शास्त्रात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, ज्यांचे पालन लोक प्राचीन काळापासून करत आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर अशा निषिद्ध गोष्टी केल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा आपल्याला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहेत, ज्या हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यास्तानंतर करू नयेत.

सूर्यास्तानंतर स्नान -

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही व्यक्तीने स्नान करू नये. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो. याशिवाय संध्याकाळनंतर स्नान केले तरी टिळा लावणे वर्ज्य मानले जाते. शास्त्रीय कारणांवरून पाहिले तर रात्री अंघोळ केल्याने शरीरात शीत प्रभाव वाढू शकतो.

रात्री कपडे धुवू नये -

ज्योतिषशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळी कपडे धुवू नयेत. असे मानले जाते की, रात्री कपडे धुऊन ते उघड्या आकाशाखाली पसरवल्याने रात्रीची नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते. मग आपण हे कपडे घालतो, ज्यामुळे आपल्या मनावर वाईट परिणाम होतो. जर तुमचे कपडे संध्याकाळपर्यंत सुकले नाहीत तर रात्रीच्या वेळी ते उघड्या आकाशाखाली पसरवण्याऐवजी घराच्या छताखाली पसरवा.

सूर्यास्तानंतर दाढी करू नका-

ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, रात्री केस कापणे किंवा मुंडण करणे कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ नाही. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने नकारात्मक ऊर्जा व्यक्तीवर प्रभुत्व मिळवू शकते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.

अन्न उघडे ठेवू नका -

सूर्यास्ताच्या आधी अन्न खावे, असे हिंदू धार्मिक मान्यतांमध्ये सांगितले आहे. यानंतर उरलेले अन्न उघडे ठेवू नये. असे मानले जाते की, अन्न उघडे ठेवल्याने त्याच्या आत नकारात्मकतेचे गुण वाढतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास खुल्या अन्नामध्ये अनेक प्रकारचे रोगजनक जंतू वाढण्याची शक्यता वाढते.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Hindu, Religion